पोस्ट्स

नोव्हेंबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निषेध ! निषेध .. त्रिवार निषेध ..

इमेज
काळरात्री कशाचीही पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी स्वत्वाचा होम करणा-या सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. या हल्ल्याचा निषेध म्हणून तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून नेटवि्द्यार्थीवर पुढील आठवडा वरील चित्रकडेच्या मथळ्यात लावणार आहे. त्याच बरोबर काळ्यारंगाची पार्श्वभूमि राहील. माझी वैयक्तिक विनंती आहे की हे चित्र तुम्ही ही तुमच्या ब्लॉगच्या दर्शनी भागात लावून हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली व्यक्त करावी. ही नम्र विनंती

ब्लॉग रीडरला जोडताना !

इमेज
नमस्कार.. काय कशी वाटली ब्लॉग यंत्रणा.. ब्लॉग तयार केलात की नाही अजून ? नाही ? अरे मग करा ना लवकर! फुकट आहे .. इतकी सोय आहे .. एखादा करून पहायचा.. कळेल कसा प्रतिसाद मिळतोय ते! आणि केला असेल तर खाली तुमच्या अभिप्रायात लिहा की .. किंवा एखादी लिंक टाका नुसती .. असो .. मला माहित आहे तुमच्या मनात अजून ही शंका आहे की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या ब्लॉगवर कोण येणार? लोकांना काय स्वप्नं पडणार आहेत का मी ब्लॉग सुरू केल्याची? अगदी बरोबर आहे ही शंका.. माझ्याही मनात ती आली होती! .. [ ती म्हणजे लगेच शंकेने पाहू नका ! शंकेबद्दलच बोलत आहे मी! :D] असो.. तर त्यावर काही उपाय आहेत तेच सांगणार आहे आज ! दोन उपाय स्वत: गूगलच पुरवत आहे. एक म्हणजे गूगल रीडर आणि दुसरा तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या शेजारीच followers किंवा चाहते या नावाखाली दिसेल. हे काय आहे ते पहाण्यापूर्वी आपण नक्की ही संकल्पना काय आहे ते पाहू या ! खालील व्हिडीओ हा गूगलने स्वत: प्रकाशित केला आहे. इंग्रजीत आहे. न समजल्यास प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही..[ पण न समजण्याचा प्रश्न ही येत नाही असा हा व्हिडीओ आहे .. ] आणि हा ही एक व्हिडीओ पहा How to ...

नवे कागद - नव्या पोस्ट ..

ब्लॉगवर काहितरी फण्डू करत रहाणे माझा छंद आहे.. web designer आहेना! हा नवा बदल कसा वाटत आहे तुम्हाला .. पहा आणि कळवा ! मी आधी ही एक ब्लॉग चालवायचो .. त्यावरही खूप किडे करत मी तासंतास वेळ घालवला आहे. मजा येते.. कोड नव्हे कोडं सोडवल्या सारखं वाटतं.. कारण मी हे असंच डोकेफोड करत शिकत आलोय .. काही तरी नवीन करत रहायला आवडतच सगळ्याना .. आता हेच पहा ना ! जरा बदल म्हणून हे कागद प्रत्येक पोस्टच्या खाली सारलेत.. ते सारायाला इतकावेळ घातलाय की एवढ्यात ख-या कागदांची रद्दी घालून झाली असती ! हौसेला मोल नसतं म्हणतात तेच खरं .. यात मी एकावर एक टाकलेले कागद दाखवले आहेत आणि त्याना कापायला एक कट मार्क ही टाकला आहे .. तुम्हाला कसा वाटतोय हा छोटा बदल?

ब्लॉग कसा तयार करायचा ?

इमेज
मित्रांनो, कशी झाली ब्लॉगगिरी ? तुमचा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न केलात का नाही? असो.. नसेल केला तर ही तुमच्यासाठी खास पोस्ट .. ब्लॉग्गर.कॉम वर ब्लॉग कसा तयार करायचा? ह्या मध्ये आपण गूगलचे खाते कसे उघडायचे ते ही पहाणार आहोत आणि ब्लॉग्गरचे ही खाते कसे उघडायचे तेही पहाणार आहोत. पहा आणि तुमचे मत लिहा. परत भेटूच तोवर happy blogging !

संस्थळांचे प्रकार - २

इमेज
संस्थळांचे प्रकार या विषयाला येण्याच एक कारण आहे की आता तुम्हाला Internet explorer मधून संस्थळे पहाता येत असतील, हे नक्कीच पण यात खूप काही करण्याची ताकद आहे हे ही लक्षात आले असेल. आता तुमचा internet म्हणजे विश्वजालातला प्रवास आणखी बहुरंगी करण्याकरताच आता मी काही वैशिष्ट्यपूर्ण संस्थळांची माहिती पण इथे देणार आहे. त्याचबरोबर दुसरं कारण असं की आजच्या ट्रेंड बद्दल तुमच्या मनात जे कुतूहल जागं झालंय आणि ज्यामुळे तुम्ही विश्वजालात त्याची माहिती घेण्याकरता आला आहात त्याच समाधान करणं ! आपण आता पर्यंत संस्थळांच्या शेवटच्या किंवा आडनावावरून त्यांचे प्रकार पाहिले. .com, .co.in, .net वगैरे वगैरे .. आता त्यांच्या उपयोगानुसार प्रकार पाहू. अगदी ढोबळमानाने विश्वजालातल्या संस्थळांचे static , dynamic असे दोन मुख्यप्रकार आहेत आणि त्यातिल dynamic मध्ये आत्ताचे म्हणजे तथाकथित web 2.0 चे प्रकार येतात. forums, Blogs, Portals, Matrimony, Real estate portals, Community websites, Social networking websites, Portfolios, e-commerce, Online services आणि अनेक इतरही ! आज आपण ब्लॉग या प्रकाराची माहिती घेऊ. हा ब्लॉग...

