बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २००९

गूगल Doc कसे वापरावे ?





दोन तास audio quality शी झगडून ही मला ती या पेक्षा जास्त सुधारता आली नाही.
त्या बद्द्ल क्षमस्व ! [sorry for bad audio quality.]

सोमवार, १६ फेब्रुवारी, २००९

गूगल office !

सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला..
" हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस "
" हो ... गडबडीत विसरलोच ! "
" आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. "
" ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! "
" ..  "
" पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? "
"हो"
" मग चिंता मिटली .."

" .. "
" गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? "

.... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! ..

गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन तयार ही करू शकता ! 

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

नवीन वर्ष .. नवी सुरूवात.

आज खूप दिवसानी लिहीत आहे. नविन वर्षाची सुरूवात काही मनासारखी झाली नाही, काही ना काही वाईट बातम्या येत गेल्या. त्या नंतर काही गडबडीची कामही उरकली .. आता जरा उसंत मिळाली आहे तर मी परत आलोय . .. तुमच नवीन वर्ष मस्त सुरू झाल असेल .. नवे संकल्प नवे विचार .. .. असो.

भेटू लवकरच !