रविवार, १२ ऑक्टोबर, २००८

स्पॅमायणाचा उत्तरार्ध !

Dictionary:
spam
pronunciation :(स्पॅम) (spăm) ..
n : Unsolicited e-mail, often of a commercial nature, sent indiscriminately to multiple mailing lists, individuals, or newsgroups; junk e-mail.
i.e.
Senseless Pointless Annoying Message
Sending People Annoying Mail
Sad Pointless Annoying Messages
blah blah blah . ..

तर हे स्पॅम नक्की आहे तरी काय?
सोप्पं नेहमीच्या भाषेत सांगायचं झालं तर पेपरमधे जशी पत्र-पत्रावळ्या येतात तश्या प्रकारच्या इमेल्स किंवा वेबसाईटस. पण जाहिरात आणि स्पॅमिंग ह्यात नक्कीच फरक आहे. अगदीच आपण वर्तमानपत्रातील पत्रावळ्यांशी तुलना केली तर त्यात त्या पत्रावळ्या ब~या असं म्हणावं लागेल.[निदान रद्दीत तरी घालता येतात ! :P ] स्पॅम या प्रकारच्या वेबसाईट अथवा इमेल्समधे आपण आपल्या नकळत ओढले जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत रहातो. ज्यामुळे ज्याने स्पॅम केले आहे त्याला पैसे मिळत रहातात.

नक्की काय असतं ? कसं करतात हे ?
साधं गणित आहे. एका माणसाने एक वेबसाइटच्या लिंक वर क्लिक [ टिचकी ] मारल्यावर जर स्पॅमरला त्याचं कमिशन $1 मिळत असेल तर जो स्पॅमर आहे, तो त्या कंपनीसाठी किंवा ती लिंक [पत्ता / दुवा ] जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि पैसे मिळवायचा प्रयत्न करतो. जर मी २००० इमेल्स पाठवल्या तर त्यातून मला किमान $२०० ते $५०० मिळू शकतात. पण पैसे मिळण्याची काहीही खात्री अशी नसतेच. त्यातून ह्या मेल्स अतिशय त्रासिक [ डोक्यात जाणा~या / वैताग आणणा~या / पुन्हा पुन्हा येणा~या :X ] असतात. त्यावर तुम्हाला विचार करायला किंवा टिचकी मारायला लावणा-या असतात.
हे स्पॅम तुम्हाला कुठे दिसेल ?
आपल्याला काही offers चे वैताग आणणारे फोन - sms येतात, काही पत्र येतात ते ही मला स्पॅमच वाटतात[तुमच काय मत आहे ?]
इंटरनेटवर तुम्हाला स्पॅमर्स सगळीकडे दिसतील. काही वेबसाईटस, ब्लॉग्स, सोशल कम्युनिटीज आणि अगदी तुमच्या इमेल बॉक्समधे पण! आपल्या न कळत जे जवळ येतात आणि पैसे कमवतात.
ते ठीक आहे हो पण कसं ओळखायचं ?
काहीही संबंध नसताना एखाद्या रेश्माची, सुनेत्राची अथवा रमेशची तुम्हाला इमेल येते. जो तुम्हाला ओळखीचाही नाही आणि त्याने अनेक जणांना अशीच इमेल केलेली आहे. त्यात तुम्हाला तुमची माहिती विचारलेली असते आणि इतरत्र टिचकी मारा म्हणजे पैसे किंवा अजुन काहि मिळेल अशी लालूच दाखवलेली असते. [उदा. click here for $100 prize, you are selected for exclusive offer, Black dollor is yours, all chain letters, pyramid business letters. blahblah blah .. :X ] असे दिसल्यास त्या मेलला स्पॅम म्हणता येइल.
[या समजण्याकरता वेळ मिळेल तेंव्हा तुमच्या इमेल बॉक्सचे junkmail or spam mails उघडून पहा. नुसते विषय वाचलेत तरी कळेल हे काय आहे ते !]
एखाद्या वेबसाइट्वर तुम्हाला तुमच्या न कळत नेले जाते आणि तिथेच गुंगवून ठेवले जाते त्या वेबसाईटवर तुमच्याशी संबंधीत मजकूर नसतो पण तुम्ही ते पहात रहाता कारण ते आकर्षक असते. यामध्ये जुगार, सट्टा-बेटिंग ते प्रौढांसाठीच्या वेबसाईट्स समाविष्ट आहेत. तुम्ही त्या स्पॅम म्हणू शकता. थोडं नीट पाहिलं तर अशा मेल्स अथवा वेबसाईट्स लक्षात येतात.
यातील बारकावा : जाहिराती व स्पॅम
यामध्ये प्रेक्षक - जाहिरात प्रदर्शक - जाहिरात सेवा संस्था - जाहिरातदार
[ viewer - advertise exhibitor - advertise provider - advertiser] असे प्रकार येतात. जे या सर्व गोष्टीस कारणीभूत ठरतात. म्हणायला गेल तर हा खूपच सखोल विषय आहे. त्यावर परत कधी तरी बोलू.
जाहिराती वेबसाईटवर असणं किंवा कोणत्याही वेबपेज ला भेट देण्याचे निमंत्रण पाठवणं हे स्पॅमिंग होत नाही तर तो एक जाहिरात करून अर्थार्जनाचा अधिकृत भाग आहे. प्रेक्षकाला जबरदस्तीने ओढून वा वारंवार एकच एक सांगून फसवणे किंवा एखाद्या जाहिरातीवर टिचकी मारण्यास भाग पाडले तर तो स्पॅमिंगचा भाग होऊ शकतो.

वेबसाईट्ससाठी अधिकृत जाहिरात सेवा स्वत: गूगलयाहू सारख्या अजून काही वेबसाईट्सही पुरवतात.

बरं या स्पॅमवर उपाय काय?
आहे ना ! स्पॅमिंग हे गूगल, याहू अश्या मोठ्या सेवांनी अवैध ठरवले असून आता त्याविरूद्ध त्यांनी मोठ्याप्रमाणावर मोहीम काढली आहे.
यातून वाचण्यासाठी तुम्ही खालील प्रकार वापरू शकता.
Spam filters [जे तुमच्या इमेल सेवा देणा-या संस्थेने देणे आवश्यक आहे.]
Anti spam softwares [ जे तुम्ही इंटरनेट्वर शोधून download करून वापरू शकता.]
यापेक्षा तुम्ही तुमचे स्वत:चे आणि एक सार्वजनिक किंवा अनेक वेगवेगळे असे इमेल पत्ते काढून यावर मात करू शकता. ज्यामुळे तुमची खरी माहिती फार जण वाचू शकणार नाहीत. तसेच अगदी गरज असेल तिथेच तुमची खरी माहिती द्या.

अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा. तुम्हाला इथे इत्यंभूत माहिती मिळेल. मी अजूनही काही वेबसाईट्स चाळल्या आहेत याबद्दल त्यांचे पत्ते खाली दिले आहेत. या वेबसाईट्स english मधे आहेत.
http://www.answers.com
http://googlesystem.blogspot.com
http://docs.yahoo.com


आपल्याला काही offers चे वैताग आणणारे फोन - sms येतात, काही पत्र येतात ते ही मला स्पॅमच वाटतात. [तुमचं काय मत आहे ?] नक्की नोंदवा..

आता परत भेटू लवकरच!
तोवर have a happy & safe surfing !

२ टिप्पण्या:

  1. 1)jenva aapan ekhadi social networking site join karato.. e.g hi5 kinva wyan vagaire.. aaplyakadun anek lokanna invites jatat te spam mhanu shakat nahi na?

    2) anekda koni olakhichya mitr-maitrinni pathavlele mails suddha spam madhe jatat. tyavar kay karaycha?

    उत्तर द्याहटवा
  2. 1) nahi . asha sites war jar "skip this step " asha aashaayachi link asel ani ti jar visible asel ter tyala spaming nahi mhanata yenar.

    pan that step always irritates me !

    2) asha emails na ek tar contact madhe jaun rename karawe. je unique nav asel. local asel tar changle. kadhi kadhi orkut mule asa problem hoto ki orkut ch navch email la gmail contact madhe apply hota ani mag spam filters kadhi kadhi tya emails spam mark karatat.
    dusra agdi sadha go to spam folder and select those non spam emails and mark them as not spam.. :)

    i hope this helps

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !