रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

आर्टिफिशियल इंटेलिजेनस काढेल तुमची कल्पना चित्र !! Type your imagination and AI will paint

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक असे सॉफ्टवेअर असते की जे इंटरनेटवरचा उपलब्ध असलेल्या डेटा स्कॅन करून त्याचे पॅटर्न किंवा त्याचे जे प्रकार आहेत ते आपल्या डेटाबेस मध्ये सेव्ह करते आणि त्या प्रकारचा इनपुट आपण दिल्यानंतर तो इनपुट प्रोसेस करून त्यासारखे पॅटर्न आपल्याला परत नव्याने तयार करून देते ज्यावेळेला आपण एखाद्या चित्राची वर्णनात्मक मागणी त्याला देतो त्या वेळेला ते इंटरनेट वरती त्या प्रकारची चित्र असलेला डेटाबेस पाहून तशा प्रकारच्या चित्राची स्वयं निर्मिती करते. 

याचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक इनपुट नंतर त्याचा डेटाबेस वाढत असल्याने व लॉजिक सुधारत असल्याने काही काळानंतर येणाऱ्या परिणामांचा दर्जा किंवा याबाबतीत चित्राचा दर्जा हा सुधारत जातो

असे बरेच प्रोजेक्ट कला, संगीत, साहित्य व वैद्यकीय विषयांमध्ये चालू आहेत.  सध्या त्याच्यामधला मीड जर्नी हा प्रोजेक्ट मी वापरलाय.  त्यासोबतच गुगल इमॅजिन आणि दाली 2 असे व इतर अनेक प्रोजेक्ट्स सध्या मला सापडले आहेत. पण सगळ्यात चांगला दर्जा गुगल इमाजिन, मिड जरनीडाली २ यांचाच आहे.

सध्या माझ्या माहितीनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स रे मधून कॅन्सर चे डिटेक्शन करू शकते.. voice to text conversion, text to audio conversion with personalized voice, speech recognition, image piracy detection, product suggestions, smart traffic management, cybercrime investigation, smart text suggestions, grammar spelling corrections, fraud detection, chatbots, AI assistants जस की google assistant, cortana, alexa, masdima... असे खूप खूप सारे अजून उपाय येत आहेत ..

आमची धाव चित्र काढण्यापर्यंत असल्याने आम्ही हे शोधले, काही जण म्हणतात याने कलाकार हद्दपार होतील.. जे मला अजिबात पटत नाही .. कदाचित ज्याना कलाकृति विकत घेणे शक्य नाहीत त्यांना ह्या कलाकृति घेणे परवडणारे होईल .. तसेच कलाकारांना ही नवे प्रयोग करून पाहता येतील .. अजून हे बाल स्वरूपात आहे .. पुढे पाहू अजून काय काय होते ते !! 

वरील चित्र कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने AI (@midjourney) ने माझ्या दिलेल्या वर्णनावर आधारित काढले  आहे. मी AI ला काय वर्णन दिल असेल बरं comments मध्ये जरूर सांगा?

 




गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

व्हाट्सअप बिझनेस काय आहे? ते कसे वापरायचे? Whatsapp business in marathi


व्हाट्सअप ने व्यावसायिकांसाठी काढलेली ही एक आवृत्ती आहे. Whatsapp business ची वेगवेगळी features वापरून तुमचा व्यवसाय व्हाट्सअपवरती प्रसारित करू शकता. तुमची व्यवसायाची जाहिरात करू शकता, तर कसं वापरायचं हे चला पाहूयात!

सर्वप्रथम आपल्याला ही लक्षात घ्यायचे की व्हाट्सअप बिझनेस वापरण्यासाठी आपल्याला एक एक वेगळा फोन नंबर वापरायचा आहे. तुम्ही आधी चा व्हाट्सअप नंबर जर इथे वापरलात तर तुमचं ते पर्सनल व्हाट्सअप आहे ते बंद होईल आणि बिझनेस व्हाट्सअप चालू होईल. जर तुम्हाला आधी चा नंबर पुढे व्यवसायासाठी वापरायचा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर एक नवीन व्हाट्सअप बिजनेस चा साठी नंबर घ्या


  1. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर मध्ये जाऊन व्हाट्सएप बिजनेस डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल
  2. त्यानंतर आपल्याला सेटप रिझल्ट मधून सर्व माहिती विचारली जाईल तुमचा क्रमांक किंवा नंबर व्हेरिफाय केला जाईल त्यावेळेस तेही विचारेल तुमचा हा क्रमांक व्हाट्सअप ला कनेक्टेड आहे तो डिस्कनेक्ट करून व्हॉट्सऍप बिजनेस ला जोडायचा का त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचे आहे जर तुमचा नंबर नवीन असेल व्हाट्सअप ला जोडलेले नसेल तर हा प्रश्न येणार नाही 
  3. त्यानंतर तो आपल्याला व्यावसायिक माहिती विचारेल यामध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव तुमच्या व्यवसायाचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तुमच्या व्यवसायाचा जर लोगो असेल तर तो किंवा एखादे छानसे ग्राफिक तुम्ही याला डीपी म्हणून वापरू शकता 
  4. तुमच्या व्यवसायाची माहिती इथे विचारतात त्या वेळेला त्यात जास्तीत जास्त स्पष्ट स्वरुपात तुमच्या प्रोडक्स किंवा सेवांबद्दल लिहा एक लक्षात घ्या व्हाट्सअप तुमची ही माहिती पूर्णपणे वाचून मग व्हेरिफाय करते आणि त्यानंतर तुमचे अकाऊंट ऍक्टिव्हेट होत असते त्यामुळे खरी माहिती तर जास्त उत्तम!! 
  5. त्यानंतर मात्र तुम्हाला जे व्हाट्सअप मिळेल ते मोकळे असेल, पण जसे तुमचे संपर्क आणि कम्युनिकेशन वाढतील तसे तसे ते रुळेल. 
  6. व्हाट्सअप आणि व्हाट्सअप बिझनेसचा मीडिया डाऊनलोड होतं ते सगळं वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह असत, त्यामुळे तुमचं आधीच व्हॉट्सॲप आणि हे व्हॉट्सॲप वेगवेगळे राहतं. त्यामुळे मोबाईल मध्ये जर कमी स्टोरेज असेल तर मात्र ते वाढवणं अतिशय गरजेचे आहे 

प्रमुख वैशिष्ट्ये

  • आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जेव्हा टाईप करतो त्यावेळेला आपला त्याचा फोटो त्याचा फोन नंबर त्याचा टेक्स्ट स्टेटस हे पाहायला मिळतं पण व्हाट्सअप बिझनेसमध्ये याहूनही अधिक माहिती आपल्याला देता येते जसं की तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस तुमच्या व्यवसायाची ची अधिक माहिती ती तुमच्या व्यवसायाची कॅटेगिरी आणि बरच काही
  • व्हॉट्सऍप बिजनेस एक प्रमुख फीचर आहे ते म्हणजे कॅटलॉग. कॅटलोग्ज मध्ये तुम्ही तुमच्या प्रमुख सेवांचे फोटो त्याची टेक्स्ट माहिती आणि त्याची किंमत किंवा सुरु होणारी किंमत अशा गोष्टी देऊन त्याच लोकांना किंवा तुमच्या प्रोस्पेक्ट ना पाठवता येतात. त्यांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय रिप्रेझेंट करता येतो. 
  • तुमचा कॅटलॉग मधला एखादी सेवेचा किंवा प्रॉडक्ट चा पोस्ट बघितल्यानंतर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर संपर्क केलात तर त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक ग्रीटिंग मेसेज किंवा रिप्लाय देता येऊ शकतो त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्यावेळेस सुट्टीवर असाल किंवा प्रवासात असाल तर हवे मेसेज हा सुद्धा देता येतो त्याची सोय व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तुम्ही अटेंड किंवा रिप्लाय केला नाही असे होत नाही 
  • ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असतात किंवा एका वेळेस तीन चार व्यक्तींचे व्यावसायिक पद्धतीचे बोलत असतात त्या वेळेला तुम्हाला त्याच त्याच पद्धतीची उत्तर किंवा मजकुराची उत्तर द्यावी लागतात उत्तर तुम्ही दरवेळेला टाइप करणार किंवा कॉपी-पेस्ट करणार तर या ऐवजी व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये तुम्हाला क्विक रिप्लाय असा ॲक्शन दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही नेहमीची उत्तर आधीच सेव्ह करून ठेवू शकता आणि शॉर्टकट टाईप करून ती पुन्हा पुन्हा इतर लोकांना पाठवू शकतात उदाहरणार्थ तुमच्या सर्विस बद्दलची माहिती किंवा तुमचे पेमेंट डिटेल्स किंवा तुमच्या वेबसाईटची माहिती असं काहीही जे तुम्हाला नेहमी नेहमी टाईप करावं लागतं ते!!
  • व्हॉट्सऍप बिजनेस मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची url देता येतेच पण तुमच्या प्रत्येक सेवेच्या किंवा प्रॉडक्टच्या पेजची सुद्धा वेगळी व्यक्ती url देता येते त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त युवा व्हाट्सअप वर spread होतात असतात जेणेकरून तुम्हाला लीड्स मिळण्याची शक्यता वाढते तुम्ही जर तुमच्या कस्टमरचा किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या ग्राहकांच्या जर एखादा ग्रुप तयार केला असेल तर त्यावरूनही तुमच्या व्यवसायाची जाहिरात चांगली होऊ शकते जेवढे ग्रुप तुम्ही जास्त जॉईन केलेले असतील तेवढ्या तुमच्या प्रोडक्ट चा किंवा url चा रिच वाढतो, प्रसार वाढतो आणि तुमची लीड मिळण्याची शक्यताही वाढते. यासाठी तुमची जाहिरात सुद्धा आकर्षक असणे महत्त्वाचे आहे. 
  • व्हॉट्सऍप बिझनेस प्रोफाइल सेट करताना तुम्हाला वेबसाईट ची url देता येते व त्याच बरोबर एका सोशल मीडियाच्या पेजची url देता येते. ज्यामुळे तुमचे ग्राहक तुम्हाला सोशल मीडियावरही संपर्क करू शकतात. 

