शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २००८

e - संवाद


"इंटरनेट्च्या
शोधामागचा मूळ उद्देश लक्षात घेतला तर तो आहे संवाद आणि माहितीची देवाणघेवाण "



.. अगदी सरकारी संगणक व माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण पुस्तिकेतलं वाक्य वाट्तंय ना .. पण आहेच तसं. मूळ कुठल्याही माध्यमाच्या निर्मीती किंवा शोधामागे संवाद हेच एक कारण आहे. त्याला इंटरनेट कसा अपवाद असेल. ईमेल, text-chat = सहजसंवाद [chat - ला मराठी शब्द म्हणून कसा वाट्तो ?] वेगवेगळ्या फोरम्स आणि वेबसाईट्स या सर्व माध्यमातून आपण काही ना काही प्रकारे कुणाशी न कुणाशी संवाद साधू शकतो.

इमेल : सर्व प्रथम इमेल हा प्रकार अस्तित्वात आला. याला इपत्र किंवा विपत्र असं ही मराठीत म्हणता येइल.पूर्वी ही सर्व्हीस मोफत नव्हती पैसे देऊनच वापरता येत होती. पण सबीर भाटिया व जॅक स्मिथ या मित्रांनी मिळून केलेल्या प्रयत्नाने hotmail.com चा जन्म झाला. hotmail ही पहिली वेबमेल सर्व्हिस होती जी फुकट आणि सहज वापरण्याजोगी होती. साहाजिकच hotmail हिट & हॉट झाली. लोकांनी या सेवेला प्रचंड प्रतिसाद दिला. "जे जे फुकट ते ते पौष्टिक " या उक्ती प्रमाणे मोफत वेबमेल सर्व्हिसेस सद्ध्या खूपच पॉप्युलर आहेत.
इंटरनेटवर gmail.com , yahoo.com या सर्व्हीसेस तर जगप्रिय आहेतच .. पण भारतीय म्हणून सांगायच्या झाल्या तर indiatimes.com , rediffmail.com , zapakmail.com याही भरपूर वापरल्या जातात. पण सुरक्षा, भरपूर साठवण्याची जागा, व्यक्तिगत सेवा, स्पैम फिल्टर्स , एन्टीव्हायरस [संगणकीय विषाणू रोधक :) ]आणि इतर सुविधां हव्या असतील तर इमेल सेवेसाठी पैसे मोजणेही योग्य ठरते!

लवकरच आपण या सर्वांची detailed माहिती करुन घेणार आहोत..
प्रक्षेपण लवकरच येत आहे. [ ब्राउझर म्हणजे काय?]

२ टिप्पण्या:

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !