पोस्ट्स

ब्लॉग्गर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

इमेज
काहीतरी नवीन   हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

गूगल्ताय !! जरा जपून ..

सेवा का फुकट आहेत कधी विचार केलाय का ? कोणतेही वस्तू आज पर्यंत फुकट कुणालाही मिळाली नाहीय. मग गुगल इतक फुकट का देतं ? तुम्हाला वाटेल की जाहिराती आहेत. त्यांची वेब सेवा वापरताना लोक जास्त हिट्स करत असतील. आणि इतर काही अंदाज ही असतील तुमचे. मला ही काही असेच प्रश्न पडले होते म्हणून सहज शोध घेतला गुगल वरच . आणि हे सापडलंय ! जरा वाचून तर पहा ..

टेम्प्लेटसाठी दाहीदिशा ... पण आता नाही ...

blogger.com ने टेम्प्लेटसाठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल . हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत, तसेच अतिशय इंग्रजी मराठीचे मिश्रण केले आहे त्याबद्दल दिलगिर आहे .

मराठी मंडळी ..

इमेज
मराठीब्लॉगर्स च्या ग्रूप ने स्थापन मराठीमंडळी.कॉम  केलेले हे संस्थळ .. आज रात्री १० वाजता सुरु झाले. या आधी मायबोली, मराठी माती, मनोगत, ffive.in, मिसळपाव अशी अनेक संस्थळे निर्माण ही झालेली आहेत. त्यांच्या  वाटचालीचे आपण साक्षीदार आहोतच . मराठी संस्थळ विश्वात अशी अनेक संस्थळे निर्माण होत आहेत आणि स्वत्व जपण्याच्या बरोबरच मराठीचे अस्तित्व निर्माण करत आहेत. मराठी मंडळी बद्दल  ही मंडळी आहेत भुंगा, पंकज झरेकर, अनिकेत समुद्र,  विक्रांत देशमुख, विशाल तेलंग्रे आणि आपण सर्व मराठी मंडळी !!

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
काही संगणकासाठी wallpapers केले आहेत. ते तुम्हाला इथे मिळतील. या पानावर गेल्यावर डावीकडे download या शब्दावर टिचकी मारा. एक wallpaper.zip अवतरित होईल. त्याच्या आत तीन आकाराचे wall papers आहेत. आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या .. कस झालंय ते जरूर सांगा !! :) पुन्हा एकदा .. मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुगल आय एम इ - एक मस्त टंकलेखन सुविधा

गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय थोडी हलकी होते आणि आपल्या कॉम्प्युटरला फार त्रास ही होत नाही :D .. मी या व्हीडीओत हे कसे वापरायचे आहे ते दाखवले आहे.

स्प्रेडशीट कसे तयार् करायचे?

गूगल् मधे स्प्रेडशीट कसे तयार् करायचे त्या विषयीचा हा व्हिडीओ !

गूगल office !

इमेज
सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला.. " हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस " " हो ... गडबडीत विसरलोच ! " " आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. " " ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! " " ..  " " पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? " "हो" " मग चिंता मिटली .." " .. " " गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? " .... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! .. गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन त...

ब्लॉग रीडरला जोडताना !

इमेज
नमस्कार.. काय कशी वाटली ब्लॉग यंत्रणा.. ब्लॉग तयार केलात की नाही अजून ? नाही ? अरे मग करा ना लवकर! फुकट आहे .. इतकी सोय आहे .. एखादा करून पहायचा.. कळेल कसा प्रतिसाद मिळतोय ते! आणि केला असेल तर खाली तुमच्या अभिप्रायात लिहा की .. किंवा एखादी लिंक टाका नुसती .. असो .. मला माहित आहे तुमच्या मनात अजून ही शंका आहे की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या ब्लॉगवर कोण येणार? लोकांना काय स्वप्नं पडणार आहेत का मी ब्लॉग सुरू केल्याची? अगदी बरोबर आहे ही शंका.. माझ्याही मनात ती आली होती! .. [ ती म्हणजे लगेच शंकेने पाहू नका ! शंकेबद्दलच बोलत आहे मी! :D] असो.. तर त्यावर काही उपाय आहेत तेच सांगणार आहे आज ! दोन उपाय स्वत: गूगलच पुरवत आहे. एक म्हणजे गूगल रीडर आणि दुसरा तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या शेजारीच followers किंवा चाहते या नावाखाली दिसेल. हे काय आहे ते पहाण्यापूर्वी आपण नक्की ही संकल्पना काय आहे ते पाहू या ! खालील व्हिडीओ हा गूगलने स्वत: प्रकाशित केला आहे. इंग्रजीत आहे. न समजल्यास प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही..[ पण न समजण्याचा प्रश्न ही येत नाही असा हा व्हिडीओ आहे .. ] आणि हा ही एक व्हिडीओ पहा How to ...

नवे कागद - नव्या पोस्ट ..

ब्लॉगवर काहितरी फण्डू करत रहाणे माझा छंद आहे.. web designer आहेना! हा नवा बदल कसा वाटत आहे तुम्हाला .. पहा आणि कळवा ! मी आधी ही एक ब्लॉग चालवायचो .. त्यावरही खूप किडे करत मी तासंतास वेळ घालवला आहे. मजा येते.. कोड नव्हे कोडं सोडवल्या सारखं वाटतं.. कारण मी हे असंच डोकेफोड करत शिकत आलोय .. काही तरी नवीन करत रहायला आवडतच सगळ्याना .. आता हेच पहा ना ! जरा बदल म्हणून हे कागद प्रत्येक पोस्टच्या खाली सारलेत.. ते सारायाला इतकावेळ घातलाय की एवढ्यात ख-या कागदांची रद्दी घालून झाली असती ! हौसेला मोल नसतं म्हणतात तेच खरं .. यात मी एकावर एक टाकलेले कागद दाखवले आहेत आणि त्याना कापायला एक कट मार्क ही टाकला आहे .. तुम्हाला कसा वाटतोय हा छोटा बदल?

ब्लॉग कसा तयार करायचा ?

इमेज
मित्रांनो, कशी झाली ब्लॉगगिरी ? तुमचा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न केलात का नाही? असो.. नसेल केला तर ही तुमच्यासाठी खास पोस्ट .. ब्लॉग्गर.कॉम वर ब्लॉग कसा तयार करायचा? ह्या मध्ये आपण गूगलचे खाते कसे उघडायचे ते ही पहाणार आहोत आणि ब्लॉग्गरचे ही खाते कसे उघडायचे तेही पहाणार आहोत. पहा आणि तुमचे मत लिहा. परत भेटूच तोवर happy blogging !