रेडिओ मिर्ची .. एस एफ़ एम .. आणि त्यांची बडबड .. किंवा विविधभारती वरची सुरेल गाणी आणि त्यांची "निवेदनं" या दोन्ही बद्दल मी काहीही लिहीत नाहीए, मग रेडिओचा इथे काय संबंध ? काय सवाल अस विचारण्यापूर्वीच सांगतो, मी सांगतोय ते इंटरनेट रेडिओ बद्दल.. आता हे काय नवं खूळ ? रेडिओ जुना प्रकार आहे असं ज्यांच मत असेल त्यानी तर हे जरूर करून पहावं.
परवा मी माझ्या कॉम्प्युटरवरची तीच तीच गाणी ऐकून वैतागलो होतो. जरा नवीन काही शोधाशोध गूगलवर चालू होती.. हे चाळ ते चाळ करत करत मी पोहोचलो शाऊटकास्ट.कॉम वर पोहोचलो आणि मला एक खजिना मिळाला.. अर्थात तिथे सर्व रेडिओ स्टेशन्स english होती पण त्यात काही हिंदी सुद्धा होती. अजून एक संस्थळ आहे लाईव्ह ३६५ इथे ही तुम्हाला विविध प्रकारची स्टेशन्स ऐकायला मिळतील. तुम्हाला अजून ऐकायची असतील तर गूगल वर इंटरनेट रेडिओ म्हणून सर्च द्या ..
इंटरनेटवर रेडिओ ऐकण्यासाठी तुम्हाला itunes किंवा Songbird किंवा winamp ही तीन सोफ़्टवेअर्स लागतात. ती तुम्हाला त्या नावांवर टिचकी मारलीत की डाऊन लोड करता येतील. [ तसं वेबसाईटच्या तयार प्लेअरमधे पण ऐकता येत पण या दोन सॉफ्टवेअर्स मधे तुम्हाला अजुन काही नियंत्रण मिळते.]
वरील तीन सॉफ्टवेअर्स वापरण्याची पद्धत
- तुम्ही Tune in वर क्लिक केल कि तुम्हाला विचारण्यात येतं कि .plc फाईल कोणत्या सॉफ्टवेअरमधे ओपन करायची?
- तेव्हा तुम्हाला फक्त winamp or songbird or mediaplayer or itunes सिलेक्ट करायच आहे.
- आणि पुढील काही सेकंदात रेडिओ सुरू होईल !
त्याच बरोबर तुमचे ब्रॉडबॅन्ड कनेक्शन किमान २५६ केबी प्रत्येक क्षणास देण्या क्षमतेचे असावे लागते. बाकी तुम्ही एकदा Try कराच त्या शिवाय मजा नाही कळणार.
RaDioTEENTAAL.com 100% InDiAn MuSiC LiVe FrOm PaRiS
Bollywood Music Radio :: Indian Music :: Request your Hindi songs.
Bollywood Classic Hits - Radio NRI
Hindi Radio - Mera Sangeet
ही काही तिथली हिंदी स्टेशन्स आहेत.
सांगा मला तुमचा अनुभव .. आणि हो मी खूप दिवसाने पोस्ट लिहिली आहे .. त्याबद्दल क्षमस्व !
ajun ek site aahe .
उत्तर द्याहटवाonlinehindiradio.com mhanun.
You can listen here HINDI radoi channels in various countries suchh as Dubai , NewZealand , Trinidad.
thank you anonymous ..
उत्तर द्याहटवाfor your contribution