पोस्ट्स

सप्टेंबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोडनेम :< इंटरनेट />

इमेज
रामराम .. मी तुमच्यासारखाच एक इन्टरनेटचा चाहता.. सदैव या वेबसाईट मधून त्या वेबसाईटला जाणारा .. काहीना काही नवीन माहितीचे मार्ग शोधून त्याच्या तळापर्यंत जाणारा .. एक सर्फर .. वाटाड्या.. आणि आता तुमचा सोबती .. मी गेले ८ वर्ष हे माहितीचं जाळं वापरतोय. अनेक बदल .. तंत्रज्ञानाची क्रांति .. वेबसाईट्स ची नवी नवी डिझाईन्स. . नव्या सुविधा .. या माझ्या डोळ्यापुढे येत गेल्या आणि मी इथेच रमलो .. मग काय घडलं असं की मी हे नवं प्रकरण सुरू केलं ? छोटासाच किस्सा आहे. पण मजेशीर आहे.... रात्रीची साधारणत: १० ची वेळ, मी आणि घरातले सर्व गप्पा मारत गच्चीत पडलो होतो. आम्ही ब-याचदा असं गच्चीत आकाश न्याहळत गप्पा मारतो. आई शिक्षिका असल्याने तिच्या शाळेतल्या गमती कळतात. मी दिवसभर काय केल? ते मी शेअर करतो आणि असेच काहीही विषय.. आईनं अचानक विषय काढला. " आमच्या शाळेत ते ---- सर आहेत ना , त्यांची दोन्ही मुलं सद्ध्या इंटरनेट घरी वापरायला शिकलीयेत . या सरांच स्वत : "MS CIT " चं ट्रेनिंग झालंय त्यामुळे तिघंही इंटरनेट वापरतात " . त्यांच BSNL कनेक्शन आहे , ते परवा काय म्हणाल...