मराठीब्लॉगर्स च्या ग्रूप ने स्थापन मराठीमंडळी.कॉम केलेले हे संस्थळ .. आज रात्री १० वाजता सुरु झाले. या आधी मायबोली, मराठी माती, मनोगत, ffive.in, मिसळपाव अशी अनेक संस्थळे निर्माण ही झालेली आहेत. त्यांच्या वाटचालीचे आपण साक्षीदार आहोतच . मराठी संस्थळ विश्वात अशी अनेक संस्थळे निर्माण होत आहेत आणि स्वत्व जपण्याच्या बरोबरच मराठीचे अस्तित्व निर्माण करत आहेत.
मराठी मंडळी बद्दल
ही मंडळी आहेत भुंगा, पंकज झरेकर, अनिकेत समुद्र, विक्रांत देशमुख, विशाल तेलंग्रे आणि आपण सर्व मराठी मंडळी !!
त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ..
कोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. ह्या एका गोष्टीमुळेच प्रत्येकाचे स्वतंत्र असे मराठीतून ब्लॉग होते, आहेत....
हळु हळु असे लक्षात येऊ लागले की आपल्यासारखेच हजारो आहेत. ह्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असं म्हणतात की ‘गर्दीचा कुठला चेहरा नसतो’. पण मराठी भाषेने झपाटलेल्या काही तरूणांनी हेच वाक्य खोटं करुन दाखवण्याचा ध्यास घेतला. आपण मराठी ध्येयवेड्यांना एकत्र करुन ह्या गर्दीला एक चेहरा द्यायचा.. “मराठी मंडळी” ब्लॉगर्स. पुढे वाचा ....
काही ठळक वैशिष्टे :
- एकदम मूळ साहित्य. फक्त ब्लॉगर्स लिहिणारे असल्याने त्यात उचले गिरी नसेल.
- काहीतरी रचनात्मक करणे हा उद्देश.
- इथे तुम्हाला विविध चर्चा, गप्पा , नव साहित्याचे सादरीकरण भाग आहेत व अध्यात्म ते इतिहास, खगोल, खेळ,
छायाचित्रण असे अनेक विषय पाहता वाचता येतील. - प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे शुभेच्चा पत्रे ही उपलब्ध आहेत.
- जरी नाव मराठी मंडळी असले तरी तुम्हाला इथे इंग्रजी बरोबरच इतर १० भारतीय भाषा मध्ये अभिप्राय देता येईल अशी सोय आहे. यावरूनच त्यांचे सर्वसमावेशक धोरण दिसते ..
- चर्चासाठी एक स्वतंत्र चर्चा मंच आहे.
- त्याच बरोबर तुमचा ब्लॉग ही तिथे जोडला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या बरोबरच इतरांचे ब्लॉग ही पाहून वाचू शकता .
- सदस्यत्व नोंदणी सुरु आहे.
नमस्कार,
उत्तर द्याहटवाया ब्लॉगपोस्टसाठी मराठीमंडळी प्रशासनातर्फे आपले मनापासून आभार.