Monday, 15 March 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


 नेटविद्यार्थी ब्लॉगच्या वाचकांना व शुभचिंतकांना हे हिंदू - भारतीय नव सौरवर्ष भरभराटीचे आनंदाचे आणि सुखाचे जावो. विशेषत: ब्लॉगर्स साठी भरपूर वाचकांनी भरलेले व नव्या मैत्रीच्या संधी घेऊन येणारे ठरो ही मनोकामना.

Saturday, 13 March 2010

टेम्प्लेटसाठी दाहीदिशा ... पण आता नाही ...

blogger.com ने टेम्प्लेटसाठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल . हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत, तसेच अतिशय इंग्रजी मराठीचे मिश्रण केले आहे त्याबद्दल दिलगिर आहे .

Friday, 12 March 2010

आय पी एल online

आयपीएल ची सुरुवात तर दणक्यात झालीय ..  कोलकाता नाईट रायडर्स ने डेक्कन चार्जर्स वर बाजी मारलीय ..

पण काही लोकांना Sony max किंवा केबल उपलद्ध नसल्याने किंवा इतर कारणाने जर ते पाहता येत नसेल तर त्यानी नाराज व्हायचं कारण नाही. तुमची youtube व आय पी एल ने सोय केलेली आहे.  जर तुमच broad band  इंटरनेट जोडणी असेल तर तुम्ही आयपीएल च्या सर्व सामन्याची मजा online लुटू शकता .. अगदी फुल्ल्स्क्रीन !

Thursday, 4 March 2010

ई - पेपर गॅलरी


 ई - पेपर गॅलरी
इंटरनेटवर फिरताफिरता मला हे संस्थळ सापडलं, खरतर हे अनिवासी भारतीयांकारता एकदम पर्वणी आहे.  कारण इथे तुम्हाला भारतात जसे छापले  जाते तसेच्या तसे वर्तमान पत्र वाचायला मिळते पाहायला मिळते.  पण तुमच्या आमच्यासारख्यांना ही  चांगली सोय आहे ही ! हे आहे एक वर्तमानपत्र वाचनालय जस चौकाचौकात असत तसच .. विविध वर्तमान पत्रे जशी छापली जातात तशी इथे पाहायला मिळतील. त्याची  नेट आवृती असेल तर ती ही दिली जाते सोबत पण छापील आवृत्तीची नक्कल इथे असते हेच याच वैशिष्ट्य ..

Monday, 1 March 2010

मराठी मंडळी ..


मराठीब्लॉगर्स च्या ग्रूप ने स्थापन मराठीमंडळी.कॉम  केलेले हे संस्थळ .. आज रात्री १० वाजता सुरु झाले. या आधी मायबोली, मराठी माती, मनोगत, ffive.in, मिसळपाव अशी अनेक संस्थळे निर्माण ही झालेली आहेत. त्यांच्या  वाटचालीचे आपण साक्षीदार आहोतच . मराठी संस्थळ विश्वात अशी अनेक संस्थळे निर्माण होत आहेत आणि स्वत्व जपण्याच्या बरोबरच मराठीचे अस्तित्व निर्माण करत आहेत.
मराठी मंडळी बद्दल 
ही मंडळी आहेत भुंगा, पंकज झरेकर, अनिकेत समुद्र,  विक्रांत देशमुख, विशाल तेलंग्रे आणि आपण सर्व मराठी मंडळी !!