Sunday, 27 December 2009

गूगल वेव्ह..

थंडीची लाट आलेली आहे सध्या .. तशीच काहीशी पण इंटरनेटला बदलून टाकणारी ही लाट आहे.. गूगलची लाट .. google wave...
यावर स्वार कसं व्हायच हेच सांगितलय या व्हिडीओत..
मी आधीच या सेवेचा भाग झालेलो असल्याने अगदी नवा अनुभव व माहितीही तुम्हाला मिळॆल ..

चॅट + फ़ोरम्स + इमेल + कॉन्फरन्स = गूगल वेव्ह..

Monday, 21 December 2009

शोधताना ! - २

गेल्यावेळॆस आपण इंटरनेटवर शोधताना काय काय करू शकतो ते पाहिल. आता अजून कोणती कोणती शोधके [सर्च इंजिन्स ]आहेत ते पाहू..


व्हिडीओ शोध :
आपण मुख्यत: गूगल व याहू सारख्या शोधकांवर संस्थळे, चित्रे, व्हिडीओ असेच शोध घेत असतो. पण यातून सर्वच शोध परिणाम येतात असे नाही.
आणखीही काही संस्थळॆ आहेत जी यात गणली जात नाहीत. उदा. गूगल व्हिडीओ शोधांमधे यू ट्यूब व गूगल व्हिडीओ व तत्सम संकेतस्थळांचे शोध परिणाम दाखवते पण ते फक्त वरवरच ... तेव्हा तुम्ही जर एखादी बातमी गाणे अथवा पाककृती शोधत असाल तर एकदा यू ट्यूब वर शोध घ्यायला हरकत नाही .. नक्कीच तुमचे काम सोपे होईल. त्याच बरोबर डेली मोशन, व्हिमीओ या व्हिडीओ संस्थळांवरही अशा प्रकारे शोध घेऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.

चित्र शोध :
फ़्लिकर, फोटोबकेट, CC शोधक यांचाही वापर तुम्ही चित्रे शोधण्यासाठी करू शकता.. गूगल याहू वर जे परिणाम येऊ शकत नाहीत ते तुम्हाला इथे सहज सापडतील.
टिन आय उलट शोध: ह्या शोधकामुळे चित्रशोध आता अतिशय सोपा झाला आहे. प्रायोगिक तत्वावर आधारित या शोधकामधे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तूची प्रतिमा अपलोड करायची आहे आणि त्यानंतर ते तीच प्रतिमा किति ठिकाणी इंटरनेट वर आहे ते तुम्हाला सांगते. तुमचा फोटो किंवा एखाद्या सिनेतारकेचा फोटो टाकून पहा म्हणजे समजेल काय प्रकार आहे हा ..
गझापो: हे सुद्धा टिन आय सारखेच एक शोधक आहे.
गूगल स्विर्ल : हा एक नवीन वेब २.० प्रोजेक्ट आहे. जो गूगल् ने सुरू केला आहे .. यात नकाशा सारखे फोटो मांडले जातात आणि एकमेकांशी ते कसे जोडले आहेत दाखवले जाते..