इंटरनेट एक्स्प्लोरर - ०२

इमेज
ब्राऊझर्सचा इतिहास पहाता. सगळ्यात जुन्या म्हणजे www या ब्राऊझर कडे जावे लागेल. हा डॉस वर आधारित ब्राऊझर होता आणि त्याला अनुसरूनच पुढे ब्राऊझर तयार केले गेले. पण खरी लोकप्रियता मिळाली ती netscape navigator या ब्राऊझरला. या ब्राऊझर मधे डॉसची क्लिष्टता नव्हती आणि [वेबसाईट्स] संस्थळे पहाणे अगदीच सोपं झाले होते. या नंतर खरतर इंटरनेट्च्या जगात क्रांति झाली. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले. संस्थळे दाखवण्याच्या नव नवीन पद्धती निर्माण होऊ लागल्या. या काळात इतरही ब्राऊझर्स आले जसे की viola, Lynx, Mosiac cello आणि त्यानंतर झाला Internet Explorer चा जन्म! हा ब्राऊसर सर्वात जास्त काळासाठी वापरला गेला कारण हा विंडोज या संगणक प्रणाली बरोबर येतो आणि त्यामुळे याचे वापरकर्ते ही जास्त आहेत. आता या ब्राऊसर ची ८वी आवृत्ति येत आहे.आणि लवकरच आपण त्यातील ही काही खुबी पाहूच. पण आता सध्या IE6 चा वापर करू या! हा IE६ चा interface GUI म्हणजे चेहरा मोहरा आहे. ज्याला पाहून आपण काही आज्ञांचा वापर करून विश्वजालाची [internetची] माहिती घेत असतो. menu bar - यातून आपण आज्ञा देऊ शकतो. यात ठराविक आज्ञांचे संच आहेत ...

संस्थळांचे प्रकार

www.yourwebsite. com वरील वाक्यातला .com हा जो शब्द आहे तो आहे त्या संस्थळाचा प्रकार.थोडक्यात आपलं जसं आडनाव असतं तसच आहे हे.. जसं सुनील जोशी आणि रमेश जोशी हे वेगवेगळे आहेत पण तरी ते जोशीच आहेत हे कळतं त्यातलाच हा प्रकार. उदाहरणच घ्यायच झालं तर yahoo.com,आणि google.com, तसंच काही जण गावाचं नाव लावतात. उदा. शंकरराव सातारकर-पाटील, तसंच आहे yahoo.co.in म्हणजे याहूचे भारतातील व्यावसायिक संस्थळ ! आता पाहूया, या संस्थळां[websites]चे अजून काय्क्काय प्रकार आहेत ते ! .com - Commercials या प्रकारच्या संस्थळांवर व्यवसायिक माहिती असते. सामान्यत: या प्रकारामध्ये सर्व औद्योगिक आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांची माहिती देणारी संस्थळे येतात. पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन ठेवूनच हे संस्थळ निर्माण केले जाते. उदा. www.borateconstructions.com - ही एक व्यावसायिक बांधकाम करणारी संस्था आहे. .org - organizations या प्रकारच्या संस्थळांमध्ये सर्व सामाजिक काम करणा-या, लोकसेवा करणा-या संघटना येतात. NGOs येतात. या मध्ये संस्थळांमधून कोणत्याही प्रकारे आर्थिक उत्पन्न कमविणे हा उद्देश नसतो किंवा असल्यास तो दुय्यम असतो. उ...

मराठी प्रतिशब्द उपक्रम

इमेज
मराठी असे आमुची मायबोली । जरी आज ती राजभाषा नसे ॥ मराठी अमराठी वाद सध्या जोरात चालू आहेच त्यातच माझ्या वाचनात ब्लॉगमित्र शैलेश खांडेकर यांचा ” विदग्ध ” हा ब्लॉग [ ही अनुदिनी] आला/ आली. :) माझ्या वाचनात २-१ वर्षापूर्वी ही हा उपक्रम मनोगत.कॉम च्या द्वारे वाचनात आला होता. पण तो त्यावेळेस अगदी छोटया स्वरूपात होता. आता ह्या उपक्रमाने जोर धरला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रतिशब्द शोधून शब्दभांडारात टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि मी ही त्या उपक्रमाचा भाग होत चाललो आहे अस मला वाटत आहे.मी सुचवलेले शब्द केशरी रंगात दिले आहेत त्या पैकी काही शब्द खाली देत आहे. वरील शब्दांमधील रंगीत शब्द हे त्या त्या वेबसाईट्स चे [संस्थळांचे] पत्ते आहेत. मायाजाळ, विश्वजाल, ज्ञानगंगा [ज्ञान + आकाशगंगा] - internet संस्थळ - website - a place on internet. पत्र, विपत्र - email चिट्ठी, चिटोरी, चपाटी - scraps वटवट, गप्पा, चकाट्या - chat वापरिका- application दूरावलोकन - Zoom Out या उपक्रमात मला काही शब्द पटले काही नाही पटले. काही जड ही वाटले. पण त्या उपक्रमामागचा उद्देश नक्कीच योग्य आहे. तुम्ही जर नव्यानेच या इ...