हा नवा अवतार आणण्यासाठी तुम्हाला जीमेल ची माहिती वापरून यूट्यूब ला लॉगिन करायचे आहे व त्यानंतर
http://www.youtube.com/cosmicpanda
इथे जाऊन try it out वर टिचकी मारायची आहे.
या नवीन यु ट्युबमधे तुम्हाला व्हिडीओ विविध आकारात पहाता येतील ते ही सहज एका क्लिक मधे. चार आकारात हे दिलेले आहेत. याशिवाय आधिची फुलस्क्रीन साइझ उपलब्ध आहेच.
तसेच याच दुसरं वैशिष्ट्य आहे ते सुचविलेले [suggested] व्हिडीओ चा नवीन फलक. व्हिडीओ प्लेअर च्या खाली दोन दुवे येतात त्यातील comments वरून अभिप्राय तर suggested videos वर टिचकी मारून हा नवीन फलक पहाता येतो.
तुम्हाला हा खास अवतार पहाण्यासाठी तुमचा जीमेल युजर व पासवर्ड वापरून लॉगिन कराव लागतं.
त्यानंतर तुमची खात्याची माहिती व तुमचे बुकमार्क केलेले व्हिडीओ तुम्हाला असे दिसतील.
तेव्हा नक्की भेट देऊन बघा या कॉमिक पांडाला .. आणि कळवा तुमच्या प्रतिक्रीया !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे मत वाचायला जरूर आवडेल. नक्की लिहा !