सोमवार, २५ मे, २००९

देवनागरी लेखनाची सुलभ तंत्रे !



मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे
सर्वत्र आंग्लाळलेल्या या ई-विश्वात एक ना एक दिवस नक्की मराठी भाषेला चांगले दिवस येतील, अनेक लोक मराठी भाषेमधेच त्यांची संस्थळे निर्माण करतील, एकमेकांशी मराठी मधे विपत्र व्यवहार करतील, सर्वांना समजणा-या अशा भाषेतून जगातील नव नवे तंत्रज्ञान एक दिवस लोकांसमोर येइल.. अशी स्वप्ने उराशी धरून काही माणसं या नवीन ई-विश्वात मराठी भाषेचा विचार करून त्यावर प्रयोग करू लागली आणि त्यातून त्यांने अनेक नवनवीन तंत्रे यातून विकसित झाली. गमभन, लिपीकार, बरहा अशा मला माहित असलेल्या तंत्रांचा व त्या वरील माहितींच्या पोस्टसचा हा एक संग्रह.. तुमच्यासाठी

देवनागरी लेखन करण्यासाठी
मायबोली.कॉम हे मराठीतील पहिले संस्थळ..
त्याचा उल्लेख करून आता पुढील यादीला सुरुवात करतो ! :)

गमभन लेखन पद्धती

ह्या प्रणालीमधे आपण प्रमुख भारतीय भाषांमधे टंकलेखन करू शकतो. अनेक संस्थळे जसे मनोगत.कॉम, मिसळपाव.कॉम, मराठीब्लॉगविश्व ही या प्रणालीच्या तंत्रावरच काम करत आहेत. त्यात मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, गुरूमुखी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगू या प्रमूख भाषांचा समावेश आहे.गमभन लेखन पद्धती वापरण्यासाठी वरील नावावर टिचकी मारा. या प्रणालीचे ही वेब प्रत आहे. त्याच बरोबर गमभन ने वेबकारांना [web designers developers] त्याची प्रगत प्रत ही Download साठी उपलब्ध केली आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

बरहा तंत्र

ही एक लोकार्पित मोफत संगणक प्रणाली आहे जी प्रामुख्याने द्क्षिणेतील भाषांच्या लेखनासाठी तयार केली. त्यामधे प्रामुख्याने मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, गुरूमुखी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगू या भारतीय भाषा आहेत. या प्रणालीचा वापर फकत वेब साठीच नाही तर इतरही दैनंदिन टंकनासाठी ही करता येतो. या प्रणालीमधे आपणास बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यात अनुवाद करण्याची ही सोय आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

लिपीकार

ही पध्दतही सोपी आणि सुटसुटीत आहे. ह्यात अनेक सोयी आहेत. विंडोज मधील कार्यालयीन प्रणालीतही ही प्रणाली वापरता येते. ह्यात आपण SMS मधे टंकन करतो तसे टंकन करायचे आहे. याची एक वेब प्रत आहे.ती आधी तुम्ही वापरून पहा. यात हिन्दी, बांग्ला, मराठी, तेलुगू, संस्कृतम्,‌ मल्याळम, नेपाली, गुजराती, गुरूमुखी,कन्नड, तमिळ,असमिया, उर्दू अशा भाषांचा समावेश आहे.अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

क्वीलीपॅड

ही सुद्धा एक सहज तंत्रप्रणाली आहे. यात वरील सर्व प्रणालींसारख्याच सुविधा आहेत पण यांचे वैशिष्ट्य असे की या संस्थेने भ्रमणध्वनी संदेशासाठी[मोबाईल मेसेजसाठी] वेगळी यंत्रणाही दिलेली आहे. जी अजून तितकी लोकप्रिय नाही.तुम्ही जरूर एकदा या यंत्रणेचा लाभ घ्या.अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

अजून काही टंकलेखन प्रणाली आहेत. त्या खाली दिलेल्या आहेत.
मराठी जगत
MAFSU
हिंदीनी
युनिनागरी
त्याच बरोबर gmail,blogger,orkut या गूगलच्या तसेच yahoo messanger, yahoo mail अशा सेवांमधेही आता देवनागरी सेवा सुरू केल्या आहेत.

अजून माहिती हवीये ?

वरील प्रणालींमधे काही फरक आहेत पण टंकन करायची पद्धत एकच आहे. त्या त्या संस्थळांवर त्यांची मदत उपलब्ध आहेत. पण तरीही काही लेखकांनी व ब्लॉगकारांनी काही लेख लिहीले आहेत ते खाली देत आहे.
देवनागरी संगणक प्रणाली
युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
मायक्रोसॉफ्ट भाषा प्रकल्प
मराठी-हिंदीत टंकन करण्याची पद्धत
महती आणि माहिती
'संगणक आज्ञावली' मराठीतून शक्य आहे का?

काही अजून पहावी अशी संस्थळे
अवकाशवेध
मराठी माती
मनोगत
काही उपयुक्त संकेतस्थळे
आठवणीतील गाणी
पु.ल. देशपांडे

तुम्हाला काही विसरल्यासारखे वाटत आहे का ?
तुम्ही कोणती पद्धत वापरताय?
तुमच्या आवडीची कोणती पद्धत आहे?
जरूर लिहा.

शनिवार, १६ मे, २००९

flock - एक सोशल ब्राऊझर ..

बगळ्यांची माळ झुले अजूनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?









Flock - म्हणजे पक्ष्यांचा थवा ..
पक्षी जसे त्यांच्या थव्यांना सोडून कुठे जात नाहीत एकत्र एकमेकांच्या संपर्कात असतात. तसेच माणसाला आपल्या ऑफिसमधल्या क्युबिकलमधे असून ही सहजपणे मित्रांच्या - घरच्यांच्या संपर्कात राहता यावे या उद्देशाने हा ब्राऊझर तयार केला गेला आहे. इंटरनेटवर ओर्कुट सोडून ही ब-याच कम्युनिटीज आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या सर्वांत लोक हिरीरीने सहभाग घेत असतात. लोकांचा हा वाढता ओढा पाहून हा फ़्लोक अस्तित्वात आला आहे . काही दिवसांपूर्वी आपण इंटरनेट एक्स्प्लोरर ची माहिती घेतली होती. आता बरेच लोक मोज़िला फायरफॉक्स ही वापरत आहेत. याच तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा एक ब्राऊझर आहे. जो तुम्हाला इथून डाऊनलोड करता येतो. हा ही मोझिला गटातील असल्याने फुकट आहे. याच्यात फायरफॉक्स प्रमाणे टॅब्ज आहेत. add ons आहेत. हा अत्यंत वेगवान ही आहे. मग तरी ही वेगळं अस काय आहे यात ?
अशी अनेक वैशिष्ट्ये या ब्राऊझर मध्ये आहेत जी तुम्हाला फायरफॉक्स मधे काही कारणाने मिळत नाहीत.

  • ब्लॉग संपादक : [blog editor]

    या मध्ये तुम्ही तुमचे blogger, wordpress आणि तत्सम ब्लॉग्स नियंत्रित करू शकता. नव्या पोस्टलिहून प्रकाशित करू शकता आणि त्या संपादित ही करू शकता. याचा वैशिष्ट्यपूर्ण सुसज्ज interface तुम्हाला सर्व प्रकारे सहाय्यक आहे आणि तुम्ही तुमच्या ब्लॉग्स वर जाता ह्या सर्व गोष्टी नियंत्रित करूशकता.
  • वेब क्लिप बोर्ड : web clipboard
    या मधे तुम्ही संस्थळे [websites] पहाता पहाता .. काही गोष्टींची प्रत बनवून ठेवू शकता त्या नंतर वापरूही शकता. हा एखाद्या चिमटा असलेल्या पॅड सारखा काम करतो.
  • माध्यम पट्टी : media bar

    या मध्ये तुम्ही flickr, picasa, photobucket, facebook अशा चित्रसंकलक -संयोजक सामाजिकसेवांवरील मित्रांचे फोटो सहज पाहू शकता. तसेच youtube, truveo वरील ध्वनिचित्रफिती पाहू शकता. तुमच्या संग्रहात त्यांचे दुवे साठवू शकता. त्याचबरोबर या सेवांवर नव्या माध्यमांसाठी म्हणजे छायाचित्रे, ध्वनिचलचित्रे तुम्ही शोधू शकता.
  • इतकेच नव्हे तर फ्लोक तुम्हाला तुमचे इमेल मधील [ Gmail, yahoo, aol mail ]खातेही इथे सहज पणेपहाण्यास मदत करते. यात अजूनही खूप सोयी आणि मस्त विजेट आहेत.
जर तुम्ही फेसबुक, ट्वीटर, फ्लिकर, पिकासा, जीमेल, याहू, एओएल आणि अशा अनेक गोष्टी एकाच वेळेस वापरू पाहात असाल आणि ते तुम्हाला जर सहज करायचे असेल .. तर flock is must !

शुक्रवार, ८ मे, २००९

रेडिओ स्टेशन्स ..











रेडिओ
मिर्ची .. एस एफ़ एम .. आणि त्यांची बडबड .. किंवा विविधभारती वरची सुरेल गाणी आणि त्यांची "निवेदनं" या दोन्ही बद्दल मी काहीही लिहीत नाहीए, मग रेडिओचा इथे काय संबंध ? काय सवाल अस विचारण्यापूर्वीच सांगतो, मी सांगतोय ते इंटरनेट रेडिओ बद्दल.. आता हे काय नवं खूळ ? रेडिओ जुना प्रकार आहे असं ज्यांच मत असेल त्यानी तर हे जरूर करून पहावं.

परवा मी माझ्या कॉम्प्युटरवरची तीच तीच गाणी ऐकून वैतागलो होतो. जरा नवीन काही शोधाशोध गूगलवर चालू होती.. हे चाळ ते चाळ करत करत मी पोहोचलो शाऊटकास्ट.कॉम वर पोहोचलो आणि मला एक खजिना मिळाला.. अर्थात तिथे सर्व रेडिओ स्टेशन्स english होती पण त्यात काही हिंदी सुद्धा होती. अजून एक संस्थळ आहे लाईव्ह ३६५ इथे ही तुम्हाला विविध प्रकारची स्टेशन्स ऐकायला मिळतील. तुम्हाला अजून ऐकायची असतील तर गूगल वर इंटरनेट रेडिओ म्हणून सर्च द्या ..








इंटरनेटवर रेडिओ ऐकण्यासाठी तुम्हाला itunes किंवा Songbird किंवा winamp ही तीन सोफ़्टवेअर्स लागतात. ती तुम्हाला त्या नावांवर टिचकी मारलीत की डाऊन लोड करता येतील. [ तसं वेबसाईटच्या तयार प्लेअरमधे पण ऐकता येत पण या दोन सॉफ्टवेअर्स मधे तुम्हाला अजुन काही नियंत्रण मिळते.]

वरील तीन सॉफ्टवेअर्स वापरण्याची पद्धत
  1. तुम्ही Tune in वर क्लिक केल कि तुम्हाला विचारण्यात येतं कि .plc फाईल कोणत्या सॉफ्टवेअरमधे ओपन करायची?
  2. तेव्हा तुम्हाला फक्त winamp or songbird or mediaplayer or itunes सिलेक्ट करायच आहे.
  3. आणि पुढील काही सेकंदात रेडिओ सुरू होईल !

त्याच बरोबर तुमचे ब्रॉडबॅन्ड कनेक्शन किमान २५६ केबी प्रत्येक क्षणास देण्या क्षमतेचे असावे लागते. बाकी तुम्ही एकदा Try कराच त्या शिवाय मजा नाही कळणार.

RaDioTEENTAAL.com 100% InDiAn MuSiC LiVe FrOm PaRiS
Bollywood Music Radio :: Indian Music :: Request your Hindi songs.
Bollywood Classic Hits - Radio NRI
Hindi Radio - Mera Sangeet

ही काही तिथली हिंदी स्टेशन्स आहेत.
सांगा मला तुमचा अनुभव .. आणि हो मी खूप दिवसाने पोस्ट लिहिली आहे .. त्याबद्दल क्षमस्व !