Thursday, 4 March 2010

ई - पेपर गॅलरी


 ई - पेपर गॅलरी
इंटरनेटवर फिरताफिरता मला हे संस्थळ सापडलं, खरतर हे अनिवासी भारतीयांकारता एकदम पर्वणी आहे.  कारण इथे तुम्हाला भारतात जसे छापले  जाते तसेच्या तसे वर्तमान पत्र वाचायला मिळते पाहायला मिळते.  पण तुमच्या आमच्यासारख्यांना ही  चांगली सोय आहे ही ! हे आहे एक वर्तमानपत्र वाचनालय जस चौकाचौकात असत तसच .. विविध वर्तमान पत्रे जशी छापली जातात तशी इथे पाहायला मिळतील. त्याची  नेट आवृती असेल तर ती ही दिली जाते सोबत पण छापील आवृत्तीची नक्कल इथे असते हेच याच वैशिष्ट्य ..
आणि हो , फक्त मराठीच नाही तर इतरही भाषातील अगदी देशातील विदेशातील ही बातम्या तुम्हाला इथे वाचून काढता येतील.  हा अनुभव अगदी खरा वाटणारा आहे. फक्त हातात कागद नसतो इतकाच. पण पेपर पेक्षा हे जास्त छान वाटलं मला हे वाचायला ..
इतकेच नव्हे तर इथे काही पुस्तके ही आहेत जी वाचायला मिळू शकतील.  या संस्थळाचा स्वत:चा एक सामाईक फलक आहे ज्यावर तुम्ही पुढील मागील पाने व अंक चाळू शकता.  शीर्षकावर एक निळी पट्टी येते ज्यावर तुम्ही हे नियंत्रक पाहू शकाल.

यात  Times of India, The Hindu, DNA, Asian Age तसेच मराठीत सामना, प्रभात ,सकाळ, मराठवाडा नेता, प्रहार, हिंदीत सामना, अमर उजाला, दैनिक भास्कर, इन दिनो अशी अनेक माहित  नसलेली किवा नियमित न पाहिली जाणारी  वार्तापत्रे पाहायला वाचायला मिळतील. या संस्थळाचे तुम्ही सदस्य ही होऊ शकता.
जरूर भेट द्या एकदा या इ पेपर गॅलरीला !