व्हाट्सअप बिझनेस सेट करणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि मार्केटिंगचे एक अतिशय प्रभावी टूल होत चालले आहे. जेवढे ग्रुप तुम्ही जॉईन केले असतील त्या प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही तुमची जाहिरात अतिशय प्रभावीपणे होऊ शकेल.

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

इंक फ्रूट .कॉम

इंक फ्रूट

सहज इंटरनेट वर फिरता फिरता ही इंक फ्रूट .कॉम सापडली .. खास करून तरुणाई साठी असलेल्या या संस्थळावर अनेक प्रकारचे टी शर्ट्स , trousers, casual wares आणि इतरही गोष्टी आहेत , ज्या आकर्षक आहेतच पण विविध रंगात व प्रकारात आहेत .


एखाद्या खास व्यक्तीला खास भेट द्यायची असेल
किंवा तुम्ही खासम खास  गोष्टी विकत घेणाऱ्या शौकीन असाल तर  ही वेबसाईट तुमच्यासाठी  आहेच
पण तुम्हाला काही  वेगळे ट्राय  करायचं असेल तर नक्की भेट द्या.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

बळीराजा.कॉम - पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.


शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं..
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न !
शेतकर्‍याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते.  अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. 

रविवार, १४ ऑगस्ट, २०११

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे
कामांची गडबड व धावपळ ही प्रत्येकालाच असते. कमीत कमी वेळात तुम्हाला अनेक कामांचा वेध घेत सगळे मोर्चे सांभाळायचे असतात.  ऑफिस, घर, वैयक्तिक अशी अनेक कामांची यादी आपल्याकडे सदैव तयार असते. जर तुम्ही तुमच्या कामांचे नियोजन नीट केले नाही तर तुमची कामे रहातात व मागे पडतात. अशा वेळेस तुम्हाला लागतो एक व्यवस्थापक, नियोजक !
जे लोक कॉम्प्युटर व मोबाईल मध्ये उपलब्ध असलेले नियोजक वापरतात , उदा. मोबाईल मधील दिनदर्शिका किंवा कॉम्प्युटर वरील outlook, thunderbird, sunbird अशी साधने वापरतात त्यांना प्रत्येक साधनातील काही उणीवा व फायदे माहीत असतात  व त्याने ते त्रस्त असतात. काही गुण हे खर्चिक असल्या कारणाने ते समाधानी नसतात. कधी कधी ते साधन फुकट असून ही उपयोगी ठरत नाही. तर कधी उपयोगी असते पण वापरा योग्य त्याचा interface नसतो. कधी कधी हे सर्व खूप क्लिष्ट असते.
यावर उपाय म्हणून काही जण इंटरनेटवरील साधने जसे todoist, todo.ly, remember the milk, google calender वापरतात व आपल्या कामांचे नियोजन करतात. वरील सर्व साधने वापरायला सोपी व सरळ आहेत. पण ज्यांना सतत इंटरनेट उपलब्ध नाही त्यानी काय करायचे ? या साधनांमधेसुद्धा [काही अपवाद सोडून ] काही साधने अर्ध-व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध असल्याने काही प्रमाणात तीही कमी पडतात. त्यातील काही महत्वाची व गरजेची  वैशिष्ट्ये वापरण्यासाठी तुम्हाला पैसे  द्यावे लागत असल्याने ती एक प्रकारे मागेच पडतात.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

consumermate.com तुमच्या पसंतीचा मोबाइल निवडा सहज !

आज दोघातिघा मित्रांनी फेसबुक वर विचारलं होतं की मोबाइल घ्यायचा आहे. कोणतं मॊडेल सुचवशील ?
..
काल माझ्या मामेभावाचा दुकानातून फोन...
अरे कोणता कॅमेरा तु सजेस्ट केला होतास मागे ..
आता इथे तर इतकी  मॉडेल्स आहेत कोणता घ्यावा ते कळत नाहीय...

यासगळ्याना मी एक वेबसाईट सांगितली तीच इथे पण सांगत आहे ..

गुरुवार, २१ जुलै, २०११

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

काहीतरी नवीन  हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

मंगळवार, १९ जुलै, २०११

my hangout - नाव इंग्लिश, पुस्तके मराठी !



परवाच्या रविवारी माझ्या कराडच्या काकांकडे गेलो होतो. त्यांनी काही पुस्तकं इंटरनेटवरून मागविली होती. दुपारी  त्याचं कुरिअर आलं होतं ते घेतलं तेव्हा काकांना विचारलं
मी : " बघा सगळी सहिसलामत आहेत ना ?? "
काका : "हो, सांगितल्याप्रमाणे व सहि सलामत...  "
मी :  " कुठून मागविलीत? लोकल आहे का ? "
काका : "नाही पुण्याचं आहे .. "
मी :  " मग मला सांगायचं ना .. मी आणली असती .. "
काका : "ते खरं रे पण तुला यायचं म्हणजे खर्च आहे आणि शिवाय तुला सवलत थोडिच मिळेल पुस्तकाच्या दुकानात ?"
मी : "म्हणजे ?"
काका: " अरे मी इंटरनेटवरून इ पेमेंट करुन मागविली होती ! "
इतकं सांगून ही मला तरी काही अशी उत्सुकता वाटत नव्हती. इंटरनेट्वरून मिळतात त्या सगळ्या गोष्टी स्वस्त पडतात अस नाही किंवा   पडल्याच  त्या धड घरी येतात असही नाही. दोनच पुस्तकं मागवून इतकी व्यवस्थित येणं हि कमाल होती पण तरी ही पुणेरी मनाने "असेल एखाद्या प्रकाशनाच वेबदुकान अस म्हणून सोडून देणार होतो .. "
पण मग काकांनीच ही वेबसाइट दाखवली . इथल्या एक एक सोयी पाहिल्या आणि चाट पडलो.

शनिवार, १६ जुलै, २०११

bing.com आणत आहे सर्च [शोध]च नवीन रूप ..

google search च्या शर्यतीला आता तगडे आव्हान उभे रहाणार अस दिसतंय .. हे आव्हान आहे microsoft चं !
आता पर्यंत गूगल ने सर्च इंजिन मधे खूप बदल केले व ते स्वागतार्ह होते आहेत ही. पण bing.com [BUT ITS NOT GOOGLE = BING ]जे मायक्रोसॉफ्ट चे शोधक आहे त्याने आता कात टाकायची तयारी सुरु केली आहे.

HTML 5 या नवीन तंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या ब्राऊझर मधे आता अगदी नवा व जिवंत शोधाचा अनुभव मिळू शकेल. खालील व्हिडो मधे प्रकाशनपूर्व बिंग च्या नवीन रूपाचे दर्शन होऊ शकेल ..

शनिवार, ९ जुलै, २०११

गेटपिनकोड.कॉम - पिनकोड मिळवा सहज..

 आजकाल पत्र लिहिली जात नसल्याने आपल्या पोस्टाच्या पत्यामधला पिन कोड काय आहे हे बहुदा अनेक लोकांना माहित नसतं, पोस्ट्ल पत्ता हा जवळ्पास कालबाह्यच झाला आहे. कार्यालयीन लेखी व्यवहारच फक्त होत असतात. आपल्याला साधारणत:  स्वत:च्या कार्यालयाच्या जागेचा, किंवा घराच्या पत्याचाच केवळ लक्षात राहतो.
कधी कधी नवीन ठिकाणी पत्र पाठवायचे असते आणि पत्राचा पत्ता माहित असतो .. पण पिन कोड नक्की माहित नसतो . अशावेळेस या सेवेचा तुम्हाला वापर करता येईल..