Tuesday, 19 July 2011

my hangout - नाव इंग्लिश, पुस्तके मराठी !परवाच्या रविवारी माझ्या कराडच्या काकांकडे गेलो होतो. त्यांनी काही पुस्तकं इंटरनेटवरून मागविली होती. दुपारी  त्याचं कुरिअर आलं होतं ते घेतलं तेव्हा काकांना विचारलं
मी : " बघा सगळी सहिसलामत आहेत ना ?? "
काका : "हो, सांगितल्याप्रमाणे व सहि सलामत...  "
मी :  " कुठून मागविलीत? लोकल आहे का ? "
काका : "नाही पुण्याचं आहे .. "
मी :  " मग मला सांगायचं ना .. मी आणली असती .. "
काका : "ते खरं रे पण तुला यायचं म्हणजे खर्च आहे आणि शिवाय तुला सवलत थोडिच मिळेल पुस्तकाच्या दुकानात ?"
मी : "म्हणजे ?"
काका: " अरे मी इंटरनेटवरून इ पेमेंट करुन मागविली होती ! "
इतकं सांगून ही मला तरी काही अशी उत्सुकता वाटत नव्हती. इंटरनेट्वरून मिळतात त्या सगळ्या गोष्टी स्वस्त पडतात अस नाही किंवा   पडल्याच  त्या धड घरी येतात असही नाही. दोनच पुस्तकं मागवून इतकी व्यवस्थित येणं हि कमाल होती पण तरी ही पुणेरी मनाने "असेल एखाद्या प्रकाशनाच वेबदुकान अस म्हणून सोडून देणार होतो .. "
पण मग काकांनीच ही वेबसाइट दाखवली . इथल्या एक एक सोयी पाहिल्या आणि चाट पडलो.


http://www.myhangoutstore.com/index.php
सवलतीचा दर.
पुस्तकाच्या मूळ किंमतीच्या ४०% पर्यंत सवलत उपलब्ध आहे .
उदा. मेहता प्रकाशनाचे " वाइज अ‍ॅन्ड अदर वाइज " जर घेतलं तर त्यांचा वेबसाईटवर ते १५०/- रुपयास उपलब्ध आहे पण इथे १४३/-.  
पोस्ट खर्च नाही, भारतातून कुठूनही मागवा !
कारण जर एकूण  मागविलेल्या पुस्तकांचे मूल्य १००/- पेक्षा जास्त असेल तर त्याचा पोस्ट खर्च आकारला जात नाही. तुम्ही जर खेड्यात रहात असाल आणि जर तुमच्या भागात कुरिअर नसेल तर स्पीड पोस्ट किंवा नेहमीच्या पोस्ट ने ३-५  कामांच्या दिवसात घरपोच येते
पैसे देण्याचे अनेक पर्याय
व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड अशा क्रेडिटकार्ड व नामांकित बॅकांच्या नेटबॅन्किंगची सोय. तसेच जर तुम्ही पुण्यात रहात असाल तर पे ऑन डिलीव्हरी ची ही सोय आहे.
पुस्तकाचे तपशील
पुस्तकाचं मूळ मूल्य , सवलत दर, त्याची बांधणी, मुखपृष्ठ, लेखक\लेखिकेच नाव, पुस्तकाची उपलब्धता, आणि किती दिवसात ते पुस्तक तुमच्या पर्यंत पोचेल याचे सर्व तपशील इथे व्यवस्थित वाचता येतील असे मराठी व इंग्रजीत लिहिलेले आहेत .
पुस्तक उपलब्ध नसेल तर ?
एखादं पुस्तक जर उपलब्ध नसेल तर जेव्हा ते होइल त्यावेळेस कळवा असे सांगण्याची सोय.
संवाद
काही अडचण असल्यास समजा इमेल केलीत तर  १-२ तासात उत्तर येते म्हणजे खरेदीपूर्व व नंतरही.