सोमवार, १५ मार्च, २०१०

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


 नेटविद्यार्थी ब्लॉगच्या वाचकांना व शुभचिंतकांना हे हिंदू - भारतीय नव सौरवर्ष भरभराटीचे आनंदाचे आणि सुखाचे जावो. विशेषत: ब्लॉगर्स साठी भरपूर वाचकांनी भरलेले व नव्या मैत्रीच्या संधी घेऊन येणारे ठरो ही मनोकामना.

नवीन वर्षाच स्वागत आपण गुढ्यापताका लावून करतो. त्याच निमित्ताने मी तुमच्यासाठी एक विजेत तयार केलंय .. तुमच्या ब्लॉगवर ही तुम्ही माझ्यासारखी गुढी लावू शकता. हे चित्र सुद्धा मी स्वत काढलेले असल्याने ते वापरायला परवानगी लागणार नाही. ह्या विजेत पुरती तरी.. हे विजेत कस वापरायच ते खाली दिले आहे.
  • ब्लॉगर च्या dashboard मधून layout मध्ये जा.
  • तिथे साईडबार च्या वरील add new gadget वर टिचकी मारा. 
  • त्यानंतर आलेल्या विंडो मध्ये html/javascript विजेत समोरील निळ्या अधिक चिन्हावर टिचकी मारा. व निवडा. 
  • आलेल्या नवीन विंडोमध्ये त्यात खाली दिलेला कोड इथून कॉपी करून त्यात पेस्ट करा आणि सेव्ह वर टिचकी मारा. 
 तुमच्या ब्लॉगवर सुद्धा गुढी दिसू लागेल. जर तुम्हाला ती थोडी वर खाली इकडे तिकडे करायची असेल तर कोड मधील left व top चे px प्रमाण कमी जास्त करा. घाबरण्यासारख काहीही नाही. याने फक्त तुमच्या गुढीचीच जागा वर खाली होणार आहे. जर तुम्हाला गुढी ब्लॉग च्या पुढे अथवा मागे करायची असेल तर z-index चे 2 करा. गुढी पुढे येईल
जर वापरलं तर मला पाहायला जरूर आवडेल .. नाही वापराच .. मी तर ही गुढी रामनवमी पर्यंत ठेवणार आहे. तुम्हीही ठेवा एक प्रतिक म्हणून. पुन्हा एकदा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

४ टिप्पण्या:

  1. ्लावायचा प्रयत्न करतोय.. बघु जमतं का ते.. धन्यवाद आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. ह्म्म, छान विझेट दिसतंय हे.. मी लगेच माझ्या ब्लॉगवर ते जोडतो.. विझेट उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  3. क्षमस्व, परंतु, आमच्या ब्लॉग वर विजेत लावण्यात आम्ही अद्याप अयशस्वी. कारण तिथे तशी सोय सद्या दिसत नाही...

    शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद महेंद्रकाका, विशाल मस्त दिसत आहे गुढी ..
    शिरीषजी. तुमच्या ब्लॉगवर गुढी दिसत आहे पण बरीच खाली दिसत आहे. कदाचित तुमच्या मोनितर मुळे ते दिसत नसेल. कृपया. दिलेल्या कोड मध्ये left व top च्या मूल्यामधे बदल करून पहावेत. नक्की दिसू लागेल.

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !