आयपीएल ची सुरुवात तर दणक्यात झालीय .. कोलकाता नाईट रायडर्स ने डेक्कन चार्जर्स वर बाजी मारलीय ..
पण काही लोकांना Sony max किंवा केबल उपलद्ध नसल्याने किंवा इतर कारणाने जर ते पाहता येत नसेल तर त्यानी नाराज व्हायचं कारण नाही. तुमची youtube व आय पी एल ने सोय केलेली आहे. जर तुमच broad band इंटरनेट जोडणी असेल तर तुम्ही आयपीएल च्या सर्व सामन्याची मजा online लुटू शकता .. अगदी फुल्ल्स्क्रीन !
इथे तुम्ही ट्विटर ने सदस्य होऊन चिवचिव ही करू शकता तसेच तुमची मते मांडू शकता ... इथे सामने अगदी घडामोडीनुसार चालतात .. व साठवलेले videos सुद्धा आपण पाहू शकतो तसेच तुम्ही एकच सामना दोन कोनातून पाहू शकता. तुमच इंटरनेट जोडणी जर कमी वेगाची असेल तर ते आपोआप त्या नुसार प्रक्षेपण करते.
गेल्या दोन वर्षी लोकांचा online शोध घेण्याचाओघ पाहता खुद्द आयपीएल नेच स्वतःची यु ट्यूबवाहिनी सुरु केली आहे तिथे जाण्यासाठी फक्त तुम्हाला इथे टिचकी मारायची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !