Monday, 15 August 2011

बळीराजा.कॉम - पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.


शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं..
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न !
शेतकर्‍याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते.  अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. 

Sunday, 14 August 2011

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे
कामांची गडबड व धावपळ ही प्रत्येकालाच असते. कमीत कमी वेळात तुम्हाला अनेक कामांचा वेध घेत सगळे मोर्चे सांभाळायचे असतात.  ऑफिस, घर, वैयक्तिक अशी अनेक कामांची यादी आपल्याकडे सदैव तयार असते. जर तुम्ही तुमच्या कामांचे नियोजन नीट केले नाही तर तुमची कामे रहातात व मागे पडतात. अशा वेळेस तुम्हाला लागतो एक व्यवस्थापक, नियोजक !
जे लोक कॉम्प्युटर व मोबाईल मध्ये उपलब्ध असलेले नियोजक वापरतात , उदा. मोबाईल मधील दिनदर्शिका किंवा कॉम्प्युटर वरील outlook, thunderbird, sunbird अशी साधने वापरतात त्यांना प्रत्येक साधनातील काही उणीवा व फायदे माहीत असतात  व त्याने ते त्रस्त असतात. काही गुण हे खर्चिक असल्या कारणाने ते समाधानी नसतात. कधी कधी ते साधन फुकट असून ही उपयोगी ठरत नाही. तर कधी उपयोगी असते पण वापरा योग्य त्याचा interface नसतो. कधी कधी हे सर्व खूप क्लिष्ट असते.
यावर उपाय म्हणून काही जण इंटरनेटवरील साधने जसे todoist, todo.ly, remember the milk, google calender वापरतात व आपल्या कामांचे नियोजन करतात. वरील सर्व साधने वापरायला सोपी व सरळ आहेत. पण ज्यांना सतत इंटरनेट उपलब्ध नाही त्यानी काय करायचे ? या साधनांमधेसुद्धा [काही अपवाद सोडून ] काही साधने अर्ध-व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध असल्याने काही प्रमाणात तीही कमी पडतात. त्यातील काही महत्वाची व गरजेची  वैशिष्ट्ये वापरण्यासाठी तुम्हाला पैसे  द्यावे लागत असल्याने ती एक प्रकारे मागेच पडतात.

Friday, 12 August 2011

consumermate.com तुमच्या पसंतीचा मोबाइल निवडा सहज !

आज दोघातिघा मित्रांनी फेसबुक वर विचारलं होतं की मोबाइल घ्यायचा आहे. कोणतं मॊडेल सुचवशील ?
..
काल माझ्या मामेभावाचा दुकानातून फोन...
अरे कोणता कॅमेरा तु सजेस्ट केला होतास मागे ..
आता इथे तर इतकी  मॉडेल्स आहेत कोणता घ्यावा ते कळत नाहीय...

यासगळ्याना मी एक वेबसाईट सांगितली तीच इथे पण सांगत आहे ..