Google - art museum
.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा .. गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल स्वत:च्या लोगो मधे सदोदित काही सन्देश देणारी चित्रे घालून संदेश देतच असते. चित्रकलाच नव्हे तर एकूणच दृश्यकलेचा खजिना लोकांसमोर सहज उपलब्ध करण्यासाठीच गूगलने हे " आर्ट प्रोजेक्ट " सुरु केले आहे. यामध्ये तुम्ही जगातिल नामांकित संग्रहालयाच्या काही खास दालनांना भेट देऊ शकताच पण कलाकृतिंचा आनंद अगदी जवळून म्हणजे काही इंचावरून घेऊ शकता. गूगल मॅप्स प्रमाणेच याही संस्थळाचे निर्माण केले गेले आहे. वापरायला सोपे आणि सहज. वरील चित्रात जे दिसत आहे ते आहे गूगल आर्ट प्रोजेक्टच पहिल पान. इथे तुम्हाला संग्रहालयांची यादी मिळते. त्यातून तुम्ही संग्रहालय किंवा कडेच्या चित्रावर टिचकी जरी मारलीत तरी तुम्हाला संग्रहालयात प्रवेश मिळतो