शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

Google - music

online music ऐकणार्‍यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत raaga.com किंवा dhingana.com वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com, saavan.com saregama.com अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...


नवीन प्रयोग आहे म्हणुन मी भेट दिली. मला वाटलं की क्रीएटिव्ह कॉमन्स किंवा जुनी गाणी असतील. जसं यु ट्यूब वर आहे. पण इथे तर चक्क नवप्रदर्शित दबंग, i hate love storys, ब्रेक के बाद तसेच लगान, गोलमाल३, दिल्ली ६ अशा प्रतिथयश चित्रपटांच संगीत इथे ऐकायला मिळत आहे व तेही फुकट! हां ! दर्जा अजुन इतका चांगला नक्कीच नाहीय ! पण अगदीच नसण्यापेक्षा काय वाईट आहे ?? या शिवाय तुम्ही तुमची आवडती गाणी फ़ेसबुक जीमेल बज्झ वर सुद्धा इतरांना पाठवू शकता. याहून अजुन काय पाहिजे??

समोर आलेल्या यादीतून हव्या त्या अल्बम वर टिचकी मारा किंवा शोध घ्या आणि समोर आलेल्या यादीतून गाणे सुरु करा. हेडफोन्स असतील तर मजा जास्त येते, कारण मोठ्या आवाजाला हा दर्जा इतकासा चांगला नाहीय.. शिवाय गाणे दुसर्‍या विंडोत सुरु होत असल्याने तुमच सर्फिंग सुद्धा थांबत नाही! पण एक उणीव म्हणजे यादी करुन गाणी लावून ठेवता येत नाहीत.
 इथे जुने व नवे चित्रपट आहेतच पण सर्व माहिती अगदी व्यवस्थित वेगवेगळी वर्गिकरण केलेली मिळते. तसेच दिलेली माहिती खरी असावी असेही वाटत आहे.



{ता. क. : इथे सर्वच भाषांची गाणी आहेत हो !! मराठी मध्ये अगदी लोकल अल्बम्स ते नवे अल्बम्स ही..  ते ही गूगल सजेशन्स च्या माध्यमातून ... :) मान गये गूगल !! }
समजा सलमान खान च्या नावावर टिचकी तुम्ही मारलीत तर त्याचे सर्व असलेले चित्रपट इथे तुम्हाला दिसु लागतील. अशाच प्रकारे ए. आर. रेह्मान च्या नावावर  टिचकी मारल्यावर ६६५ शोध मिळाले आहेत. दिलिप कुमार, राज कपूर यांच्या काळातील गाणी पण उपलब्ध आहेत. फक्त आता हवे आहेत श्रोते !! तुम्ही लगेच क्लिक करुन जर सुरु केलं असेल तर ही पोस्ट इथ पर्यंत वाचत असताना एखादे गाणे संपत ही आले असेल ..

माझ्या मते पायरसीच्या उद्योगाला आळा बसण्यासाठी एका मोठ्या कंपनीने घेतलेले मोठे पाऊल आहे. यामुळे पायरेटेड एम पी ३ डाऊनलोड होणं थोड तरी कमी होइलच! तुम्हाला काय वाटतं?

So ..  Stop piracy ! enjoy music !!

३ टिप्पण्या:

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !