हल्ला .. आणि सुटका..
खूप दिवसानी आज काही तरी लिहीत आहे .. त्या मागे कारण ही तशीच आहेत.. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्या नंतर काहीच लिहावंस वाटत नव्हतं ना काही उत्साहान कराव वाटत होत.. थोडासा त्यातून बाहेर पडत होतो तोवर माझ्यावर अतिरेकी हल्ला झाला ..घाबरू नका मी अगदी सुरक्षित आहे. दोन दिवस झुंज देऊन एक एक करून ४५ अतिरेकी मारले आणि मगच ही पोस्ट लिहायला बसलो आहे. समाजात घुसून किंवा वसती करून रहाणा-या व त्याच समाजास घोर हानि पोहोचवून विकृत आनंद मिळणा-या लोकांना आपण आतंकवादी अथवा अतिरेकी म्हणतो. माझ्याही बाबतीत असंच घडलं पण थोड वेगळं.. माझ्याच संगणकात काही काळ राहून इतरत्र पसरून स्वत:ची मुले बाळॆ वाढवून अचानक एका संगणकीय विषाणू ने माझ्या संगणकावर हल्ला केला. माझ्या हार्डडिस्कची सर्व दारे त्याने बंद केली आणि त्यामुळे मला काहीही वापरणे अशक्य झाले होते.. माझ्या संगणकावर नेहमीचे काही विषाणूरोधक [anti viruses] होते पण त्यानाही शेंडी लावून हे पसरले होते.झालं... माझं मस्तक पिसाळलं .. सुदैवाने मला [internet] मायाजालाचा संपर्क करता येत होता आणि त्यामुळे मला प्रतिकार करण शक्य झालं, AVG Antivirus , NOD 32 , AVAST , Sting...