गेल्यावेळॆस आपण इंटरनेटवर शोधताना काय काय करू शकतो ते पाहिल. आता अजून कोणती कोणती शोधके [सर्च इंजिन्स ]आहेत ते पाहू..
व्हिडीओ शोध :
आपण मुख्यत: गूगल व याहू सारख्या शोधकांवर संस्थळे, चित्रे, व्हिडीओ असेच शोध घेत असतो. पण यातून सर्वच शोध परिणाम येतात असे नाही.
आणखीही काही संस्थळॆ आहेत जी यात गणली जात नाहीत. उदा. गूगल व्हिडीओ शोधांमधे यू ट्यूब व गूगल व्हिडीओ व तत्सम संकेतस्थळांचे शोध परिणाम दाखवते पण ते फक्त वरवरच ... तेव्हा तुम्ही जर एखादी बातमी गाणे अथवा पाककृती शोधत असाल तर एकदा यू ट्यूब वर शोध घ्यायला हरकत नाही .. नक्कीच तुमचे काम सोपे होईल. त्याच बरोबर डेली मोशन, व्हिमीओ या व्हिडीओ संस्थळांवरही अशा प्रकारे शोध घेऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.
चित्र शोध :
फ़्लिकर, फोटोबकेट, CC शोधक यांचाही वापर तुम्ही चित्रे शोधण्यासाठी करू शकता.. गूगल याहू वर जे परिणाम येऊ शकत नाहीत ते तुम्हाला इथे सहज सापडतील.
टिन आय उलट शोध: ह्या शोधकामुळे चित्रशोध आता अतिशय सोपा झाला आहे. प्रायोगिक तत्वावर आधारित या शोधकामधे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तूची प्रतिमा अपलोड करायची आहे आणि त्यानंतर ते तीच प्रतिमा किति ठिकाणी इंटरनेट वर आहे ते तुम्हाला सांगते. तुमचा फोटो किंवा एखाद्या सिनेतारकेचा फोटो टाकून पहा म्हणजे समजेल काय प्रकार आहे हा ..
गझापो: हे सुद्धा टिन आय सारखेच एक शोधक आहे.
गूगल स्विर्ल : हा एक नवीन वेब २.० प्रोजेक्ट आहे. जो गूगल् ने सुरू केला आहे .. यात नकाशा सारखे फोटो मांडले जातात आणि एकमेकांशी ते कसे जोडले आहेत दाखवले जाते..
बातम्या व लेख :
फक्त व्यावसायिक बातम्याच शोधायच्या असतील तर न्यूज सिफ़्ट नावाचा शोधक आहे तो तुम्हाला इतर न्यूज संस्थळावरून माहिती एकत्र करून देतो आणि त्याचे इतर दुवे ही.. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुम्हाला ज्या बाबतीत बातमी शोधायची आहे त्याचा एक शब्द लिहायचा आहे आणि तुम्हाला शोधकाने दिलेल्या वेगवेगळ्या सुचवलेल्या गोष्टींमधून योग्य प्रकार निवडायचा आहे .. त्यानंतर तुम्हाला तो त्या कंपनीची व्यवसायिक कुंडलीच दाखवतो .. आणि ग्राफही ...
वीकीपिडीया : माहितीच्या भांडारातून नेमकी माहीती आणि अचूक मुद्दे व जोडदुव्यांसहीत लेख अशी या संस्थळाची ख्याती आहे. या संस्थळावर इतिहास भूगोल शास्त्र या विषयावर सखोल माहिती मिळतेच त्याच बरोबर ती तुमच्या भाषेत भाषांतरित केलेली असते. यासंस्थळावर अनेकदा अनेक लोकांचे प्रोजेक्ट पूर्णच होतात इतकी माहिती आहे. :P
भाषा माहितीच जाऊदे .. पण समजा शब्दाची DNA इतकी माहिती हवी असेल तर इथे जाऊन तुम्ही ती घेऊ शकता. हा प्रोजेक्ट वूल्फार्म रीसर्च ने केलेला आहे. सध्या हा काही आंतरराष्ट्रीय भाषांपुरताच मर्यादित आहे.
सोशल लाईफ़ ..
माहितीच ठीक आहे पण समजा माणसं शोधायची असतील तर ?? त्याचा ही उपाय आहे .. जरा १२३ पीपल किंवा पिप्ल किंवा व्ह्युझी इथे जाऊन त्यांचे शोधक वापरून पहा.. तुमचे नाव किंवा तुमच्या मित्राचे नाव टाकून पहा .. त्याच्या सर्व इंटरनेट वरील जागा कळ्तील तुम्हाला .. !!
असो .. तुम्ही यापैकी कोंणती वापरली आहेत ही पोस्ट जरा मोठीच झाली आहे खरं पण काय करणार शोध कसा घ्यावा याचा शोध घेताना इतकी माहिती समोर येत होती की त्यातले निवडक लिहून काढणेच अवघड होत होते.. तुम्हाला असे अजून शोधक माहित असतील तर जरूर कळवा .. प्रतिक्रियांची वाट पहातोय ! :)
तुझ्या त्या ब्लॉगवर कमेंट वर्ड वेरिफिकेशन देता येत नाहीये म्हणून इथे कमेंटतेय. मी एकदा तुळशीबागेत गेले आहे. काय मस्त वाटतं तिकडे! तुझ्याकडे दोन मुंडक्यांचा कॉम्प्युटर आहे? माझं काम अजून तितकं वाढलेलं नाही पण दोन मुंडक्यांच्या कॉम्प्युटरवर काम करताना कुणाला पाहताना मजा वाटते.
उत्तर द्याहटवाthank you ..
उत्तर द्याहटवाata blog ch templatech badlala ahe ... ata problem bahuda yaycha nahi ..