Friday, 1 January 2010

गुगल आय एम इ - एक मस्त टंकलेखन सुविधा

गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय थोडी हलकी होते आणि आपल्या कॉम्प्युटरला फार त्रास ही होत नाही :D .. मी या व्हीडीओत हे कसे वापरायचे आहे ते दाखवले आहे.
तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा.. या प्रणाली पर्यंत जाण्याचा दुवा आहे www.google.com/ime/transliteration इथे.

नक्की वापरून पहा आणि सांगा मला कसे वाटले ते!

या पोस्टचे श्रेय मी देतोय प्रसाद दांडेकर याला ..
मित्रा,
ही  लिंक दिल्याबद्दल आभार!अतिशय कमी कष्टात मला मराठी टंकलेखन करणे सोपे जात आहे. आणि मी रोजच्या वापरत आता मराठी टंकलेखन करत आहे.

परत भेटूच लवकर .. तो वर  happy surfing !!