व्हाट्सअप ने व्यावसायिकांसाठी काढलेली ही एक आवृत्ती आहे. Whatsapp business ची वेगवेगळी features वापरून तुमचा व्यवसाय व्हाट्सअपवरती प्रसारित करू शकता. तुमची व्यवसायाची जाहिरात करू शकता, तर कसं वापरायचं हे चला पाहूयात!
सर्वप्रथम आपल्याला ही लक्षात घ्यायचे की व्हाट्सअप बिझनेस वापरण्यासाठी आपल्याला एक एक वेगळा फोन नंबर वापरायचा आहे. तुम्ही आधी चा व्हाट्सअप नंबर जर इथे वापरलात तर तुमचं ते पर्सनल व्हाट्सअप आहे ते बंद होईल आणि बिझनेस व्हाट्सअप चालू होईल. जर तुम्हाला आधी चा नंबर पुढे व्यवसायासाठी वापरायचा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर एक नवीन व्हाट्सअप बिजनेस चा साठी नंबर घ्या
- सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर मध्ये जाऊन व्हाट्सएप बिजनेस डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल
- त्यानंतर आपल्याला सेटप रिझल्ट मधून सर्व माहिती विचारली जाईल तुमचा क्रमांक किंवा नंबर व्हेरिफाय केला जाईल त्यावेळेस तेही विचारेल तुमचा हा क्रमांक व्हाट्सअप ला कनेक्टेड आहे तो डिस्कनेक्ट करून व्हॉट्सऍप बिजनेस ला जोडायचा का त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचे आहे जर तुमचा नंबर नवीन असेल व्हाट्सअप ला जोडलेले नसेल तर हा प्रश्न येणार नाही
- त्यानंतर तो आपल्याला व्यावसायिक माहिती विचारेल यामध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव तुमच्या व्यवसायाचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तुमच्या व्यवसायाचा जर लोगो असेल तर तो किंवा एखादे छानसे ग्राफिक तुम्ही याला डीपी म्हणून वापरू शकता
- तुमच्या व्यवसायाची माहिती इथे विचारतात त्या वेळेला त्यात जास्तीत जास्त स्पष्ट स्वरुपात तुमच्या प्रोडक्स किंवा सेवांबद्दल लिहा एक लक्षात घ्या व्हाट्सअप तुमची ही माहिती पूर्णपणे वाचून मग व्हेरिफाय करते आणि त्यानंतर तुमचे अकाऊंट ऍक्टिव्हेट होत असते त्यामुळे खरी माहिती तर जास्त उत्तम!!
- त्यानंतर मात्र तुम्हाला जे व्हाट्सअप मिळेल ते मोकळे असेल, पण जसे तुमचे संपर्क आणि कम्युनिकेशन वाढतील तसे तसे ते रुळेल.
- व्हाट्सअप आणि व्हाट्सअप बिझनेसचा मीडिया डाऊनलोड होतं ते सगळं वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह असत, त्यामुळे तुमचं आधीच व्हॉट्सॲप आणि हे व्हॉट्सॲप वेगवेगळे राहतं. त्यामुळे मोबाईल मध्ये जर कमी स्टोरेज असेल तर मात्र ते वाढवणं अतिशय गरजेचे आहे
प्रमुख वैशिष्ट्ये
- आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जेव्हा टाईप करतो त्यावेळेला आपला त्याचा फोटो त्याचा फोन नंबर त्याचा टेक्स्ट स्टेटस हे पाहायला मिळतं पण व्हाट्सअप बिझनेसमध्ये याहूनही अधिक माहिती आपल्याला देता येते जसं की तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस तुमच्या व्यवसायाची ची अधिक माहिती ती तुमच्या व्यवसायाची कॅटेगिरी आणि बरच काही
- व्हॉट्सऍप बिजनेस एक प्रमुख फीचर आहे ते म्हणजे कॅटलॉग. कॅटलोग्ज मध्ये तुम्ही तुमच्या प्रमुख सेवांचे फोटो त्याची टेक्स्ट माहिती आणि त्याची किंमत किंवा सुरु होणारी किंमत अशा गोष्टी देऊन त्याच लोकांना किंवा तुमच्या प्रोस्पेक्ट ना पाठवता येतात. त्यांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय रिप्रेझेंट करता येतो.
- तुमचा कॅटलॉग मधला एखादी सेवेचा किंवा प्रॉडक्ट चा पोस्ट बघितल्यानंतर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर संपर्क केलात तर त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक ग्रीटिंग मेसेज किंवा रिप्लाय देता येऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्यावेळेस सुट्टीवर असाल किंवा प्रवासात असाल तर हवे मेसेज हा सुद्धा देता येतो त्याची सोय व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तुम्ही अटेंड किंवा रिप्लाय केला नाही असे होत नाही
- ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असतात किंवा एका वेळेस तीन चार व्यक्तींचे व्यावसायिक पद्धतीचे बोलत असतात त्या वेळेला तुम्हाला त्याच त्याच पद्धतीची उत्तर किंवा मजकुराची उत्तर द्यावी लागतात उत्तर तुम्ही दरवेळेला टाइप करणार किंवा कॉपी-पेस्ट करणार तर या ऐवजी व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये तुम्हाला क्विक रिप्लाय असा ॲक्शन दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही नेहमीची उत्तर आधीच सेव्ह करून ठेवू शकता आणि शॉर्टकट टाईप करून ती पुन्हा पुन्हा इतर लोकांना पाठवू शकतात उदाहरणार्थ तुमच्या सर्विस बद्दलची माहिती किंवा तुमचे पेमेंट डिटेल्स किंवा तुमच्या वेबसाईटची माहिती असं काहीही जे तुम्हाला नेहमी नेहमी टाईप करावं लागतं ते!!
- व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची url देता येतेच पण तुमच्या प्रत्येक सेवेच्या किंवा प्रॉडक्टच्या पेजची सुद्धा वेगळी व्यक्ती url देता येते त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त युवा व्हाट्सअप वर spread होतात असतात जेणेकरून तुम्हाला लीड्स मिळण्याची शक्यता वाढते तुम्ही जर तुमच्या कस्टमरचा किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या ग्राहकांच्या जर एखादा ग्रुप तयार केला असेल तर त्यावरूनही तुमच्या व्यवसायाची जाहिरात चांगली होऊ शकते जेवढे ग्रुप तुम्ही जास्त जॉईन केलेले असतील तेवढ्या तुमच्या प्रोडक्ट चा किंवा url चा रिच वाढतो, प्रसार वाढतो आणि तुमची लीड मिळण्याची शक्यताही वाढते. यासाठी तुमची जाहिरात सुद्धा आकर्षक असणे महत्त्वाचे आहे.
- व्हॉट्सऍप बिझनेस प्रोफाइल सेट करताना तुम्हाला वेबसाईट ची url देता येते व त्याच बरोबर एका सोशल मीडियाच्या पेजची url देता येते. ज्यामुळे तुमचे ग्राहक तुम्हाला सोशल मीडियावरही संपर्क करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !