सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला.. " हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस " " हो ... गडबडीत विसरलोच ! " " आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. " " ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! " " .. " " पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? " "हो" " मग चिंता मिटली .." " .. " " गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? " .... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! .. गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन त...