सोमवार, २५ मे, २००९

देवनागरी लेखनाची सुलभ तंत्रे !



मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे
सर्वत्र आंग्लाळलेल्या या ई-विश्वात एक ना एक दिवस नक्की मराठी भाषेला चांगले दिवस येतील, अनेक लोक मराठी भाषेमधेच त्यांची संस्थळे निर्माण करतील, एकमेकांशी मराठी मधे विपत्र व्यवहार करतील, सर्वांना समजणा-या अशा भाषेतून जगातील नव नवे तंत्रज्ञान एक दिवस लोकांसमोर येइल.. अशी स्वप्ने उराशी धरून काही माणसं या नवीन ई-विश्वात मराठी भाषेचा विचार करून त्यावर प्रयोग करू लागली आणि त्यातून त्यांने अनेक नवनवीन तंत्रे यातून विकसित झाली. गमभन, लिपीकार, बरहा अशा मला माहित असलेल्या तंत्रांचा व त्या वरील माहितींच्या पोस्टसचा हा एक संग्रह.. तुमच्यासाठी

देवनागरी लेखन करण्यासाठी
मायबोली.कॉम हे मराठीतील पहिले संस्थळ..
त्याचा उल्लेख करून आता पुढील यादीला सुरुवात करतो ! :)

गमभन लेखन पद्धती

ह्या प्रणालीमधे आपण प्रमुख भारतीय भाषांमधे टंकलेखन करू शकतो. अनेक संस्थळे जसे मनोगत.कॉम, मिसळपाव.कॉम, मराठीब्लॉगविश्व ही या प्रणालीच्या तंत्रावरच काम करत आहेत. त्यात मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, गुरूमुखी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगू या प्रमूख भाषांचा समावेश आहे.गमभन लेखन पद्धती वापरण्यासाठी वरील नावावर टिचकी मारा. या प्रणालीचे ही वेब प्रत आहे. त्याच बरोबर गमभन ने वेबकारांना [web designers developers] त्याची प्रगत प्रत ही Download साठी उपलब्ध केली आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

बरहा तंत्र

ही एक लोकार्पित मोफत संगणक प्रणाली आहे जी प्रामुख्याने द्क्षिणेतील भाषांच्या लेखनासाठी तयार केली. त्यामधे प्रामुख्याने मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, गुरूमुखी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगू या भारतीय भाषा आहेत. या प्रणालीचा वापर फकत वेब साठीच नाही तर इतरही दैनंदिन टंकनासाठी ही करता येतो. या प्रणालीमधे आपणास बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यात अनुवाद करण्याची ही सोय आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

लिपीकार

ही पध्दतही सोपी आणि सुटसुटीत आहे. ह्यात अनेक सोयी आहेत. विंडोज मधील कार्यालयीन प्रणालीतही ही प्रणाली वापरता येते. ह्यात आपण SMS मधे टंकन करतो तसे टंकन करायचे आहे. याची एक वेब प्रत आहे.ती आधी तुम्ही वापरून पहा. यात हिन्दी, बांग्ला, मराठी, तेलुगू, संस्कृतम्,‌ मल्याळम, नेपाली, गुजराती, गुरूमुखी,कन्नड, तमिळ,असमिया, उर्दू अशा भाषांचा समावेश आहे.अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

क्वीलीपॅड

ही सुद्धा एक सहज तंत्रप्रणाली आहे. यात वरील सर्व प्रणालींसारख्याच सुविधा आहेत पण यांचे वैशिष्ट्य असे की या संस्थेने भ्रमणध्वनी संदेशासाठी[मोबाईल मेसेजसाठी] वेगळी यंत्रणाही दिलेली आहे. जी अजून तितकी लोकप्रिय नाही.तुम्ही जरूर एकदा या यंत्रणेचा लाभ घ्या.अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

अजून काही टंकलेखन प्रणाली आहेत. त्या खाली दिलेल्या आहेत.
मराठी जगत
MAFSU
हिंदीनी
युनिनागरी
त्याच बरोबर gmail,blogger,orkut या गूगलच्या तसेच yahoo messanger, yahoo mail अशा सेवांमधेही आता देवनागरी सेवा सुरू केल्या आहेत.

अजून माहिती हवीये ?

वरील प्रणालींमधे काही फरक आहेत पण टंकन करायची पद्धत एकच आहे. त्या त्या संस्थळांवर त्यांची मदत उपलब्ध आहेत. पण तरीही काही लेखकांनी व ब्लॉगकारांनी काही लेख लिहीले आहेत ते खाली देत आहे.
देवनागरी संगणक प्रणाली
युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
मायक्रोसॉफ्ट भाषा प्रकल्प
मराठी-हिंदीत टंकन करण्याची पद्धत
महती आणि माहिती
'संगणक आज्ञावली' मराठीतून शक्य आहे का?

काही अजून पहावी अशी संस्थळे
अवकाशवेध
मराठी माती
मनोगत
काही उपयुक्त संकेतस्थळे
आठवणीतील गाणी
पु.ल. देशपांडे

तुम्हाला काही विसरल्यासारखे वाटत आहे का ?
तुम्ही कोणती पद्धत वापरताय?
तुमच्या आवडीची कोणती पद्धत आहे?
जरूर लिहा.

८ टिप्पण्या:

  1. विरेंद्र,
    अत्यंत छान ओळख करून देणारा लेख.


    एक दुरुस्ती, सुचवू का....
    समजणा-या ऐवजी समजणार्‍या

    पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1


    जर आपल्याला रस असेल तर कृपया या कम्युनिटीमधे सामील व्हा.

    उत्तर द्याहटवा
  2. You can use Indic Input Extension for typing Marathi.
    https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/3972

    You can check spelling of Marathi words here...
    http://saraswaticlasses.net/shabdasampada/

    उत्तर द्याहटवा
  3. या लेखात रस घेऊन तुम्ही तुमच मत मांडलत त्या बद्दल धन्यवाद..
    एक सुधारणा सुचवू का ? विरेंद्र, नव्हे ...वीरेन्द्र ! :P एक फुटकळ विनोद निर्मीती ! :)

    मी पण तुमच्या प्रमाणे जिथे जमेल तिथे असे सुचवत असतो पण काही जण अगदी जिवावर आल्यासारखे लिहीतात मराठीत व नीट लिहीण्याचा प्रयत्न ही करत नाहीत. मलाही र्‍या हे लिहीता येत नव्हत. मला वाटल होत की हे अक्षर फक्त मराठीत असल्याने ते त्या font मधेच नसेल. कारण मी समजत होतो की हा देवनागरीच पण हिंदीचा font आहे.
    माहिती दिल्याबद्दल शतश: ऋणी आहे !

    उत्तर द्याहटवा
  4. गुगलची नवीन प्रणाली बघा. दणादण टाइप करता येते, व व्याकरण हि बरोबर येते. तो आपल्यास शब्दही सुचवतो फक्त टॅब दाबून निवडायचा.



    http://www.google.com/ime/transliteration/

    उत्तर द्याहटवा
  5. वा ही तर् मस्तच् सुविधा दिलि आहे गूगल ने !!
    धन्यवाद् सुचविल्या बद्दल् !

    उत्तर द्याहटवा
  6. वीरेंद्र,

    क्विलपॅडची भ्रमणध्वनीमधील देवनागरी टंकनाची सुविधा फार छान आहे. मी अनेक दिवस असं काहीतरी शोधत होतो.

    फक्त एकच त्रास आहे - त्या सुविधेची भाषा ‘हिंदी’ असल्याकारणाने त्यात पूर्णविराम म्हणून दंड (।) आहे, टिंब नाही. बहुदा त्यात ’ळ’ सुद्धा नसावा.

    यावर काही उपाय आहे का?

    अजून एक - आपणां सर्वांना बरहाची सवय झाली आहे. बरहाची काही भ्रमण्ध्वनी-प्रणाली आहे का? विशेषतः ’सिंबियन ५’ या प्रणालीसाठी?

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद Pras...google च्या नवीन tool मुळे खरंच दणादण लिहिता येत आहे...फक्त स्पेलिंग च्या विकेट पडणार आहेत...for example Lake Geneva हा शब्द लिहायचा असेल तर पूर्णतः वेगळच spelling लिहावं लागतं....lek jiniva असा लिहिला तर ते लेक जिनिवा लिहिला जातं...मला ह्यातली आवडलेली सुविधा म्हणजे आपल्या बोली भाषेतल्या मराठी शब्दांवर ( खास करून वाक्याच्या शेवटच्या शब्दांवर) अनुस्वार द्यावा लागतो तरच ते शब्द जिवंत वाटतात...आणि हे tool ती सुविधा मस्त पुरवतं (पुन्हा अनुस्वार) :)

    हर्षद पाटील

    उत्तर द्याहटवा
  8. आदित्य :
    मी क्विलपॅडची भ्रमणध्वनीमधील देवनागरी टंकनाची सुविधा वापरली नाही. मी ती स्थापित केलेली पण तिने माझा दूरध्वनीच बंद केला.. ती काढून टाकल्यावर च तो चांगलं चालायला लागला .. हुश्श ..

    धन्यवाद हर्षद
    या गुगल च्या प्रणालीत अजून अडचण अशी आहे की तुम्हाला मंडई, माणसे असे अनेक शब्द पटापट लिहीता येत नाहीत. आणि शब्द जर चुकला तर अख्खा शब्द परत लिहीला तरच तो बरोबर येतो. उदा. जोडाक्षरे दुरुस्त करताना ही अडचण जास्त येते. तसं बारह किंवा इतर प्रणालींच नाहीय.
    ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आभार !

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !