सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

शोधताना ! - १

इंटरनेटवर शोध घेताना आपण सर्च इंजिनचा वापर करतो आणि आता ते आपल्या अंगवळणी ही पडल आहे. पण तरीही त्याचा आपण पूर्णपणे वापर करतो का? आपण फक्त आपल्याला हवा आहे तो शब्द टाकतो आणि पुढे जातो.


माणसाच्या गरजेनुसार व आवडीनिवडी नुसार आता सर्च इंजिन आता उपलब्ध आहेत. yahoo, google, msn, ask अशी अनेक आपण आपल्या गरजेनुसार ते निवडून वापरायचे असते. प्रत्येकाची स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार ती वापरली तर आपल्याला अधिक चांगले व लवकर शोध परिणाम मिळतात. याहू व गूगल ही आजची आघाडीची सर्च इन्जिन्स आहेत आणि ती आपण वापरतोही. पण त्यातून हवे ते परिणाम कसे शोधायचे किंवा त्याचा विविध प्रकारे वापर कसा करायचा ते पाहू.

याहू!
तुम्ही याहूच्या answers,jobs किंवा directory सेवेचा वापर करून गोष्टी शोधू शकता एवढेच नव्हे तर ते तुम्ही साठवून ही ठेवू शकता. तुमचे जर याहू वर खाते असेल तर तुम्हाला अजून अनेक सेवा वापरता येतील. आपल्या देशातील याहू सर्वर वर आपल्या देशाशी संबंधित माहिती याहू सतत त्याच्या अनुक्रमणिकेत जोडत असते. त्यानुसार जुळणारे निर्णय ते आपल्याला शोध करताना देते.
याहूने त्यांच्या local सेवेचा ही यात समा्वेश केला आहे.ज्यात तुम्ही अनेक व्यावसायिक तसेच वैयक्तिक माणसांच्या माहितीचे शोध घेऊ शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या शहराचे नाव टाकल्यास ते त्यानुसार ही तुम्हाला शोध परिणाम देईल. त्यांच्या वर्गवार रचनेतून जर गेले तर कित्येक प्रकारच्या गोष्टींचा तुम्ही शोध घेऊ शकता हे तुमच्या लक्षात येईल.
याहूमधे शोध घेताना तुम्ही फक्त याहूच नव्हे तर दैनिक भास्कर, दैनिक जागरण किंवा बी बी सी अशा वार्तापत्रांच्या संस्थळातून ही शोध घेऊ शकता. सर्वात जवळ्चे शोध परिणाम याहूने आता पर्यंत दिलेले आहेत.
याहू सर्च सजेशन ही सेवा सर्वात प्रथम इंटरनेटवर आली आणि त्यानंतर इतर सर्व सर्च इंजिन नी ती उचलून धरली.सर्च सजेशन मधे तुम्हाला तुम्ही टंकित केलेल्या शब्दांच्या आधारे अंदाजे काही शब्द सुचवले जातात जे तुम्हाला अजून अचूक निर्णय घ्यायला उपयोगी पडतात.
तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तो प्रश्नच त्या सर्च रकान्यात लिहा आणि विचारा .. तुम्हाला याहू आन्सरस सेवा उत्तर देइल इतकेच नव्हे तर इतर चार लोकांची मते ही त्यावर कळतील. जर तो प्रश्न जर अस्तित्वातच नसेल तर याहू स्वत: उत्तर देइल. आहे ना interesting !!
तुम्हाला अनेक प्रश्न असेल की अजून काय काय करता येत याहूवर .. तर ते तुम्ही स्वत: च पाहू शकता .. इथे !



गू:
गूगलने आजपर्यंत दिलेल्या सेवांपैकी सगळ्यात जुनी सेवा आहे ही आणि सगळ्यात जास्त वापरले जाणारे हे सर्च इंजिन आहे. विविध प्रकारांमधे इथे सहज शोध घेता येणं ही याचि खासियत आहे. गूगलवर तुम्ही चित्र, व्हिडीओ, नकाशा, बातम्या, ओर्कुट च नाही तर तुमच्या जीमेल खात्यातील शोध ही घेऊ शकता. तसेच इतर अनुदिनी [blogs] पुस्तके यातही तुम्ही शोध घेऊ शकता. तसेच सेवा म्हणून तुमच्या साठी गूगलने काही स्मार्ट शब्द तयार केले आहेत.
उदा.

  • जर तुम्ही weather Pune, India असा शोध दिलात तर तुम्हाला प्रथम वातावरणाचा अंदाज दिला जातो आणि मग त्यासंबंधी दुवे दाखवले जातात.
  • किंवा जर तुम्ही time Mumbai लिहिल आणि शोध घेतलात. तर तुम्हाला वेळही दाखविली जाते.
  • तुम्हाला माहित आहे का .. गूगलच्या सर्च इंजिन मधे एक कॅल्क्युलेटर आहे. तुम्ही जर (2+2)*100 असे लिहून शोधलेत तर तुम्हाला फक्त उत्तर दिले जाईल. आहे ना मजेदार ! 
  • गूगल मधे स्वत:चा मापक परिवर्तक [unit convertor ]आहे. 15 cm in kilometers असा सर्च दिल्यावर त्याने 15 centimeters = 0.00015 kilometers अस उत्तर दिल नाही तर सांगा ..
अजून बर्‍याच गोष्टी आहेत गूगल बद्दल जरा शोध घ्या सापडतील!
उदा : हे पान पहा .. गूगलची सर्च वैशिष्ट्ये !


शोध घेताना फक्त वरच्या दोनच सेवांचा अधिकतम वापर करताना सर्व लोक दिसतात. पण त्यापेक्षाही विविध सेवांचा वापर करून तुम्ही चांगले शोध घेऊ शकता. अशा कुठल्या सेवा आहेत ? ते पाहू पुढील भागात !!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !