नुकतीच दिवाळीची धामधूम संपलीये.. आता सणाला गावाला गेलेली मंडळी त्यांच्या त्यांच्या कामांवर परतली आहेत. दैनंदिन कामं आता परत सूर धरायला लागली आहेत. पण अजून धडामधुडूम चालणारच आहे ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत!
मी या दिवाळीत खूप मजा केली असं अगदी म्हणणार नाही, पण खरेदी, मित्रांच्या भेटीगाठी, दीपोत्सव आणि फराळ याचा मनसोक्त आनंद लुटलाय.. [आता आवाजावरून कळेलच तुम्हाला किती ते! :P ]
इतक्या उशीरापर्यंत पोस्ट न टाकण्याच कारण मात्र "दिवाळीची सुट्टी" हे नव्हतं ! या ब्लॉगला प्रतिसाद यायला लागल्यापासून जरा उत्साह वाढला आणि मी नियोजनाच्या पाठी लागलो. कशा प्रकारे वेगवेगळ्या सॉफ्ट्वेअर्सना मांडायच? एकाच पोस्ट मधे सगळं सांगाव की तुकडे करून .. एकच एक विषय धरायचा की इतर ही काही? मराठी - इंग्रजी भाषा वापरायची की मनोगत.कॉम वर तयार होत चाललेली मराठी प्रतिशब्दांची भाषा वापरायची? का आपणच नवे शब्द शोधायचे ? bla bla bla .. आणि त्यामुळे सलग पोस्ट नाही लिहू शकलो. असो.. आता या येत्या पोस्टस मधे नक्की आपण काय पहाणार आहोत?, याच विषयी सांगितलं आहे खालील व्हिडीओत! तुमच्या उत्सुकतेला थोडा अजून ताण द्या. लवकरच मी यातील एक एक मुद्दे आणि मधेच एखादी वेगळी पोस्ट घेऊन येणार आहे.
ता.क. : ह्या प्रक्षेपणात इंग्रजीमधे मुद्दे लिहीले आहेत. पुढील प्रक्षेपणांमधे सर्व मुद्दे मराठीतूनच असतील. यावेळेस तसदी बद्दल क्षमस्व.

ound is not properly set
उत्तर द्याहटवाchaan ahe site ... informative
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रांनो !
उत्तर द्याहटवा