पोस्ट्स

ऑक्टोबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंटरनेट एक्सप्लोरर - ०१

नुकतीच दिवाळीची धामधूम संपलीये.. आता सणाला गावाला गेलेली मंडळी त्यांच्या त्यांच्या कामांवर परतली आहेत. दैनंदिन कामं आता परत सूर धरायला लागली आहेत. पण अजून धडामधुडूम चालणारच आहे ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत! मी या दिवाळीत खूप मजा केली असं अगदी म्हणणार नाही, पण खरेदी, मित्रांच्या भेटीगाठी, दीपोत्सव आणि फराळ याचा मनसोक्त आनंद लुटलाय.. [आता आवाजावरून कळेलच तुम्हाला किती ते! :P ] इतक्या उशीरापर्यंत पोस्ट न टाकण्याच कारण मात्र "दिवाळीची सुट्टी" हे नव्हतं ! या ब्लॉगला प्रतिसाद यायला लागल्यापासून जरा उत्साह वाढला आणि मी नियोजनाच्या पाठी लागलो. कशा प्रकारे वेगवेगळ्या सॉफ्ट्वेअर्सना मांडायच? एकाच पोस्ट मधे सगळं सांगाव की तुकडे करून .. एकच एक विषय धरायचा की इतर ही काही? मराठी - इंग्रजी भाषा वापरायची की मनोगत.कॉम वर तयार होत चाललेली मराठी प्रतिशब्दांची भाषा वापरायची? का आपणच नवे शब्द शोधायचे ? bla bla bla .. आणि त्यामुळे सलग पोस्ट नाही लिहू शकलो. असो.. आता या येत्या पोस्टस मधे नक्की आपण काय पहाणार आहोत?, याच विषयी सांगितलं आहे खालील व्हिडीओत! तुमच्या उत्सुकतेला थोडा अजून ताण द्या. ल...

शुभ दीपावली

इमेज
दिवाळीच्या पहाटे पहाटे आज ही पोस्ट लिहिताना खूप मस्त वाटत आहे. नेहेमीप्रमाणे २-३ दिवस आधी किंवा उशीरा पोस्ट टाकायला ही काही पोस्टाची पोच नाही .. पण ही पोस्ट वाचल्यावर तुमच्या प्रतिक्रियांची बक्षीस द्यायला विसरू नका हं! तर असो .. ही दिवाळी आपणास सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानी आपले जीवन प्रकाशमय करणारी होवो. हा प्रकाशाचा उत्सव आपल्या जीवनात आनंद ज्ञान आणि चैतन्य घेऊन येवो. माझ्याकडून पुढील पोस्ट्ला उशीर होईल अस दिसत आहे. तरी ही मी लवकरात लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करीन .. :) तोवर enjoy .. आणि फराळावर ताव मारा ! :D

ब्राऊझर्सचे महत्व

गेल्या पोस्टमध्ये आपण स्पॅम म्हणजे काय पाहिलं आणि त्या आधिच्या पोस्टमध्ये ब्राऊझर म्हणजे काय ते ! आता आपण ब्राऊझर मधल्या काही छोट्या गोष्टी पहाणार आहोत. ज्या मी येत्या प्रक्षेपणात दाखवणार आहेच पण आपण काय काय पहाणार आहोत याचा हा एक आलेख आहे म्हणाना ! मला राहून राहून या ब्राऊझरला समजावून सांगताना नावेचं आणि नावाड्याचं उदाहरणच द्यावस वाटतय .. नावांचे - होड्यांचे  जसे प्रकार असतात तसेच या ब्राऊझरचे ही आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने, वापराच्या दृष्टीने काही उपयोगी ठरणारे आहेत तर काही जुने पण stable म्हणून प्रसि्द्ध आहेत. सर्व सामान्यनजरेने पाहिलं तर या ब्राऊझर प्रकारच्या applications [संगणक प्रणाली / आज्ञावली ] मध्ये आपण खालील सोयी पहातोच पहातो. history - या मधे आपण आता पर्यंत पाहिलेल्या सर्व माहितीस्थानांची [websites] माहिती येते. आपण कधी केंव्हा किती वेळ कोण कोणती  पाने चाळली ते पहाता येते. bookmarks / favorites - आपण इथे आपल्यला आवडलेल्या पानांची नोंद करून ठेवू शकतो जे आपण नंतर परत कधी / वारंवार वापरू शकतो. जसे आपण पुस्तक वाचताना पुस्तकामधे एखादी खूण म्हणून काही कागद वा पेन ठेवतो तसेच...

स्पॅमायणाचा उत्तरार्ध !

Dictionary: spam pronunciation :(स्पॅम) (spăm) .. n : Unsolicited e-mail, often of a commercial nature, sent indiscriminately to multiple mailing lists, individuals, or newsgroups; junk e-mail. i.e. Senseless Pointless Annoying Message Sending People Annoying Mail Sad Pointless Annoying Messages blah blah blah . .. तर हे स्पॅम नक्की आहे तरी काय? सोप्पं नेहमीच्या भाषेत सांगायचं झालं तर पेपरमधे जशी पत्र-पत्रावळ्या येतात तश्या प्रकारच्या इमेल्स किंवा वेबसाईटस. पण जाहिरात आणि स्पॅमिंग ह्यात नक्कीच फरक आहे. अगदीच आपण वर्तमानपत्रातील पत्रावळ्यांशी तुलना केली तर त्यात त्या पत्रावळ्या ब~या असं म्हणावं लागेल.[निदान रद्दीत तरी घालता येतात ! :P ] स्पॅम या प्रकारच्या वेबसाईट अथवा इमेल्समधे आपण आपल्या नकळत ओढले जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत रहातो. ज्यामुळे ज्याने स्पॅम केले आहे त्याला पैसे मिळत रहातात. नक्की काय असतं ? कसं करतात हे ? साधं गणित आहे. एका माणसाने एक वेबसाइटच्या लिंक वर क्लिक [ टिचकी ] मारल्यावर जर स्पॅमरला त्याचं कमिशन $1 मिळत असेल तर जो स्पॅमर आहे, तो त्या कंपनीसाठी किंवा ती...

हुर्र्रे ! आपण सुटलो ..

अरे हे मधेच काय लिहितोय हा ? असं मनात आलं असेल तुमच्या, पण झालंच तस होतं. जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी सांगावे || शहाणे करून सोडावे | सकळजन ..|| या श्लोकास प्रमाणमानून हा ब्लॉग सुरु केला आणि पहिला धक्का गूगल नेच दिला. आता नक्की काय झालेलं ते सांगणं कठीणच आहे तरीही पण सांगायचा प्रयत्न करतो. गूगल ही सध्याची सर्वात मोठी internet मधील सेवा देणारी संस्था आहे. या वेबसाईट्मागे ही जे तंत्रज्ञान आहे ते ही गूगलचंच! आता झालं काय की हा ब्लॉग सुरळीत लागायला आणि त्याला स्पेम घोषित करायला एकच वेळ आली आणि माझा हा ब्लॉग चक्क गूगलने ब्लॉक [प्रतिबंधित] केला. मलाही हे सारं नवीन होत त्यामुळॆ थोडा मूड गेला होता. [ पण its oke.. you will pass through :) असा तुमच्यापैकी काही मित्रानी धीरही दिला. thanks to all support friends ! ] खरं सांगायचं तर कारण काहीच नव्हतं मी कोणत्याही नियमांच उल्लंघन केलं नव्हतं की अजून काही वेगळंही केल नव्हतं. स्वत: गूगलच्या विपत्रात [email] त्यानी हे मान्य केलं होत की आमच्या स्वचलित anti spam filters च्या काही चुकांमुळेही कधी कधी असे होते. तरी खालील पत्त्यावर संपर्क साधा. आपल्या ...

ब्राऊझर्सची ओळख..

ब्राऊझर्सची ओळख.. जेव्हा पासून या ब्लॉगबद्दल लिहायला विचार करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून घरातलं मित्रांमधलं वातावरण बदललय.. मी परवा पेपर वाचताना आईला म्हणलं कोडं आलंय का? कोणत्या पानावर आहे? ती म्हणे कसला कोड ? म्हणजे computer code .. काय म्हणू .. दोन मिनीट उडालोच ! असो .. सुरूवातीला आपण इंटरनेट्चा इतिहास.. त्यानंतर त्याची theary हे समजून घेणार आहोत असं जर तुम्हाला वाट्त असेल तर ते साफ चूक आहे.. मी या कशात ही आत्ताच न पडता तुम्हाला Direct वापर कसा सुरु करायचा आणि काय काय इथे आहे ते दाखवणार आहे. सर्व प्रथम तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद ! श्री गणेशा! इन्टरनेटचा वापर करण्यासाठी आपल्याला काही सॉफ्टवेअरस [संगणकप्रणाली] लागतात. त्याना ब्राउसर्स असे म्हणतात. काय आहे हे प्रकरण ? कसा किती आणि किती प्रकारचे आहेत ते? हे सर्व आपण या videoत पहाणार आहोत. स्क्रीनकास्ट = प्रक्षेपण क्र ०१ या नंतर आपण एकेक सुविधांची छोट्या छोट्या प्रक्षेपणांमधून माहिती पाहूच .. so Stay connected !

e - संवाद

इमेज
" इंटरनेट्च्या शोधामागचा मूळ उद्देश लक्षात घेतला तर तो आहे संवाद आणि माहितीची देवाणघेवाण " .. अगदी सरकारी संगणक व माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण पुस्तिकेतलं वाक्य वाट्तंय ना .. पण आहेच तसं. मूळ कुठल्याही माध्यमाच्या निर्मीती किंवा शोधामागे संवाद हेच एक कारण आहे. त्याला इंटरनेट कसा अपवाद असेल. ईमेल, text-chat = सहजसंवाद [ chat - ला मराठी शब्द म्हणून कसा वाट्तो ? ] वेगवेगळ्या फोरम्स आणि वेबसाईट्स या सर्व माध्यमातून आपण काही ना काही प्रकारे कुणाशी न कुणाशी संवाद साधू शकतो. इमेल : सर्व प्रथम इमेल हा प्रकार अस्तित्वात आला. याला इपत्र किंवा विपत्र असं ही मराठीत म्हणता येइल.पूर्वी ही सर्व्हीस मोफत नव्हती पैसे देऊनच वापरता येत होती. पण सबीर भाटिया व जॅक स्मिथ या मित्रांनी मिळून केलेल्या प्रयत्नाने hotmail.com चा जन्म झाला. hotmail ही पहिली वेबमेल सर्व्हिस होती जी फुकट आणि सहज वापरण्याजोगी होती. साहाजिकच hotmail हिट & हॉट झाली. लोकांनी या सेवेला प्रचंड प्रतिसाद दिला. " जे जे फुकट ते ते पौष्टिक " या उक्ती प्रमाणे मोफत वेबमेल सर्व्हिसेस सद्ध्या खूपच पॉप्युल...