सोमवार, १६ फेब्रुवारी, २००९

गूगल office !

सकाळची नऊ साडेनऊची वेळ, एका मैत्रिणीचा फोन आला..
" हाय, अरे तू परवा कॉम्प फॉरमॅट करून गेलास पण ऑफीस टाकलंच नाहीस "
" हो ... गडबडीत विसरलोच ! "
" आता मला साडे दहा पर्यंत एक प्रेसेंटेशन करून द्यायचय .. काही ही कर आणि मला ते इन्स्टॉल करून दे.. "
" ते शक्यच नाहीय .. कारण् मी पुण्यात नाहीये ! "
" ..  "
" पण तुझ घरचं नेट चालू आहे ना ? "
"हो"
" मग चिंता मिटली .."

" .. "
" गूगल डॉक कधी वापरलं आहेस का ? "

.... त्यानंतर तिच काम सहज झालं आणि मी ही सुटलो ! ..

गूगल डॉक्युमेट्स हे अत्यंत उपयोगी आणि सर्वात महत्वाचे "फुकट" असे साधन आहे. पूर्वी उमेदवारी करणारे तरूण आपापला resume स्वत:लाच इमेल करून ठेवायचे . काही जण आताही करतात .. किंवा काही महत्वाचे डॉक्यूमेंट्स प्रेझेंटेशन्स .. किंवा हिशेबाची स्प्रेड्शीट्स ही त्यांचा पाठसाठा [backup] म्हणून करून ठेवायची .. तर ते दिवस आता गेलेले आहेत. तुम्ही गूगल्च्या साहाय्याने ऑनलाईन सर्व महत्वाच्या फाईल्स - कागद्पत्रे सुरक्षित ठेवू शकता आणि नवीन तयार ही करू शकता ! 


अधिक माहिती. :
Document - वही - हा प्रकार लेखन आणि गद्य पद्य लिखाण, साहीत्य अशा प्रकाराशी निगडीत आहे. यात टंकलेखन [typing] हा महत्वाचा भाग असतो. लेखक, शास्त्रज्ञ, कवी, माहीतीगोळा करणारे या प्रकाराचा जास्त वापर करतात. या वहीला अनंत पाने असतात आणि खाडाखोड होतच नाही .. कागद वाचतो तो वेगळाच असे याचे अनेक फायदे आहेत.


Spreadsheet - हिशेबवही, खतावणी. - मुख्यत: हा प्रकार सारण्या [Tables] शी संबंधीत असल्यामुळे या प्रकाराचा वापर हिशोब, नोद्ण्या, किंवा गणिती वापरासाठी होतो. या प्रकाराचा वापर ही भरपूर प्रमाणात होतो. यात काही सूत्रे योग्य जागे बसवली की बाकीची गणिते आपोआप केली जाऊ शकतात. तसेच काम ही भराभर होते.. काहीजण याल excel sheet असेही म्हणतात.


Presentation- slide show - तक्ते, हा प्रकार मुख्यत्वे करून जिथे कमी शब्दात, आकर्षकपद्धतीने माहीती द्यायची गरज असते त्याठिकाणी वापरला जातो. उदा. कॉन्फरेंस मधे, किंवा जाहिरातीसाठी, संदेश देण्यासाठी, लहान मुलांना समजवण्यासाठी ही ह्या प्रकाराचा वापर केला जातो. पूर्वी ज्या प्रकारे एक एक फोटो, चित्र दाखवून एखादी गोष्ट सांगितली जात असे त्याचेच हे आधुनिक स्वरूप आहे.


या करता तुम्हाला फक्त एक gmail चे खाते काढावे लागते. बाकी काही ही लागत नाही. जर तुम्ही आधीच gmail वापरकर्ते असाल तर फक्त खालील दुव्यावर टिचकी मारा आणि तुमचा नाव व परवलीचा शब्द [ username & password ] टाका आणि तुमच्या समोर गूगलच्या या सेवेच मुख्यपान उघडेल ज्यात तुम्ही लिहीलेल्या, नवीन तयार केलेल्या सर्व वह्या, तक्ते, हिशेबसारण्या[Documents, Presentations, Spreadsheets] कालानुक्रमे दिसतील. जशा खालील चित्रात दिसत आहेत. यात new वर गेलात की तुम्हाला नवीन काय काय बनवता येते ते कळेल .. आपण उद्याला एखादी वही [Document] बनवू या .. तो पर्यंत

धीर धरी .. धीर धरी .. !



८ टिप्पण्या:

  1. Google stores whatever you write there... who know what will happen one day someone misuses Google's database...

    उत्तर द्याहटवा
  2. @sneha @prasanna : thanks for visit
    @nachiket : are taasahi internetcha sadupayog or say uddeshanusar upayog 100 paiki fakt 40 jan ch karat astil .. baki barech se adult sites chatting poker play ashach goshtit ghalawtat. ani jo durupayog karyachya hetune yeto .. to kahi hi karun kontyahi service cha durupayog karatoch .. nahi ka ! tyala googlech pahije ase nahi !
    pan he hi khare ki google ne ajun security tight keli pahije .. so account holder trace kela jau shakel..

    aso .. i guess bha po.. thanks for comment and dropping by !

    उत्तर द्याहटवा
  3. खरच गुगल डॉक्स वापरायला एअकदम सोप आणि फायदेशीर आहे. शिवाय डॉक्युमेंट सेव्ह करायलाही चाम्गली जागा आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. जास्वंदी : धन्स
    सोहम : धन्स .. आताच्या गूगल डॉक्स मधे खूप बदल झालेत अनेक फाईल फॉरमॅट आलेत .. ते ही पाहून घे ! :)

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !