पोस्ट्स

सोशल नेटवर्क लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बळीराजा.कॉम - पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

इमेज
शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं.. पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न ! शेतकर्‍याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते.  अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. 

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

इमेज
काहीतरी नवीन   हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

फेसबुक - व्हिडीओ चॅट

इमेज
गूगल प्लस च्या व्हिडीओ चॅटच्या येण्यानं असलेले ग्राहक टिकवता टिकवता फेसबुकच्या तोंडाला फेस येऊ शकतो हे जेव्हा फेसबुक चालकांच्या लक्षात आलं, तेव्हाच त्यांनी ही सेवा लवकरात लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याच त्यांनी ठरवलं व तसं  मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या निर्मात्याने नुकतच जाहीरही केल . त्याच्या म्हणण्यानुसार या आठवड्यातच स्काईप या व्हिडीओ चॅटिंग साठी प्रसिद्ध असलेल्या सेवेला सोबत घेऊन फेसबुकने ही सेवा सुरु केलेली आहे.