
एखाद्या खास व्यक्तीला खास भेट द्यायची असेल
किंवा तुम्ही खासम खास गोष्टी विकत घेणाऱ्या शौकीन असाल तर ही वेबसाईट तुमच्यासाठी आहेच
पण तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचं असेल तर नक्की भेट द्या.
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न !
शेतकर्याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते. अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे.
परवाच्या रविवारी माझ्या कराडच्या काकांकडे गेलो होतो. त्यांनी काही पुस्तकं इंटरनेटवरून मागविली होती. दुपारी त्याचं कुरिअर आलं होतं ते घेतलं तेव्हा काकांना विचारलंइतकं सांगून ही मला तरी काही अशी उत्सुकता वाटत नव्हती. इंटरनेट्वरून मिळतात त्या सगळ्या गोष्टी स्वस्त पडतात अस नाही किंवा पडल्याच त्या धड घरी येतात असही नाही. दोनच पुस्तकं मागवून इतकी व्यवस्थित येणं हि कमाल होती पण तरी ही पुणेरी मनाने "असेल एखाद्या प्रकाशनाच वेबदुकान अस म्हणून सोडून देणार होतो .. "
मी : " बघा सगळी सहिसलामत आहेत ना ?? "
काका : "हो, सांगितल्याप्रमाणे व सहि सलामत... "
मी : " कुठून मागविलीत? लोकल आहे का ? "
काका : "नाही पुण्याचं आहे .. "
मी : " मग मला सांगायचं ना .. मी आणली असती .. "
काका : "ते खरं रे पण तुला यायचं म्हणजे खर्च आहे आणि शिवाय तुला सवलत थोडिच मिळेल पुस्तकाच्या दुकानात ?"
मी : "म्हणजे ?"
काका: " अरे मी इंटरनेटवरून इ पेमेंट करुन मागविली होती ! "