गुरुवार, २१ जुलै, २०११

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

काहीतरी नवीन  हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

मुळात अशा इमेल्स का फिरत आहेत ?
  • यामागे पहिल कारण मला दिसत ते हे की काही लोक अजुन ही मनाने २००० सालाच्या पुढे आलीच नाहीत. अजून ही एखादा लेख किंवा चित्रे, फोटो पाठवण्यासाठी आपल्याला साधी सरळ सोपी अशी लिंक आहे ती आपण पाठवू शकतो हे लोकांच्या लक्षात येत नसावं, सरळ कॉपी व पेस्ट आणि इमेल पाठवायची. बर त्यात ही गैर नाही हो .. चांगलं वाटलं म्हणून पाठवली चार जणांना .. पण त्यात मूळ कलाकाराचा काही पत्ता नाव ठेवाल की नाही. असो
  • दुसरं मुख्य कारण आहे की काही कार्यालयांमध्ये इमेल व्यतिरिक्त काहीही वापरता येत नाही. आणि त्यामुळे वेबसाइटचा मजकूर कोणीतरी कॉपी करून पाठवला की तो फॉरवर्ड होत रहातो,
  • अजून ही कारणं असू शकतील ..
    कोणी माझ्य इमेल्स किती वेगळ्या असतात हे दाखवायला ही असं करत असेल ..किंवा माझी मेल किति ठिकाणी फिरते ते पहायला ही !
मला या वर जो उपाय सुचला तो काही फार क्रांतीकारी नाहीय किंवा अज्ञात ही नाही. खूप लोकप्रिय आहे पण खूपदा असं दिसतं की जे जाहिरातबाजी करून आपल्या वेबसाईट्स चालवत असतात तेच मुख्यत्वे करून अशा उपायांचा वापर करताना दिसतात. आणि चांगले चांगले ब्लॉग्स अशा उपायांचा [ साधं सोपा सुटसुटीत ब्लॉग रहावा  किंवा कशाला हवीत ही नाटकं! ] म्ह्णून वापर करताना दिसत नाहीत. काहीच मोगराफुलला , माझी सह्यभ्रमंती, भानस  , काय वाट्टेल ते!मन उधाण वार्‍याचे   मोजके ब्लॉग्गर्स असे पर्याय उपलब्ध करून देताना दिसतात.
आता हे उपाय काय आहेत ?
सोशल विजेट्स आणि RSS फ़ीड्स. फेसबुक ट्विटर सारखे लिंक्स इमेज शेअरिंगचे पर्याय असताना कशाला फॉरवर्डेड मेल्स पाठवाव्यात? लोक सहज पणे फेसबुक किंवा ट्विटर वरून तुमचे लेख फोटो अगदी तुमचे क्रेडिट्स राखून शेअर करु शकतील आणि कॉपी पेस्ट करण्यासाठी जेवढावेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात ! फक्त ब्लॉगमालकाने ते पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवेत व ठळकपणे दिसतील असे ठेवायलाही हवेत.
त्यासाठी तुम्हाला फक्त ब्लॉगर अथवा वर्ड प्रेस वर योग्यती विजेट्स जोडायची आहेत.
त्याकरता वर्ड्प्रेस्स किंवा ब्लोग्गर च्या डिझाईन एडिटर मध्ये जावून पोस्त सेटिंग मध्ये बदल करायचे आहेत.
social sharing widgets for wordpress
social buttons for blogger
ज्यांना फक्त इमेलच वापरता येते त्यांच्यासाठी ही तुम्ही सोय करू शकता!
 
subscribe by email  ही एक अशी सोय आहे ज्याने तुमचे लेख प्रसिद्ध झाल्या झाल्या लोकांना इमेल जाते व लोक लेखांचा आनंद घेऊ शकतात . या करता तुम्हाला वरील प्रमाणेच ब्लोग्गर व वर्डप्रेस करताची विजेट्स जोडायची आहेत.
वर्डप्रेस्स मधे ते subscribe by email अशा नावाने विजेट भागात मिळेल तर ब्लॉग्गर मध्ये डिझाइन एडिटर मधे add gadget या भागात .
ब्लॉग्गर मधे तुम्ही जेव्हा हे विजेट जोडता त्यानंतर तुम्हाला जर फीडर लिंक FeedBurner URL विचारली जाते. त्यानंतर खालील प्रमाणे ती तयार करता येइल.
१. feerburner.com इथे जा. ते तुम्हाला गूगलच्या खाते सेवा लॉगिनकडे नेइल.
२. त्यानंतर गूगल खात्याचे नाव व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
३. तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल. त्यात खालीलप्रमाणे दिसणार्‍या रकान्यात तुमच्या ब्लॉगची लिंक टाका. व नेक्स्ट वर टिचकी मारा.
My Feeds - Google Chrome_2011-07-22_11-20-16
 ४. त्यानंतर तुमची फ़ीड identify करण्यासाठी योग्य पर्याय निवडून नेक्स्ट वर टिचकी मारा. ५. इथे तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाइल व फ़ीड लिंकही. 
Point your feed here. We'll do the rest   
त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट वर टिचकी मारून पुढे जा.
 ६. खालील प्रमाणे दाखविलेलि लिंक कॉपी करा.
Point your feed here. We'll do the rest2
Blogger
व ती ब्लॉगर ने विचारलेल्या रकान्यात घालून सेव्ह करा. तुमचे विजेट ठळक दिसेल असे ठेवा व डिझाईन सेव्ह करा.
या सेवेत भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.  अजूनही काही माहिती हवी असल्यास नक्की कमेंट ने कळवा. पुढील पोस्त त्यावर ही लिहिता येईल .. :) ता. क. पोस्त थोडी मोठी झालीय .. पण उपयोगी पडेल ही अपेक्षा आहे !

६ टिप्पण्या:

  1. एकदम माहितीपूर्ण लेख...!!

    सगळ्यांनी या सुविधांचा वापर केला, तर ब्लॉगचोरीला देखील काही प्रमाणात आळा बसेल. नाही तर कोणीही इमेलमध्ये आलेला लेख म्हणून, स्वतःच्या ब्लॉगवर चिटकवून टाकतो... हे थांबायला हवं !!

    उत्तर द्याहटवा
  2. फीडच्यासंदर्भात दोन लेख लिहायला घेतले होते, ब्लॉगवालेसाठी. तुझ्या या लेखाची लिंक त्यात टाकते. एकदम माहितीपूर्ण.

    उत्तर द्याहटवा
  3. फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
    ब्लॉगच्या सेटींग्जमध्ये जो पोस्ट फीड फूटर चा ऑप्शन असतो, त्यात ब्लॉगच्या विजेटचा कोड देता येईल का? तिथे ब्लॉगच्या विजेटचा कोड घातल्यावर तो फक्त इमेलमध्येच दिसेल की ब्लॉगच्या पोस्टवरही दिसेल? कृपया या बाबतीत मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद सुहास, कांचनताई !
    @अनामिक : खरंतर तुम्हाला मी उत्तर देणार नव्हतो कारण तुम्ही तुमची ओळख लपवली आहे. पण तुम्ही प्रश्न असा विचारला आहे की ज्याला मी जर उत्तर दिले तर ते अजून चार लोकांनाही उपयोगी पडेल! :)
    होय फ़ीड फूटरच्या रकान्यात तुम्ही जे काही लिहाल ते प्रत्येक पोस्टच्या शेवटी ्फीडरीडर मध्ये दिसते. मग ती जाहिरात असो वा तुमचे नाव.
    पोस्तवर अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  5. @अनामिक : खरंतर तुम्हाला मी उत्तर देणार नव्हतो कारण तुम्ही तुमची ओळख लपवली आहे.

    -- तुम्ही तुमच्या ब्लॉगवर अनामिक म्हणजेच ओळख न देता कॉमेंट लिहिण्याचा पर्याय उपलब्ध ठेवला आहे आणि तोच मी वापरला आहे. तुम्ही स्वतःहूनच हा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर तुमचा हा ओळख लपविण्याचा मुद्दाच गैरलागू ठरतो.

    तुम्हांला जर ओळख न देता अनामिकपणे येणार्‍या कॉमेंट्स नको असतील, तर तुमच्या कॉमेंट लिहिण्याच्या पर्यायात तुम्ही तसा बदल करायला हवा किंवा कॉमेंट फॉर्मवर तसा स्पष्ट उल्लेख तुम्ही करायला हवा.

    प्रत्येकवेळी अनामिकपणे येणारी कॉमेंट ही ब्लॉगरला टीझ करण्यासाठीच असते, असं नाही. कधीकधी कामाच्या गर्दीत एखादा चांगला ब्लॉग वाचायला मिळाला आणि वेळ कमी असेल, तर माझ्यासारखी व्यक्ती साइन इन करण्यात वेळ वाया न घालवता अनामिकचा पर्याय वापरूनही कॉमेंट देते. आणि त्यातूनही माझी अशी कॉमेंट तुम्हांला नको असेल, तर माझी ही आणि आधीचीही कॉमेंट तुम्ही ब्लॉगरच्या नात्याने खुशाल डीलीट करू शकता :-)

    - एक वाचक

    उत्तर द्याहटवा
  6. @अनामिक : खरं आहे तुमचं म्हणणं . मी तो पर्याय उपलब्ध ठेवलाय आणि तो कशासाठी आहे हे माहित आहे म्हणून उपलब्ध ठेवलाय.
    ज्याना गूगल किंवा ब्लॉगर किंवा कुठलेच खाते तयार करायचे नाहीय पण तरीही इथे अभिप्राय द्यायचा आहे अशांसाठी हा पर्याय आहे. हे तुम्हालाही माहित असेलच पण यात फक्त शब्दश: अर्थ तुम्ही घेतलात याच वाइट वाटलं .
    तुम्ही तुमची भले इमेल खाते गूगल खाते इथे जोडून अभिप्राय देऊ नका हो .. पण तुमच असलेल नाव खाली लिहू शकता ना ! इतकाच काय तो माझ्या म्हणण्याचा अर्थ. मला चांगले अभिप्राय हवे आहेत म्हणूनच मी तो पर्याय चालू ठेवलाय पण जरी तो अनामिक या नावा खाली असला तरी तुम्ही तुमचं नाव लिहिलंत तर तुमच्याशी संवाद साधायला अजुन चांगलंच वाटेल ना!
    गडबडीत अभिप्राय लिहिताना आपलं नाव लिहायला असा किती वेळ लागेल. असो .. तुम्ही वेळ काढून ब्लॉगला भेट देत असालच, यापुढेही देत रहा
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !