गुरुवार, २१ जुलै, २०११

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

काहीतरी नवीन  हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

मंगळवार, १९ जुलै, २०११

my hangout - नाव इंग्लिश, पुस्तके मराठी !



परवाच्या रविवारी माझ्या कराडच्या काकांकडे गेलो होतो. त्यांनी काही पुस्तकं इंटरनेटवरून मागविली होती. दुपारी  त्याचं कुरिअर आलं होतं ते घेतलं तेव्हा काकांना विचारलं
मी : " बघा सगळी सहिसलामत आहेत ना ?? "
काका : "हो, सांगितल्याप्रमाणे व सहि सलामत...  "
मी :  " कुठून मागविलीत? लोकल आहे का ? "
काका : "नाही पुण्याचं आहे .. "
मी :  " मग मला सांगायचं ना .. मी आणली असती .. "
काका : "ते खरं रे पण तुला यायचं म्हणजे खर्च आहे आणि शिवाय तुला सवलत थोडिच मिळेल पुस्तकाच्या दुकानात ?"
मी : "म्हणजे ?"
काका: " अरे मी इंटरनेटवरून इ पेमेंट करुन मागविली होती ! "
इतकं सांगून ही मला तरी काही अशी उत्सुकता वाटत नव्हती. इंटरनेट्वरून मिळतात त्या सगळ्या गोष्टी स्वस्त पडतात अस नाही किंवा   पडल्याच  त्या धड घरी येतात असही नाही. दोनच पुस्तकं मागवून इतकी व्यवस्थित येणं हि कमाल होती पण तरी ही पुणेरी मनाने "असेल एखाद्या प्रकाशनाच वेबदुकान अस म्हणून सोडून देणार होतो .. "
पण मग काकांनीच ही वेबसाइट दाखवली . इथल्या एक एक सोयी पाहिल्या आणि चाट पडलो.

शनिवार, १६ जुलै, २०११

bing.com आणत आहे सर्च [शोध]च नवीन रूप ..

google search च्या शर्यतीला आता तगडे आव्हान उभे रहाणार अस दिसतंय .. हे आव्हान आहे microsoft चं !
आता पर्यंत गूगल ने सर्च इंजिन मधे खूप बदल केले व ते स्वागतार्ह होते आहेत ही. पण bing.com [BUT ITS NOT GOOGLE = BING ]जे मायक्रोसॉफ्ट चे शोधक आहे त्याने आता कात टाकायची तयारी सुरु केली आहे.

HTML 5 या नवीन तंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या ब्राऊझर मधे आता अगदी नवा व जिवंत शोधाचा अनुभव मिळू शकेल. खालील व्हिडो मधे प्रकाशनपूर्व बिंग च्या नवीन रूपाचे दर्शन होऊ शकेल ..

शनिवार, ९ जुलै, २०११

गेटपिनकोड.कॉम - पिनकोड मिळवा सहज..

 आजकाल पत्र लिहिली जात नसल्याने आपल्या पोस्टाच्या पत्यामधला पिन कोड काय आहे हे बहुदा अनेक लोकांना माहित नसतं, पोस्ट्ल पत्ता हा जवळ्पास कालबाह्यच झाला आहे. कार्यालयीन लेखी व्यवहारच फक्त होत असतात. आपल्याला साधारणत:  स्वत:च्या कार्यालयाच्या जागेचा, किंवा घराच्या पत्याचाच केवळ लक्षात राहतो.
कधी कधी नवीन ठिकाणी पत्र पाठवायचे असते आणि पत्राचा पत्ता माहित असतो .. पण पिन कोड नक्की माहित नसतो . अशावेळेस या सेवेचा तुम्हाला वापर करता येईल..

शुक्रवार, ८ जुलै, २०११

you tube - च नवं रूप ..

गूगलने बहुदा सर्वच सेवांमधे बदल घडवायचे ठरवले आहे. जीमेल मधल्या नवीन बदलानंतर आता त्यांच्या यूट्यूब सेवेने ही कात टाकली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअर व मोठ्या थंबनेल्स हे या ले आऊटच वैशिष्ट्य असणार आहे. सध्या हि सेवा परिक्षणात आहे पण लवकरच हा लुक सगळ्यांना उपलब्ध होईल.  याच सध्याच नाव आहे कॉमिक पांडा .. आणि एखाद्या पांड्याप्रमाणेच या नविन अवतारात यूट्यूब दोन काळ्या पांढर्‍या छटांमधे उपलब्ध होइल .

गुरुवार, ७ जुलै, २०११

फेसबुक - व्हिडीओ चॅट


गूगल प्लस च्या व्हिडीओ चॅटच्या येण्यानं असलेले ग्राहक टिकवता टिकवता फेसबुकच्या तोंडाला फेस येऊ शकतो हे जेव्हा फेसबुक चालकांच्या लक्षात आलं, तेव्हाच त्यांनी ही सेवा लवकरात लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याच त्यांनी ठरवलं व तसं मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या निर्मात्याने नुकतच जाहीरही केल. त्याच्या म्हणण्यानुसार या आठवड्यातच स्काईप या व्हिडीओ चॅटिंग साठी प्रसिद्ध असलेल्या सेवेला सोबत घेऊन फेसबुकने ही सेवा सुरु केलेली आहे.

मंगळवार, ५ जुलै, २०११

google - take out


सध्या गूगल ने इतक्या नवनवीन सोयी आणल्या आहेत की त्याशिवाय इतर लिहिणंच चूक ठरणार आहे. गूगल टेक आऊट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पूर्वीचा गूगलच्या सर्व्हरवर साठवलेली छायाचित्रे, संपर्क, बझ् पोस्ट्स, गूगल प्रोफाइलवरील सर्व माहिती तुमच्या संगणकावर बॅकअप म्हणून उतरवून घेऊ शकता. हे करण्यासाठी कसलेही मूल्य आकारण्यात येत नाही.
पुढील काही कृतींमधून तुम्ही हे सहज साध्य करू शकाल.


सोमवार, ४ जुलै, २०११

Google - art museum


.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा ..

गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल स्वत:च्या लोगो मधे सदोदित काही सन्देश देणारी चित्रे घालून संदेश देतच असते. चित्रकलाच नव्हे तर एकूणच दृश्यकलेचा खजिना लोकांसमोर सहज उपलब्ध करण्यासाठीच गूगलने हे " आर्ट प्रोजेक्ट " सुरु केले आहे.
यामध्ये तुम्ही जगातिल नामांकित संग्रहालयाच्या काही खास दालनांना भेट देऊ शकताच पण कलाकृतिंचा आनंद अगदी जवळून म्हणजे काही इंचावरून घेऊ शकता.  गूगल मॅप्स प्रमाणेच याही संस्थळाचे निर्माण केले गेले आहे. वापरायला सोपे आणि सहज.
वरील चित्रात जे दिसत आहे ते आहे गूगल आर्ट प्रोजेक्टच पहिल पान. इथे तुम्हाला संग्रहालयांची यादी मिळते. त्यातून तुम्ही संग्रहालय किंवा कडेच्या चित्रावर टिचकी जरी मारलीत तरी तुम्हाला संग्रहालयात प्रवेश मिळतो