शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं..
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न !
शेतकर्याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते. अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे.