Thursday, 27 November 2008

निषेध ! निषेध .. त्रिवार निषेध ..

Photobucket
काळरात्री कशाचीही पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी स्वत्वाचा होम करणा-या सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. या हल्ल्याचा निषेध म्हणून तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून नेटवि्द्यार्थीवर पुढील आठवडा वरील चित्रकडेच्या मथळ्यात लावणार आहे. त्याच बरोबर काळ्यारंगाची पार्श्वभूमि राहील. माझी वैयक्तिक विनंती आहे की हे चित्र तुम्ही ही तुमच्या ब्लॉगच्या दर्शनी भागात लावून हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली व्यक्त करावी. ही नम्र विनंती

Monday, 24 November 2008

ब्लॉग रीडरला जोडताना !

नमस्कार..
काय कशी वाटली ब्लॉग यंत्रणा.. ब्लॉग तयार केलात की नाही अजून ? नाही ? अरे मग करा ना लवकर! फुकट आहे .. इतकी सोय आहे .. एखादा करून पहायचा.. कळेल कसा प्रतिसाद मिळतोय ते! आणि केला असेल तर खाली तुमच्या अभिप्रायात लिहा की .. किंवा एखादी लिंक टाका नुसती .. असो ..
मला माहित आहे तुमच्या मनात अजून ही शंका आहे की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या ब्लॉगवर कोण येणार? लोकांना काय स्वप्नं पडणार आहेत का मी ब्लॉग सुरू केल्याची?
अगदी बरोबर आहे ही शंका.. माझ्याही मनात ती आली होती! .. [ ती म्हणजे लगेच शंकेने पाहू नका ! शंकेबद्दलच बोलत आहे मी! :D] असो.. तर त्यावर काही उपाय आहेत तेच सांगणार आहे आज !
दोन उपाय स्वत: गूगलच पुरवत आहे. एक म्हणजे गूगल रीडर आणि दुसरा तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या शेजारीच followers किंवा चाहते या नावाखाली दिसेल. हे काय आहे ते पहाण्यापूर्वी आपण नक्की ही संकल्पना काय आहे ते पाहू या !
खालील व्हिडीओ हा गूगलने स्वत: प्रकाशित केला आहे. इंग्रजीत आहे. न समजल्यास प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही..[ पण न समजण्याचा प्रश्न ही येत नाही असा हा व्हिडीओ आहे .. ]


आणि हा ही एक व्हिडीओ पहा
How to setup google reader account ?

हा ही गूगल रीडरसाठी उपयुक्त आहे.
आता हे follower system काय आहे. ते उद्याच्या पोस्ट्मधे पाहू या !

Saturday, 22 November 2008

नवे कागद - नव्या पोस्ट ..

ब्लॉगवर काहितरी फण्डू करत रहाणे माझा छंद आहे.. web designer आहेना! हा नवा बदल कसा वाटत आहे तुम्हाला .. पहा आणि कळवा !

मी आधी ही एक ब्लॉग चालवायचो .. त्यावरही खूप किडे करत मी तासंतास वेळ घालवला आहे. मजा येते.. कोड नव्हे कोडं सोडवल्या सारखं वाटतं.. कारण मी हे असंच डोकेफोड करत शिकत आलोय .. काही तरी नवीन करत रहायला आवडतच सगळ्याना .. आता हेच पहा ना ! जरा बदल म्हणून हे कागद प्रत्येक पोस्टच्या खाली सारलेत.. ते सारायाला इतकावेळ घातलाय की एवढ्यात ख-या कागदांची रद्दी घालून झाली असती ! हौसेला मोल नसतं म्हणतात तेच खरं ..
यात मी एकावर एक टाकलेले कागद दाखवले आहेत आणि त्याना कापायला एक कट मार्क ही टाकला आहे ..
तुम्हाला कसा वाटतोय हा छोटा बदल?

Friday, 21 November 2008

ब्लॉग कसा तयार करायचा ?

मित्रांनो, कशी झाली ब्लॉगगिरी?
तुमचा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न केलात का नाही? असो.. नसेल केला तर ही तुमच्यासाठी खास पोस्ट .. ब्लॉग्गर.कॉम वर ब्लॉग कसा तयार करायचा? ह्या मध्ये आपण गूगलचे खाते कसे उघडायचे ते ही पहाणार आहोत आणि ब्लॉग्गरचे ही खाते कसे उघडायचे तेही पहाणार आहोत. पहा आणि तुमचे मत लिहा. परत भेटूच तोवर
happy blogging !


Thursday, 20 November 2008

संस्थळांचे प्रकार - २

संस्थळांचे प्रकार या विषयाला येण्याच एक कारण आहे की आता तुम्हाला Internet explorer मधून संस्थळे पहाता येत असतील, हे नक्कीच पण यात खूप काही करण्याची ताकद आहे हे ही लक्षात आले असेल. आता तुमचा internet म्हणजे विश्वजालातला प्रवास आणखी बहुरंगी करण्याकरताच आता मी काही वैशिष्ट्यपूर्ण संस्थळांची माहिती पण इथे देणार आहे. त्याचबरोबर दुसरं कारण असं की आजच्या ट्रेंड बद्दल तुमच्या मनात जे कुतूहल जागं झालंय आणि ज्यामुळे तुम्ही विश्वजालात त्याची माहिती घेण्याकरता आला आहात त्याच समाधान करणं !
आपण आता पर्यंत संस्थळांच्या शेवटच्या किंवा आडनावावरून त्यांचे प्रकार पाहिले. .com, .co.in, .net वगैरे वगैरे .. आता त्यांच्या उपयोगानुसार प्रकार पाहू. अगदी ढोबळमानाने विश्वजालातल्या संस्थळांचे static , dynamic असे दोन मुख्यप्रकार आहेत आणि त्यातिल dynamic मध्ये आत्ताचे म्हणजे तथाकथित web 2.0 चे प्रकार येतात. forums, Blogs, Portals, Matrimony, Real estate portals, Community websites, Social networking websites, Portfolios, e-commerce, Online services आणि अनेक इतरही !
आज आपण ब्लॉग या प्रकाराची माहिती घेऊ.


हा ब्लॉग फंडा काय आहे ?
Blog = Web + log
अपभ्रंश == blog,

मराठी - अनुदिनी, रोजनिशी
blogging.- ब्लॉग लिहीणे
blogger - ब्लॉग लिहीणारा अर्थात तुम्ही .. :)

रोज जशी आपण अनुदिनी किंवा रोजनिशी लिहितो तशा संकल्पनेतून ह्या प्रकाराची निर्मीती झाली. रोज काहीना काही लिहायचे, वाचायचे आणि त्यावर मत मांडायचे यावर हा फंडा आधारलेला आहे. विशेषत: IT कंपन्यांमधून काम करण्या-या लोकांना वाचायला लिहायला काही वेगळावेळ मिळत नाही. त्यामुळे त्या घाईगडबडीच्या जगात पटकन काम करता करता एखादा मित्राचा ब्लॉग वाचला, त्यावर त्याला टपली मारली आणि आपला हालहवाल आपल्या ब्लॉगवर टाकाला. लोकांना पत्ता कळवून त्या संस्थळावर आणायला लागतो तेवढाच काय तो वेळ! त्यानंतर लोक आपोआप परत येत रहातात, टपल्या कॉमेण्ट्स \ कानपिचक्या, कोपरखळ्या मारतात..
काही जण हा ब्लॉगप्रकार मजेशीर पद्धतीने हाताळतात तर काही अगदी गंभीरतेने .. म्हणतात ना व्यक्ति तितक्या प्रकृति ! .. ... कोणत्याही उद्देशाने तुम्ही हा प्रकार वापरा तो तुम्हाला वेड लावेल त्याच्या प्रेमात पाडेलच यात शंका नाही. मात्र तुम्ही काहीतरी मजेशीर किंवा माहितीपूर्ण मनोरंजक लिहीत राहिले पाहिजे ..

लिहायलाच पाहिजे असं काही आहे का ?

नाहीच मुळी ..लिहील नाही समजा जाता जाता मोबाईलवर एखादा मजेशीर फोटो मिळाला तर तो टाकायचा. अगदी काहीही .. तुम्ही पेपर मधे काय वाचलत त्यावर तुमचे मत काय आहे किंवा एखाद्या झक्कास पदार्थाची रेसिपी किंवा तुमची आवड्ती कविताही चालेल किंवा एखादी मजेशीर गोष्ट, मित्राच्या वाढदिवसाचा एखादा व्हिडीओ सुध्दा .. फक्त जे लिहायच किंवा टाकायच ते तुमच्या आनंदासाठी .. लोक ते वाचून खूष झाले तर ते पुन:पुन्हा येतात आणि कॉमेण्ट्स पण पड्तात { मग खरी धमाल सुरू होते ..}
ब्लॉग लिहीताना खरं नाव असलंच पाहिजे असं नाही. तुम्ही एखादं टोपणनाव ही घेऊ शकता जसं जास्वंदी इथं लिहीत आहे. किंवा हे रानफूल इथे लिहितंय ..
पण तुम्ही एकदा ब्लॉग्गर झालात की थोडी जबाबदारी पण येते.. तुम्हाला तुमच्याबद्दल जपून लिहायचे आहेच पण त्यापेक्षाही त्यात सामाजिक भान पण असायला हवं. नाहीतर लोक शिव्या घालायला ही कमी करत नाहीत.

आता इतकं लेक्चर दिल्यावर तुम्ही म्हणाल काही तरी दाखव ज्याला ब्लॉग म्हणतात ! तर तुम्ही जे वाचत आहात तो ही एक ब्लॉगच आहे आणि त्यात मी तुमच्यासाठी हे लिहीत आहे [ज्याला पोस्ट असे म्हणतात.].. तुम्हाला अजून काही मराठी ब्लॉग्स पाहायचे असतील तर तुम्हाला एक छोट काम करायच आहे. फक्त खाली असलेल्या मराठी ब्लॉगविश्व या टिकली वर टिचकी मारा .. आणि एक नवे विश्व तुमच्या पुढे उघडेल. आणखी काही ब्लॉग्स खाली दिले आहेत जे पहायलाच हवेत!काय ?
तुम्हाला ब्लॉग तयार करायचय .. अरे नक्की सांगतो .. पण पुढल्या पोस्ट मधे !
तोवर शैलेश पिंगळे या मित्रान एक पोस्ट या संदर्भात लिहीली आहे ती जरूर वाचा

happy surfing !

Wednesday, 19 November 2008

इंटरनेट एक्स्प्लोरर - ०२

ब्राऊझर्सचा इतिहास पहाता. सगळ्यात जुन्या म्हणजे www या ब्राऊझर कडे जावे लागेल. हा डॉस वर आधारित ब्राऊझर होता आणि त्याला अनुसरूनच पुढे ब्राऊझर तयार केले गेले. पण खरी लोकप्रियता मिळाली ती netscape navigator या ब्राऊझरला. या ब्राऊझर मधे डॉसची क्लिष्टता नव्हती आणि [वेबसाईट्स] संस्थळे पहाणे अगदीच सोपं झाले होते. या नंतर खरतर इंटरनेट्च्या जगात क्रांति झाली. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले. संस्थळे दाखवण्याच्या नव नवीन पद्धती निर्माण होऊ लागल्या. या काळात इतरही ब्राऊझर्स आले जसे की viola, Lynx, Mosiac cello आणि त्यानंतर झाला Internet Explorer चा जन्म!
हा ब्राऊसर सर्वात जास्त काळासाठी वापरला गेला कारण हा विंडोज या संगणक प्रणाली बरोबर येतो आणि त्यामुळे याचे वापरकर्ते ही जास्त आहेत. आता या ब्राऊसर ची ८वी आवृत्ति येत आहे.आणि लवकरच आपण त्यातील ही काही खुबी पाहूच. पण आता सध्या IE6 चा वापर करू या!
हा IE६ चा interface GUI म्हणजे चेहरा मोहरा आहे. ज्याला पाहून आपण काही आज्ञांचा वापर करून विश्वजालाची [internetची] माहिती घेत असतो.


menu bar - यातून आपण आज्ञा देऊ शकतो. यात ठराविक आज्ञांचे संच आहेत जे आपण वापरतो.
Command Bar - यावर वारंवार वापरल्या जाणा-या आज्ञांचा संच आहे.
Address bar - यात आपण पाहू इच्छित असलेल्या संस्थळाचा [website] चा पत्ता टाकायचा असतो उदा. www.yahoo.com, www.netvidyarthi.blogspot.com
वरील चित्रात मी माहिती दिलीच आहे कृपया त्यावर टिचकी मारून ते मोठे करून वाचा.


आता आपण सुरुवात तर झक्कास केली आहे. आपण संस्थळांचे पत्त्यांचे प्रकार पाहिले अजून आता पुढल्या वेळेला मी वेबसाईट्च्या उद्देशानुसार त्यांचे प्रकार कसे पडतात व ते कसे ओळखायचे ते सांगणार आहे. माझा दर दोन दिवसाआड पोस्त लिहीण्याचा प्रयत्न राहीलच !
तो पर्यंत .. happy surfing !

Tuesday, 18 November 2008

संस्थळांचे प्रकार

www.yourwebsite.com
वरील वाक्यातला .com हा जो शब्द आहे तो आहे त्या संस्थळाचा प्रकार.थोडक्यात आपलं जसं आडनाव असतं तसच आहे हे.. जसं सुनील जोशी आणि रमेश जोशी हे वेगवेगळे आहेत पण तरी ते जोशीच आहेत हे कळतं त्यातलाच हा प्रकार. उदाहरणच घ्यायच झालं तर yahoo.com,आणि google.com,
तसंच काही जण गावाचं नाव लावतात. उदा. शंकरराव सातारकर-पाटील, तसंच आहे yahoo.co.in म्हणजे याहूचे भारतातील व्यावसायिक संस्थळ ! आता पाहूया, या संस्थळां[websites]चे अजून काय्क्काय प्रकार आहेत ते !

.com - Commercials
या प्रकारच्या संस्थळांवर व्यवसायिक माहिती असते. सामान्यत: या प्रकारामध्ये सर्व औद्योगिक आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांची माहिती देणारी संस्थळे येतात. पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन ठेवूनच हे संस्थळ निर्माण केले जाते.
उदा. www.borateconstructions.com - ही एक व्यावसायिक बांधकाम करणारी संस्था आहे.
.org - organizations
या प्रकारच्या संस्थळांमध्ये सर्व सामाजिक काम करणा-या, लोकसेवा करणा-या संघटना येतात. NGOs येतात. या मध्ये संस्थळांमधून कोणत्याही प्रकारे आर्थिक उत्पन्न कमविणे हा उद्देश नसतो किंवा असल्यास तो दुय्यम असतो.
उदा. www.gogvip.org - ही संस्था जेट्रोफा या वनस्पतिंपासून इंधन तयार करण्याच्यासाठी काम करत आहे. त्याचा प्रसार करत आहे.
.net - social networking
याप्रकारच्या संस्थळांवर सामाजिक-व्यवसायिक किंवा इतर कोणत्याही उद्देशांना धरून एक संस्थळांचे जाळे विणले जाते. ज्या मधून काही संस्थळे पैसे ही कमवतात तर काही विनामूल्यही सेवा देतात. .net या प्रकारच्या संस्थळांमधून विविध उद्देश साधता येतात.
उदा. मराठीब्लॉगविश्व http://marathiblogs.net/ - हे संस्थळ विना्मूल्य तुमच्या संस्थळाची माहिती इतरांना पुरवते. तुमच्या संस्थळाची अद्यतनेही येथे आपोआप प्रकाशित होतात.

.gov - Governmental services
या संस्थळांवर सरकारी संस्थांची माहिती दिलेली असते. सर्व देशांची अशी संस्थळे आहेत.
उदा. http://india.gov.in/, http://www.maharashtra.gov.in/

.co.in - commercial [website] India

ह्या प्रकारची संस्थळे आता येऊ लागली आहेत जी देशानुसार लावली आहेत. उदा ब्राझील देशातील लोक .co.br असे संस्थळाला जोडतात.
उदा. www.orkut.co.in, www.sbi.co.in/

.info - informational domain
काही संस्थळे माहिती देण्यासाठीच तयार केली जातात जी ठराविक काळानंतर बंद केली जातात. या प्रकारच्या संस्थळांमधून विविध उद्देश साधले जाऊ शकतात.

त्याचबरोबर आता .in, .edu, .biz .mobi असे खूप प्रकार आले आहेत. ज्या प्रकाराची जास्त विक्री होते ते प्रकार ठेवले जातात व इतर मागे पडतात.
तुम्हाला कशी वाटली ही माहिती?
मला जरूर कळवा. आपल्या अभिप्रायामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळतं .. पुन्हा भेटूच !

Tuesday, 4 November 2008

मराठी प्रतिशब्द उपक्रम

मराठी असे आमुची मायबोली ।
जरी आज ती राजभाषा नसे ॥
मराठी अमराठी वाद सध्या जोरात चालू आहेच त्यातच माझ्या वाचनात ब्लॉगमित्र शैलेश खांडेकर यांचा ”विदग्ध” हा ब्लॉग [ ही अनुदिनी] आला/ आली. :) माझ्या वाचनात २-१ वर्षापूर्वी ही हा उपक्रम मनोगत.कॉम च्या द्वारे वाचनात आला होता. पण तो त्यावेळेस अगदी छोटया स्वरूपात होता.


आता ह्या उपक्रमाने जोर धरला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रतिशब्द शोधून शब्दभांडारात टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि मी ही त्या उपक्रमाचा भाग होत चाललो आहे अस मला वाटत आहे.मी सुचवलेले शब्द केशरी रंगात दिले आहेत
त्या पैकी काही शब्द खाली देत आहे. वरील शब्दांमधील रंगीत शब्द हे त्या त्या वेबसाईट्स चे [संस्थळांचे] पत्ते आहेत.

  • मायाजाळ, विश्वजाल, ज्ञानगंगा [ज्ञान + आकाशगंगा] - internet
  • संस्थळ - website - a place on internet.
  • पत्र, विपत्र - email
  • चिट्ठी, चिटोरी, चपाटी - scraps
  • वटवट, गप्पा, चकाट्या - chat
  • वापरिका- application
  • दूरावलोकन - Zoom Out

या उपक्रमात मला काही शब्द पटले काही नाही पटले. काही जड ही वाटले. पण त्या उपक्रमामागचा उद्देश नक्कीच योग्य आहे.
तुम्ही जर नव्यानेच या इंटरनेटच्या विश्वात दाखल होत असाल तर सुरूवाती पासूनच जर तुम्ही हे शब्द वापरात ठेवलेत तर त्या मराठी शब्दांचा प्रसार नक्कीच होण्यास मदत होईल. यात तुम्हीही नवे शब्द सुचवू शकता. विविध विषयांकरता हे शब्द हवे आहेत. तुम्हाला त्याकरता शब्दभांडाराचे सदस्य व्हावे लागते जे विनामूल्य अमूल्य आहे.

तसेच आपल्या या अनुदिनीवर मी मराठीच फक्त शब्द वापरावेत की मराठीबरोबरच "संस्थळ[website]" अशा प्रकारे वापरावेत? ते ही मला सांगा.

* फोटोग्राफर: आशु [पूर्ण नाव माहित असल्यास कळवावे.]