Thursday, 14 January 2010

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

काही संगणकासाठी wallpapers केले आहेत.
ते तुम्हाला इथे मिळतील.
या पानावर गेल्यावर डावीकडे download या शब्दावर टिचकी मारा. एक wallpaper.zip अवतरित होईल. त्याच्या आत तीन आकाराचे wall papers आहेत.

आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या ..
कस झालंय ते जरूर सांगा !! :)
पुन्हा एकदा ..
मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, 1 January 2010

गुगल आय एम इ - एक मस्त टंकलेखन सुविधा

गूगलने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे गुगल आय एम ई transliteration आज पर्यंत आपण गमभन किंवा बारह या प्रणालीचा वापर करत होतो. आणि त्यात रुळलो हि आहोत. पण त्या बाह्यपद्धतीच्या प्रणाल्या आहेत. स्वत विंडोज लिनक्स आपल्याला मराठी भाषेत टंकलेखन करायला साह्य करतात पण त्या वापरणं जरा क्लिष्ट आहे. कळफलक लक्षात ठेवावे लागतात. या उलट गुगल आय एम इ ने ही सोय थोडी हलकी होते आणि आपल्या कॉम्प्युटरला फार त्रास ही होत नाही :D .. मी या व्हीडीओत हे कसे वापरायचे आहे ते दाखवले आहे.