मंगळवार, ४ नोव्हेंबर, २००८

मराठी प्रतिशब्द उपक्रम

मराठी असे आमुची मायबोली ।
जरी आज ती राजभाषा नसे ॥
मराठी अमराठी वाद सध्या जोरात चालू आहेच त्यातच माझ्या वाचनात ब्लॉगमित्र शैलेश खांडेकर यांचा ”विदग्ध” हा ब्लॉग [ ही अनुदिनी] आला/ आली. :) माझ्या वाचनात २-१ वर्षापूर्वी ही हा उपक्रम मनोगत.कॉम च्या द्वारे वाचनात आला होता. पण तो त्यावेळेस अगदी छोटया स्वरूपात होता.


आता ह्या उपक्रमाने जोर धरला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रतिशब्द शोधून शब्दभांडारात टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि मी ही त्या उपक्रमाचा भाग होत चाललो आहे अस मला वाटत आहे.मी सुचवलेले शब्द केशरी रंगात दिले आहेत
त्या पैकी काही शब्द खाली देत आहे. वरील शब्दांमधील रंगीत शब्द हे त्या त्या वेबसाईट्स चे [संस्थळांचे] पत्ते आहेत.

  • मायाजाळ, विश्वजाल, ज्ञानगंगा [ज्ञान + आकाशगंगा] - internet
  • संस्थळ - website - a place on internet.
  • पत्र, विपत्र - email
  • चिट्ठी, चिटोरी, चपाटी - scraps
  • वटवट, गप्पा, चकाट्या - chat
  • वापरिका- application
  • दूरावलोकन - Zoom Out

या उपक्रमात मला काही शब्द पटले काही नाही पटले. काही जड ही वाटले. पण त्या उपक्रमामागचा उद्देश नक्कीच योग्य आहे.
तुम्ही जर नव्यानेच या इंटरनेटच्या विश्वात दाखल होत असाल तर सुरूवाती पासूनच जर तुम्ही हे शब्द वापरात ठेवलेत तर त्या मराठी शब्दांचा प्रसार नक्कीच होण्यास मदत होईल. यात तुम्हीही नवे शब्द सुचवू शकता. विविध विषयांकरता हे शब्द हवे आहेत. तुम्हाला त्याकरता शब्दभांडाराचे सदस्य व्हावे लागते जे विनामूल्य अमूल्य आहे.

तसेच आपल्या या अनुदिनीवर मी मराठीच फक्त शब्द वापरावेत की मराठीबरोबरच "संस्थळ[website]" अशा प्रकारे वापरावेत? ते ही मला सांगा.

* फोटोग्राफर: आशु [पूर्ण नाव माहित असल्यास कळवावे.]

४ टिप्पण्या:

  1. नमस्कार,
    आपले म्हणणे बरोबर आहे. इंग्रजीमधील शब्दांना मराठी शब्द हुडकणे हे तितकेच आवश्यक आहे जितके, मराठीतून ज्ञान-प्रसार होणे. यासाठी अनेक मराठी व्यक्ती मराठी विकिपीडियावर दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी मराठी विकिमध्ये आता २०,५०० लेख आहेत. मराठी विकिच्या वृद्धीकरणासाठी करण्यासाठी सर्व मराठी अनुदिनी-लेखकांची मदत व्हायला हवी. याबद्दल अधिक माहिती तुम्ही माझ्या अनुदिनीवर येथे वाचू शकता.

    उत्तर द्याहटवा
  2. to upakram chhan ch ahe. tumhi ithe vaprtana, marathi(english) ase vaprle tar bara padel. nidan navin shabdanchi olakh hoi paryant he changle.

    kahi shabdanchya babtit atirek hoto he matr khare.

    btw, nice blog.

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद,
    ब्लॉगगिरी करण्यामध्ये मी अजून नवीन आहे.
    पण विकिवर आजकाल नेमाने काहितरी मदत करायचा प्रयत्न करतो.
    आणि शैलेश खांडेकर यांच्या अनुदिनीवर उल्लेखलेल्या शब्दभांडारातही खाते उघडले आहे.
    आपले तेथे पण योगदान पाहिले. विकिवर पण आपली भेट व्हावी ही इच्छा :)

    क.लो.अ.
    क्षितिज

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !