गेल्या पोस्टमध्ये आपण स्पॅम म्हणजे काय पाहिलं आणि त्या आधिच्या पोस्टमध्ये ब्राऊझर म्हणजे काय ते ! आता आपण ब्राऊझर मधल्या काही छोट्या गोष्टी पहाणार आहोत. ज्या मी येत्या प्रक्षेपणात दाखवणार आहेच पण आपण काय काय पहाणार आहोत याचा हा एक आलेख आहे म्हणाना ! मला राहून राहून या ब्राऊझरला समजावून सांगताना नावेचं आणि नावाड्याचं उदाहरणच द्यावस वाटतय .. नावांचे - होड्यांचे जसे प्रकार असतात तसेच या ब्राऊझरचे ही आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने, वापराच्या दृष्टीने काही उपयोगी ठरणारे आहेत तर काही जुने पण stable म्हणून प्रसि्द्ध आहेत. सर्व सामान्यनजरेने पाहिलं तर या ब्राऊझर प्रकारच्या applications [संगणक प्रणाली / आज्ञावली ] मध्ये आपण खालील सोयी पहातोच पहातो.
तसेच काही ठराविक आज्ञाही पाहातो.
- history - या मधे आपण आता पर्यंत पाहिलेल्या सर्व माहितीस्थानांची [websites] माहिती येते. आपण कधी केंव्हा किती वेळ कोण कोणती पाने चाळली ते पहाता येते.
- bookmarks / favorites - आपण इथे आपल्यला आवडलेल्या पानांची नोंद करून ठेवू शकतो जे आपण नंतर परत कधी / वारंवार वापरू शकतो. जसे आपण पुस्तक वाचताना पुस्तकामधे एखादी खूण म्हणून काही कागद वा पेन ठेवतो तसेच हे आहे. ते आपल्या संगणकावर नोंदले जाते.
- home page - हे आपले मुख्यपान आहे. कोणतेही पान मुख्यपान होऊ शकते. ते कसे ठेवायचे ते आपण पाहाणारच आहोत.
- download service.- आपल्याला उपयुक्त अश्या अनेक माहिती व मनोरंजन पर गोष्टी internetवर आहेत. त्या offline[इंटरनेट चालू नसताना ही] आपल्याला पहायच्या असतील तर त्या Download कराव्या लागतात त्याची सुविधा.
तसेच काही ठराविक आज्ञाही पाहातो.
- back / forward - history
- refresh / stop
- go
- standard button bar
- address bar
- status bar
- bookmarks / favorites / links bar
mastch aahe... khup user friendly vatatay... amhalahi barach kahi shikayala milel.... :)
उत्तर द्याहटवाso tikhe mastar shikavat rahaa
khoopacha chhaan more informetive pan asoo dyat
उत्तर द्याहटवा