गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय थोडी हलकी होते आणि आपल्या कॉम्प्युटरला फार त्रास ही होत नाही :D .. मी या व्हीडीओत हे कसे वापरायचे आहे ते दाखवले आहे.
सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला.. " हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस " " हो ... गडबडीत विसरलोच ! " " आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. " " ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! " " .. " " पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? " "हो" " मग चिंता मिटली .." " .. " " गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? " .... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! .. गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन त...
मित्रांनो, कशी झाली ब्लॉगगिरी ? तुमचा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न केलात का नाही? असो.. नसेल केला तर ही तुमच्यासाठी खास पोस्ट .. ब्लॉग्गर.कॉम वर ब्लॉग कसा तयार करायचा? ह्या मध्ये आपण गूगलचे खाते कसे उघडायचे ते ही पहाणार आहोत आणि ब्लॉग्गरचे ही खाते कसे उघडायचे तेही पहाणार आहोत. पहा आणि तुमचे मत लिहा. परत भेटूच तोवर happy blogging !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !