सोमवार, २४ नोव्हेंबर, २००८

ब्लॉग रीडरला जोडताना !

नमस्कार..
काय कशी वाटली ब्लॉग यंत्रणा.. ब्लॉग तयार केलात की नाही अजून ? नाही ? अरे मग करा ना लवकर! फुकट आहे .. इतकी सोय आहे .. एखादा करून पहायचा.. कळेल कसा प्रतिसाद मिळतोय ते! आणि केला असेल तर खाली तुमच्या अभिप्रायात लिहा की .. किंवा एखादी लिंक टाका नुसती .. असो ..
मला माहित आहे तुमच्या मनात अजून ही शंका आहे की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या ब्लॉगवर कोण येणार? लोकांना काय स्वप्नं पडणार आहेत का मी ब्लॉग सुरू केल्याची?
अगदी बरोबर आहे ही शंका.. माझ्याही मनात ती आली होती! .. [ ती म्हणजे लगेच शंकेने पाहू नका ! शंकेबद्दलच बोलत आहे मी! :D] असो.. तर त्यावर काही उपाय आहेत तेच सांगणार आहे आज !
दोन उपाय स्वत: गूगलच पुरवत आहे. एक म्हणजे गूगल रीडर आणि दुसरा तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या शेजारीच followers किंवा चाहते या नावाखाली दिसेल. हे काय आहे ते पहाण्यापूर्वी आपण नक्की ही संकल्पना काय आहे ते पाहू या !
खालील व्हिडीओ हा गूगलने स्वत: प्रकाशित केला आहे. इंग्रजीत आहे. न समजल्यास प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही..[ पण न समजण्याचा प्रश्न ही येत नाही असा हा व्हिडीओ आहे .. ]


आणि हा ही एक व्हिडीओ पहा
How to setup google reader account ?

हा ही गूगल रीडरसाठी उपयुक्त आहे.
आता हे follower system काय आहे. ते उद्याच्या पोस्ट्मधे पाहू या !

४ टिप्पण्या:

  1. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझा ब्लॉग रिडरशी जोडलाय. आता पाहु पुढे. पण केवळ तुझ्या ह्या पोस्टमुळे शक्या झालें. धन्यवाद! आर. एस. एस चा काही एरर मेसेज येतो, जो माझ्या समजण्यापलिकडचा आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Thank you sneha and kanchan !

    @ kanchan : please post your error message here .. so i can see what problem is !

    उत्तर द्याहटवा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !