देवनागरी लेखनाची सुलभ तंत्रे !
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे सर्वत्र आंग्लाळलेल्या या ई-विश्वात एक ना एक दिवस नक्की मराठी भाषेला चांगले दिवस येतील, अनेक लोक मराठी भाषेमधेच त्यांची संस्थळे निर्माण करतील, एकमेकांशी मराठी मधे विपत्र व्यवहार करतील, सर्वांना समजणा-या अशा भाषेतून जगातील नव नवे तंत्रज्ञान एक दिवस लोकांसमोर येइल.. अशी स्वप्ने उराशी धरून काही माणसं या नवीन ई-विश्वात मराठी भाषेचा विचार करून त्यावर प्रयोग करू लागली आणि त्यातून त्यांने अनेक नवनवीन तंत्रे यातून विकसित झाली. गमभन, लिपीकार, बरहा अशा मला माहित असलेल्या तंत्रांचा व त्या वरील माहितींच्या पोस्टसचा हा एक संग्रह.. तुमच्यासाठी देवनागरी लेखन करण्यासाठी मायबोली.कॉम हे मराठीतील पहिले संस्थळ.. त्याचा उल्लेख करून आता पुढील यादीला सुरुवात करतो ! :) गमभन लेखन पद्धती ह्या प्रणालीमधे आपण प्रमुख भारतीय भाषांमधे टंकलेखन करू शकतो. अनेक संस्थळे जसे मनोगत.कॉम, मिसळपाव.कॉम, मराठीब्लॉगविश्व ही या प्रणालीच्या तंत्रावरच काम करत आहेत. त्यात मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराथी, गुरूमुखी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगू या प्रमूख भाषांचा समावेश आहे.गमभन लेखन पद्धत...