गुरुवार, २० नोव्हेंबर, २००८

संस्थळांचे प्रकार - २

संस्थळांचे प्रकार या विषयाला येण्याच एक कारण आहे की आता तुम्हाला Internet explorer मधून संस्थळे पहाता येत असतील, हे नक्कीच पण यात खूप काही करण्याची ताकद आहे हे ही लक्षात आले असेल. आता तुमचा internet म्हणजे विश्वजालातला प्रवास आणखी बहुरंगी करण्याकरताच आता मी काही वैशिष्ट्यपूर्ण संस्थळांची माहिती पण इथे देणार आहे. त्याचबरोबर दुसरं कारण असं की आजच्या ट्रेंड बद्दल तुमच्या मनात जे कुतूहल जागं झालंय आणि ज्यामुळे तुम्ही विश्वजालात त्याची माहिती घेण्याकरता आला आहात त्याच समाधान करणं !
आपण आता पर्यंत संस्थळांच्या शेवटच्या किंवा आडनावावरून त्यांचे प्रकार पाहिले. .com, .co.in, .net वगैरे वगैरे .. आता त्यांच्या उपयोगानुसार प्रकार पाहू. अगदी ढोबळमानाने विश्वजालातल्या संस्थळांचे static , dynamic असे दोन मुख्यप्रकार आहेत आणि त्यातिल dynamic मध्ये आत्ताचे म्हणजे तथाकथित web 2.0 चे प्रकार येतात. forums, Blogs, Portals, Matrimony, Real estate portals, Community websites, Social networking websites, Portfolios, e-commerce, Online services आणि अनेक इतरही !
आज आपण ब्लॉग या प्रकाराची माहिती घेऊ.


हा ब्लॉग फंडा काय आहे ?
Blog = Web + log
अपभ्रंश == blog,

मराठी - अनुदिनी, रोजनिशी
blogging.- ब्लॉग लिहीणे
blogger - ब्लॉग लिहीणारा अर्थात तुम्ही .. :)

रोज जशी आपण अनुदिनी किंवा रोजनिशी लिहितो तशा संकल्पनेतून ह्या प्रकाराची निर्मीती झाली. रोज काहीना काही लिहायचे, वाचायचे आणि त्यावर मत मांडायचे यावर हा फंडा आधारलेला आहे. विशेषत: IT कंपन्यांमधून काम करण्या-या लोकांना वाचायला लिहायला काही वेगळावेळ मिळत नाही. त्यामुळे त्या घाईगडबडीच्या जगात पटकन काम करता करता एखादा मित्राचा ब्लॉग वाचला, त्यावर त्याला टपली मारली आणि आपला हालहवाल आपल्या ब्लॉगवर टाकाला. लोकांना पत्ता कळवून त्या संस्थळावर आणायला लागतो तेवढाच काय तो वेळ! त्यानंतर लोक आपोआप परत येत रहातात, टपल्या कॉमेण्ट्स \ कानपिचक्या, कोपरखळ्या मारतात..
काही जण हा ब्लॉगप्रकार मजेशीर पद्धतीने हाताळतात तर काही अगदी गंभीरतेने .. म्हणतात ना व्यक्ति तितक्या प्रकृति ! .. ... कोणत्याही उद्देशाने तुम्ही हा प्रकार वापरा तो तुम्हाला वेड लावेल त्याच्या प्रेमात पाडेलच यात शंका नाही. मात्र तुम्ही काहीतरी मजेशीर किंवा माहितीपूर्ण मनोरंजक लिहीत राहिले पाहिजे ..

लिहायलाच पाहिजे असं काही आहे का ?

नाहीच मुळी ..लिहील नाही समजा जाता जाता मोबाईलवर एखादा मजेशीर फोटो मिळाला तर तो टाकायचा. अगदी काहीही .. तुम्ही पेपर मधे काय वाचलत त्यावर तुमचे मत काय आहे किंवा एखाद्या झक्कास पदार्थाची रेसिपी किंवा तुमची आवड्ती कविताही चालेल किंवा एखादी मजेशीर गोष्ट, मित्राच्या वाढदिवसाचा एखादा व्हिडीओ सुध्दा .. फक्त जे लिहायच किंवा टाकायच ते तुमच्या आनंदासाठी .. लोक ते वाचून खूष झाले तर ते पुन:पुन्हा येतात आणि कॉमेण्ट्स पण पड्तात { मग खरी धमाल सुरू होते ..}
ब्लॉग लिहीताना खरं नाव असलंच पाहिजे असं नाही. तुम्ही एखादं टोपणनाव ही घेऊ शकता जसं जास्वंदी इथं लिहीत आहे. किंवा हे रानफूल इथे लिहितंय ..
पण तुम्ही एकदा ब्लॉग्गर झालात की थोडी जबाबदारी पण येते.. तुम्हाला तुमच्याबद्दल जपून लिहायचे आहेच पण त्यापेक्षाही त्यात सामाजिक भान पण असायला हवं. नाहीतर लोक शिव्या घालायला ही कमी करत नाहीत.

आता इतकं लेक्चर दिल्यावर तुम्ही म्हणाल काही तरी दाखव ज्याला ब्लॉग म्हणतात ! तर तुम्ही जे वाचत आहात तो ही एक ब्लॉगच आहे आणि त्यात मी तुमच्यासाठी हे लिहीत आहे [ज्याला पोस्ट असे म्हणतात.].. तुम्हाला अजून काही मराठी ब्लॉग्स पाहायचे असतील तर तुम्हाला एक छोट काम करायच आहे. फक्त खाली असलेल्या मराठी ब्लॉगविश्व या टिकली वर टिचकी मारा .. आणि एक नवे विश्व तुमच्या पुढे उघडेल. आणखी काही ब्लॉग्स खाली दिले आहेत जे पहायलाच हवेत!काय ?
तुम्हाला ब्लॉग तयार करायचय .. अरे नक्की सांगतो .. पण पुढल्या पोस्ट मधे !
तोवर शैलेश पिंगळे या मित्रान एक पोस्ट या संदर्भात लिहीली आहे ती जरूर वाचा

happy surfing !

९ टिप्पण्या:

  1. विरेंद्र, सगळ्यात आधी, ’कवडसा’चा उल्लेख करुन तुमच्या वाचकांना लिंक दिल्याबद्दल मनापासुन आभार!

    पोस्टतर खुपच छान लिहिली आहे. अगदी नेमकी आणि संपुर्ण माहिती दिली आहे. :)
    मस्तच! झक्कास!! अगदी परिपुर्ण आहे पोस्ट.

    उत्तर द्याहटवा
  2. विरेंद्रराव,
    फार सुंदर , ह्या मार्गदर्शनाची आणि मराठी साहित्य प्रसारासाठी blogging ची फार गरज आहेच.

    आपला,
    (आभारी, आनंदी) विशुभाऊ

    आमच्या फ़ळ्याचे उदाहारण दिल्या बद्दल धन्यवाद् !!!!

    उत्तर द्याहटवा
  3. virendraa malaa jaraa tuzi madat pahije fedder kasaa on karaava kiva
    kivaa ekhadyaa user la aapali post email kashi hoeel te saang aani tu mazya blogchi lnk dilya baddal aabhari aahe......

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लॉग बद्दल काहीच माहिती नाही अशांसाठी 'ब्लॉग' बद्दलच्या माहितीची सुरुवात छान झाली. गेल्या दोन अडीच वर्षात मराठी bloggers च्या संखेत आशचर्यकारक वाढ आहे. त्यामुळे आता गरज वाटते ती blogging सेवा पुरविणारे जे बरेच features उपलब्ध करून देतात त्यांच्या वापरासंबंधीची. तुम्ही ते करालच.
    शिफारस केलेले सर्व ब्लॉग पाहिले. दोन technical आहेत ते ते तंत्र वापरणार्‍यांसाठी खास मोलाचे आहेत. फळा, जास्वंद, रानफुलं छान आहेत, पण कवडसा जरा व्यापक वाटला. ग्राफिटी अजून पाहायचाय.
    'हरिचिंतन' ची शिफारस केल्याबद्दल धन्यवाद.
    एकोहम्

    उत्तर द्याहटवा
  5. hi virendra,
    actually, apala cinemascope kahi maza ektyacha blog nahi, but i should safely say, i am part of the team. thanks for giving a link from cinemascope.
    tuza blog unusual watla. arthat me kahi blog expert nahi, far kami blog pahato, pan most seem (amchasarkhe )general badbad. so good that you are actually giving something useful.

    keep it up,

    उत्तर द्याहटवा
  6. @प्रभास: धन्यवाद प्रभास, तुझ्या ब्लॉगवरून तू सॉफ्ट्वेअर इन्जिनीअर आहेस हे कळतं त्यामुळे तुझा सहभाग मला पुढे हवा आहे.. नक्की ना !

    @विशुभाऊ: धन्यवाद विशुभाऊ !

    @शैलेश : मी एक आज उद्या मधेच एक पोस्त लिहित आहे काम झालंय निम्म .. टाकतो लवकरच !

    @एकोहम : धन्यवाद. तुम्ही अगदी मोजक्या शब्दात खूपच छान पद्धतीने इतर ब्लॉग बद्दल लिहीलंत .. परत नक्की भेट द्या..

    @स्नेहा : @जास्वंदी : hey .. thanks a lot.. do visit again

    @गणेश : अरे तुम्ही जी माहिती देताय ती सुद्धा लोकांच भलंच करणार आहे. तुम्हीच तर मनीसेव्हर आहात .. नाही तर लोक किती पैसे घालवतील चांगल्या चित्रपटांच्या शोधात..
    ये परत ब्लॉगवर !

    उत्तर द्याहटवा
  7. @ विरेंद्र: हो अगदी नक्की!

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !