शनिवार, ११ ऑक्टोबर, २००८

हुर्र्रे ! आपण सुटलो ..

अरे हे मधेच काय लिहितोय हा ? असं मनात आलं असेल तुमच्या, पण झालंच तस होतं.
जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी सांगावे ||
शहाणे करून सोडावे | सकळजन ..||

या श्लोकास प्रमाणमानून हा ब्लॉग सुरु केला आणि पहिला धक्का गूगल नेच दिला. आता नक्की काय झालेलं ते सांगणं कठीणच आहे तरीही पण सांगायचा प्रयत्न करतो.

गूगल ही सध्याची सर्वात मोठी internet मधील सेवा देणारी संस्था आहे. या वेबसाईट्मागे ही जे तंत्रज्ञान आहे ते ही गूगलचंच! आता झालं काय की हा ब्लॉग सुरळीत लागायला आणि त्याला स्पेम घोषित करायला एकच वेळ आली आणि माझा हा ब्लॉग चक्क गूगलने ब्लॉक [प्रतिबंधित] केला. मलाही हे सारं नवीन होत त्यामुळॆ थोडा मूड गेला होता. [ पण its oke.. you will pass through :) असा तुमच्यापैकी काही मित्रानी धीरही दिला. thanks to all support friends ! ]
खरं सांगायचं तर कारण काहीच नव्हतं मी कोणत्याही नियमांच उल्लंघन केलं नव्हतं की अजून काही वेगळंही केल नव्हतं. स्वत: गूगलच्या विपत्रात [email] त्यानी हे मान्य केलं होत की आमच्या स्वचलित anti spam filters च्या काही चुकांमुळेही कधी कधी असे होते. तरी खालील पत्त्यावर संपर्क साधा. आपल्या ब्लॉगला मधून मधून भेट देणा~या काहीजणांनी त्यांची नोटीस ही सुरुवातीचे वेळेस पाहिली ही असेल. दोन दिवस आपली वेबसाईट त्यांच्या निरीक्षणाखाली होती आणि शेवटी आपण पास झालो !

आता हे सर्व रामायण ऐकल्यावर विचारा हे स्पॆम म्हणजे काय ?
त्यावर उदया लिहिन .. आज इतकंच ..

1 टिप्पणी:

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !