मंगळवार, ५ जुलै, २०११
google - take out
सध्या गूगल ने इतक्या नवनवीन सोयी आणल्या आहेत की त्याशिवाय इतर लिहिणंच चूक ठरणार आहे. गूगल टेक आऊट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पूर्वीचा गूगलच्या सर्व्हरवर साठवलेली छायाचित्रे, संपर्क, बझ् पोस्ट्स, गूगल प्रोफाइलवरील सर्व माहिती तुमच्या संगणकावर बॅकअप म्हणून उतरवून घेऊ शकता. हे करण्यासाठी कसलेही मूल्य आकारण्यात येत नाही.
पुढील काही कृतींमधून तुम्ही हे सहज साध्य करू शकाल.
सोमवार, ४ जुलै, २०११
Google - art museum
.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा ..
गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल स्वत:च्या लोगो मधे सदोदित काही सन्देश देणारी चित्रे घालून संदेश देतच असते. चित्रकलाच नव्हे तर एकूणच दृश्यकलेचा खजिना लोकांसमोर सहज उपलब्ध करण्यासाठीच गूगलने हे " आर्ट प्रोजेक्ट " सुरु केले आहे.
यामध्ये तुम्ही जगातिल नामांकित संग्रहालयाच्या काही खास दालनांना भेट देऊ शकताच पण कलाकृतिंचा आनंद अगदी जवळून म्हणजे काही इंचावरून घेऊ शकता. गूगल मॅप्स प्रमाणेच याही संस्थळाचे निर्माण केले गेले आहे. वापरायला सोपे आणि सहज.
वरील चित्रात जे दिसत आहे ते आहे गूगल आर्ट प्रोजेक्टच पहिल पान. इथे तुम्हाला संग्रहालयांची यादी मिळते. त्यातून तुम्ही संग्रहालय किंवा कडेच्या चित्रावर टिचकी जरी मारलीत तरी तुम्हाला संग्रहालयात प्रवेश मिळतो
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०
Google - music
online music ऐकणार्यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत raaga.com किंवा dhingana.com वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com, saavan.com saregama.com अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०
गूगल्ताय !! जरा जपून ..
सेवा का फुकट आहेत कधी विचार केलाय का ? कोणतेही वस्तू आज पर्यंत फुकट कुणालाही मिळाली नाहीय. मग गुगल इतक फुकट का देतं ? तुम्हाला वाटेल की जाहिराती आहेत. त्यांची वेब सेवा वापरताना लोक जास्त हिट्स करत असतील. आणि इतर काही अंदाज ही असतील तुमचे. मला ही काही असेच प्रश्न पडले होते म्हणून सहज शोध घेतला गुगल वरच .
आणि हे सापडलंय ! जरा वाचून तर पहा ..
सोमवार, १५ मार्च, २०१०
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नेटविद्यार्थी ब्लॉगच्या वाचकांना व शुभचिंतकांना हे हिंदू - भारतीय नव सौरवर्ष भरभराटीचे आनंदाचे आणि सुखाचे जावो. विशेषत: ब्लॉगर्स साठी भरपूर वाचकांनी भरलेले व नव्या मैत्रीच्या संधी घेऊन येणारे ठरो ही मनोकामना.
शनिवार, १३ मार्च, २०१०
टेम्प्लेटसाठी दाहीदिशा ... पण आता नाही ...
blogger.com ने टेम्प्लेटसाठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल .
हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत, तसेच अतिशय इंग्रजी मराठीचे मिश्रण केले आहे त्याबद्दल दिलगिर आहे .
शुक्रवार, १२ मार्च, २०१०
आय पी एल online
आयपीएल ची सुरुवात तर दणक्यात झालीय .. कोलकाता नाईट रायडर्स ने डेक्कन चार्जर्स वर बाजी मारलीय ..
पण काही लोकांना Sony max किंवा केबल उपलद्ध नसल्याने किंवा इतर कारणाने जर ते पाहता येत नसेल तर त्यानी नाराज व्हायचं कारण नाही. तुमची youtube व आय पी एल ने सोय केलेली आहे. जर तुमच broad band इंटरनेट जोडणी असेल तर तुम्ही आयपीएल च्या सर्व सामन्याची मजा online लुटू शकता .. अगदी फुल्ल्स्क्रीन !
गुरुवार, ४ मार्च, २०१०
ई - पेपर गॅलरी
ई - पेपर गॅलरी
इंटरनेटवर फिरताफिरता मला हे संस्थळ सापडलं, खरतर हे अनिवासी भारतीयांकारता एकदम पर्वणी आहे. कारण इथे तुम्हाला भारतात जसे छापले जाते तसेच्या तसे वर्तमान पत्र वाचायला मिळते पाहायला मिळते. पण तुमच्या आमच्यासारख्यांना ही चांगली सोय आहे ही ! हे आहे एक वर्तमानपत्र वाचनालय जस चौकाचौकात असत तसच .. विविध वर्तमान पत्रे जशी छापली जातात तशी इथे पाहायला मिळतील. त्याची नेट आवृती असेल तर ती ही दिली जाते सोबत पण छापील आवृत्तीची नक्कल इथे असते हेच याच वैशिष्ट्य ..
सोमवार, १ मार्च, २०१०
मराठी मंडळी ..
मराठीब्लॉगर्स च्या ग्रूप ने स्थापन मराठीमंडळी.कॉम केलेले हे संस्थळ .. आज रात्री १० वाजता सुरु झाले. या आधी मायबोली, मराठी माती, मनोगत, ffive.in, मिसळपाव अशी अनेक संस्थळे निर्माण ही झालेली आहेत. त्यांच्या वाटचालीचे आपण साक्षीदार आहोतच . मराठी संस्थळ विश्वात अशी अनेक संस्थळे निर्माण होत आहेत आणि स्वत्व जपण्याच्या बरोबरच मराठीचे अस्तित्व निर्माण करत आहेत.
मराठी मंडळी बद्दल
ही मंडळी आहेत भुंगा, पंकज झरेकर, अनिकेत समुद्र, विक्रांत देशमुख, विशाल तेलंग्रे आणि आपण सर्व मराठी मंडळी !!
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०
सारे काही जुने -guide book gallery
आज सर्फिंग करताना मला हे संस्थळ सापडले, www.guidebookgallery.org
इथे सर्व शक्य तेव्हड्या जुन्या संगणकप्रणाली च्या दृश्य अनुभवाचा चित्र साठा आहे. अगदी जुन्या mac windows पासून ते 3dmax, photoshop, note pad, calculater सारख्या मोठ्या छोट्या गोष्टींपर्यंत .. सर्व काही ..
न राहवून तुम्हाला ही दाखवावेसे वाटले म्हणून ही एक छोटीशी पोस्ट जुन्या काळासाठी .. !!
नक्की पहा आणि कळवा कसे वाटले ते !
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)