.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा ..
गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल स्वत:च्या लोगो मधे सदोदित काही सन्देश देणारी चित्रे घालून संदेश देतच असते. चित्रकलाच नव्हे तर एकूणच दृश्यकलेचा खजिना लोकांसमोर सहज उपलब्ध करण्यासाठीच गूगलने हे " आर्ट प्रोजेक्ट " सुरु केले आहे.
यामध्ये तुम्ही जगातिल नामांकित संग्रहालयाच्या काही खास दालनांना भेट देऊ शकताच पण कलाकृतिंचा आनंद अगदी जवळून म्हणजे काही इंचावरून घेऊ शकता. गूगल मॅप्स प्रमाणेच याही संस्थळाचे निर्माण केले गेले आहे. वापरायला सोपे आणि सहज.
वरील चित्रात जे दिसत आहे ते आहे गूगल आर्ट प्रोजेक्टच पहिल पान. इथे तुम्हाला संग्रहालयांची यादी मिळते. त्यातून तुम्ही संग्रहालय किंवा कडेच्या चित्रावर टिचकी जरी मारलीत तरी तुम्हाला संग्रहालयात प्रवेश मिळतो
तुम्ही निवडलेल्या संग्रहालयाच्या अगदी नकाशा पासून ते त्याच्या पूर्व इतिहासाबद्द्ल पण इथे तुम्हाला माहिती मिळते. ‘navigate floor plan' वर टिचकी मारलीत कि तुम्हाला खालील प्रकारे माहिती मिळॆल.
उजव्या हाताच्या उभ्या काळ्या रकान्यात मध्यभागी आहे तो चक्क नकाशा आहे. त्याने तुम्ही हव्या त्या दालनात जाऊ शकता. किंवा डाव्या बाजूच्या त्रिमित चित्रांमधे भिंतीवरच्या कोणत्या ही चित्रावर टिचकी मारल्यास तुम्ही त्या चित्राच्या जवळ जाऊन पोहोचता.
तसेच कडेच्या चित्रात तुम्हाला जो उजव्या हाताला खाली झूमयंत्र दिसत आहे ना त्याने तुम्ही चित्र जवळून पाहू शकता.
मला खात्री आहे तुम्हाला हे गूगलच आर्ट प्रोजेक्ट नक्की आवडेल. कसं वाटलं ते जरूर कळवा
गूगलच्या आर्ट प्रोजेक्टला भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.
http://www.googleartproject.com/
वीरेंद्र जी ..........तुम्ही लई भारी काम करताय ........तुम्ही पोस्ट करत असलेल्या बऱ्याचश्या गोष्टी आधीपासून माहित असतात पण तरीही ते मराठीतून वाचायला भारी वाटत.....
उत्तर द्याहटवाचालुदेत....भारी चाललंय ...!
धन्यवाद प्राश !
उत्तर द्याहटवा