शनिवार, १६ मे, २००९

flock - एक सोशल ब्राऊझर ..

बगळ्यांची माळ झुले अजूनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?









Flock - म्हणजे पक्ष्यांचा थवा ..
पक्षी जसे त्यांच्या थव्यांना सोडून कुठे जात नाहीत एकत्र एकमेकांच्या संपर्कात असतात. तसेच माणसाला आपल्या ऑफिसमधल्या क्युबिकलमधे असून ही सहजपणे मित्रांच्या - घरच्यांच्या संपर्कात राहता यावे या उद्देशाने हा ब्राऊझर तयार केला गेला आहे. इंटरनेटवर ओर्कुट सोडून ही ब-याच कम्युनिटीज आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या सर्वांत लोक हिरीरीने सहभाग घेत असतात. लोकांचा हा वाढता ओढा पाहून हा फ़्लोक अस्तित्वात आला आहे . काही दिवसांपूर्वी आपण इंटरनेट एक्स्प्लोरर ची माहिती घेतली होती. आता बरेच लोक मोज़िला फायरफॉक्स ही वापरत आहेत. याच तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा एक ब्राऊझर आहे. जो तुम्हाला इथून डाऊनलोड करता येतो. हा ही मोझिला गटातील असल्याने फुकट आहे. याच्यात फायरफॉक्स प्रमाणे टॅब्ज आहेत. add ons आहेत. हा अत्यंत वेगवान ही आहे. मग तरी ही वेगळं अस काय आहे यात ?
अशी अनेक वैशिष्ट्ये या ब्राऊझर मध्ये आहेत जी तुम्हाला फायरफॉक्स मधे काही कारणाने मिळत नाहीत.

  • ब्लॉग संपादक : [blog editor]

    या मध्ये तुम्ही तुमचे blogger, wordpress आणि तत्सम ब्लॉग्स नियंत्रित करू शकता. नव्या पोस्टलिहून प्रकाशित करू शकता आणि त्या संपादित ही करू शकता. याचा वैशिष्ट्यपूर्ण सुसज्ज interface तुम्हाला सर्व प्रकारे सहाय्यक आहे आणि तुम्ही तुमच्या ब्लॉग्स वर जाता ह्या सर्व गोष्टी नियंत्रित करूशकता.
  • वेब क्लिप बोर्ड : web clipboard
    या मधे तुम्ही संस्थळे [websites] पहाता पहाता .. काही गोष्टींची प्रत बनवून ठेवू शकता त्या नंतर वापरूही शकता. हा एखाद्या चिमटा असलेल्या पॅड सारखा काम करतो.
  • माध्यम पट्टी : media bar

    या मध्ये तुम्ही flickr, picasa, photobucket, facebook अशा चित्रसंकलक -संयोजक सामाजिकसेवांवरील मित्रांचे फोटो सहज पाहू शकता. तसेच youtube, truveo वरील ध्वनिचित्रफिती पाहू शकता. तुमच्या संग्रहात त्यांचे दुवे साठवू शकता. त्याचबरोबर या सेवांवर नव्या माध्यमांसाठी म्हणजे छायाचित्रे, ध्वनिचलचित्रे तुम्ही शोधू शकता.
  • इतकेच नव्हे तर फ्लोक तुम्हाला तुमचे इमेल मधील [ Gmail, yahoo, aol mail ]खातेही इथे सहज पणेपहाण्यास मदत करते. यात अजूनही खूप सोयी आणि मस्त विजेट आहेत.
जर तुम्ही फेसबुक, ट्वीटर, फ्लिकर, पिकासा, जीमेल, याहू, एओएल आणि अशा अनेक गोष्टी एकाच वेळेस वापरू पाहात असाल आणि ते तुम्हाला जर सहज करायचे असेल .. तर flock is must !

३ टिप्पण्या:

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !