शनिवार, १३ मार्च, २०१०

टेम्प्लेटसाठी दाहीदिशा ... पण आता नाही ...

blogger.com ने टेम्प्लेटसाठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल . हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत, तसेच अतिशय इंग्रजी मराठीचे मिश्रण केले आहे त्याबद्दल दिलगिर आहे .


नेटविद्यार्थीच्या ब्लॉग चे टेम्प्लेट मी तयार केलेले नसून ते कोणी केले आहे पाहण्यासाठी ब्लॉगच्या तळटीपेत लिहिलेले आहे. व्हिडीओत मी केले आहे असे चुकून म्हटले गेले आहे. या टेम्प्लेटमध्ये फक्त मी हवे तसे अगदी काही छोटे बदल केलेले आहेत.

आणि हो , तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ..

1 टिप्पणी:

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !