रविवार, १४ ऑगस्ट, २०११

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे
कामांची गडबड व धावपळ ही प्रत्येकालाच असते. कमीत कमी वेळात तुम्हाला अनेक कामांचा वेध घेत सगळे मोर्चे सांभाळायचे असतात.  ऑफिस, घर, वैयक्तिक अशी अनेक कामांची यादी आपल्याकडे सदैव तयार असते. जर तुम्ही तुमच्या कामांचे नियोजन नीट केले नाही तर तुमची कामे रहातात व मागे पडतात. अशा वेळेस तुम्हाला लागतो एक व्यवस्थापक, नियोजक !
जे लोक कॉम्प्युटर व मोबाईल मध्ये उपलब्ध असलेले नियोजक वापरतात , उदा. मोबाईल मधील दिनदर्शिका किंवा कॉम्प्युटर वरील outlook, thunderbird, sunbird अशी साधने वापरतात त्यांना प्रत्येक साधनातील काही उणीवा व फायदे माहीत असतात  व त्याने ते त्रस्त असतात. काही गुण हे खर्चिक असल्या कारणाने ते समाधानी नसतात. कधी कधी ते साधन फुकट असून ही उपयोगी ठरत नाही. तर कधी उपयोगी असते पण वापरा योग्य त्याचा interface नसतो. कधी कधी हे सर्व खूप क्लिष्ट असते.
यावर उपाय म्हणून काही जण इंटरनेटवरील साधने जसे todoist, todo.ly, remember the milk, google calender वापरतात व आपल्या कामांचे नियोजन करतात. वरील सर्व साधने वापरायला सोपी व सरळ आहेत. पण ज्यांना सतत इंटरनेट उपलब्ध नाही त्यानी काय करायचे ? या साधनांमधेसुद्धा [काही अपवाद सोडून ] काही साधने अर्ध-व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध असल्याने काही प्रमाणात तीही कमी पडतात. त्यातील काही महत्वाची व गरजेची  वैशिष्ट्ये वापरण्यासाठी तुम्हाला पैसे  द्यावे लागत असल्याने ती एक प्रकारे मागेच पडतात.



मागील आठवड्यात अशी साधने शोधत असताना
हे वंडरफुल साधन सापडलं ..

हे साधन वापरण्यासाठी तुम्हाला पहिले एक मोफत खाते उघडावे लागते. हे खाते उघडल्यावर तुम्हाला लगेचच हे साधन वापरता येते. हे याचे वेब स्वरूप. तसेच याचे desktop, mac, iphone, ipad, androd स्वरूप ही उपलब्ध आहे ते ही तुम्ही तुमच्या उपलब्ध मोबाईल व संगणकावर स्थापित करून घ्या.

आता याची वैशिष्ट्ये पाहू.
Wunderlist
यात नोंद करणे अगदीच सोपे असून त्यात तुम्हाला काही शब्दांनी दिवस ही नोंदवता येतो.
उदा. Buy stationary for office today आता यातील टूडे हा आजच्या तारखेला जोड्ला जातो आणि तारिख पडते. जर ते बदलायचे असेल तर तुम्हाला तारखेवर टिचकी मारल्यावर ते करता येइल.
lists
याद्या : तुमची कामे तुमच्या प्रकारा नुसार वेगवेगळया यादीत तुम्हाला लिहिता येतात. व त्या नुसार याद्या तयार करता येतात.
Wunderlist-notes
माहिती :
ह्या वंडर लिस्ट मध्ये तुमची कामे यात नोंदवता येतातच पण त्यावर त्याची अजून माहिती पण नोंदवता येते. हे फीचर वरील काही साधनांमध्ये व्यावसायिक [paid version] स्वरूपात आहे. 
sorting
वर्गवारी :
तुमची नोंदवलेली कामे तुम्ही Today, Tomorrow, next week, without date अशा वर्ग स्वरूपात पाहू शकता ..
देखणे रूप : आतापर्यंत पाहिलेले सर्व प्रकारच्या संगणकांवर व मोबाईल वर चालू शकणारे व अतिशय सुंदर दिसणारे असे हे साधन आहे. याचे वेब , विंडोज, माकिंतोष, आय ओ एस, अन्द्रोईड अशा वर्जंस मध्ये ही हे उपलब्ध आहे. व सर्व साधनांमध्ये हे एक सारखेच दिसते. त्यामुळे वापरताना गोंधळ होत नाही.तसेच एकदा तुम्ही तुमची कामे यात लिहिलीत कि तुम्ही तुमच्या अन्द्रोईड मोबाईल किंवा आय फोन वर तुम्ही हे साधन स्थापित  करायचे. त्यात तुमच्या खात्यावर नोंदवलेली सर्व कामे अद्यतनित होतात.  त्यामुळे केलेली कामे व करायची कामे यात तफावत येत नाही. यात तुम्ही तुमच्या कामातील काही कामे दुसर्‍याना इमेल ही करू शकता

मोफत व मुक्त स्त्रोत प्रणाली : हे साधन open source असल्याने तुम्हाला इथे तुमच्या अडचणींवर मात करायला मदतकेंद्र उपलब्ध आहे.
http://www.6wunderkinder.com/wunderlist/ मुद्दामच घाईघाईने यावर लिहिण्याच टाळलं कारण अशी अनेक साधने येत-जात असतात. म्हणून मी ते वापरून ही पाहिलं अतिशय वापरायला सोपं, देखणं, जलद अपडेट होणारे व मुख्य म्हणजे फुकट असलेलं हे साधन तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणूनच हा पोस्ट् लिहिला! कसे वाटले ते जरूर कळवा ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !