पोस्ट्स

आर्टिफिशियल इंटेलिजेनस काढेल तुमची कल्पना चित्र !! Type your imagination and AI will paint

इमेज
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक असे सॉफ्टवेअर असते की जे इंटरनेटवरचा उपलब्ध असलेल्या डेटा स्कॅन करून त्याचे पॅटर्न किंवा त्याचे जे प्रकार आहेत ते आपल्या डेटाबेस मध्ये सेव्ह करते आणि त्या प्रकारचा इनपुट आपण दिल्यानंतर तो इनपुट प्रोसेस करून त्यासारखे पॅटर्न आपल्याला परत नव्याने तयार करून देते ज्यावेळेला आपण एखाद्या चित्राची वर्णनात्मक मागणी त्याला देतो त्या वेळेला ते इंटरनेट वरती त्या प्रकारची चित्र असलेला डेटाबेस पाहून तशा प्रकारच्या चित्राची स्वयं निर्मिती करते.  याचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक इनपुट नंतर त्याचा डेटाबेस वाढत असल्याने व लॉजिक सुधारत असल्याने काही काळानंतर येणाऱ्या परिणामांचा दर्जा किंवा याबाबतीत चित्राचा दर्जा हा सुधारत जातो असे बरेच प्रोजेक्ट कला, संगीत, साहित्य व वैद्यकीय विषयांमध्ये चालू आहेत.  सध्या त्याच्यामधला मीड जर्नी हा प्रोजेक्ट मी वापरलाय.  त्यासोबतच गुगल इमॅजिन आणि दाली 2 असे व इतर अनेक प्रोजेक्ट्स सध्या मला सापडले आहेत. पण सगळ्यात चांगला दर्जा गुगल इमाजिन , मिड जरनी व डाली २ यांचाच आहे. सध्या माझ्या माहितीनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स...

व्हाट्सअप बिझनेस काय आहे? ते कसे वापरायचे? Whatsapp business in marathi

इमेज
व्हाट्सअप ने व्यावसायिकांसाठी काढलेली ही एक आवृत्ती आहे. Whatsapp business ची वेगवेगळी features वापरून तुमचा व्यवसाय व्हाट्सअपवरती प्रसारित करू शकता. तुमची व्यवसायाची जाहिरात करू शकता, तर कसं वापरायचं हे चला पाहूयात! सर्वप्रथम आपल्याला ही लक्षात घ्यायचे की व्हाट्सअप बिझनेस वापरण्यासाठी आपल्याला एक एक वेगळा फोन नंबर वापरायचा आहे. तुम्ही आधी चा व्हाट्सअप नंबर जर इथे वापरलात तर तुमचं ते पर्सनल व्हाट्सअप आहे ते बंद होईल आणि बिझनेस व्हाट्सअप चालू होईल. जर तुम्हाला आधी चा नंबर पुढे व्यवसायासाठी वापरायचा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर एक नवीन व्हाट्सअप बिजनेस चा साठी नंबर घ्या सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर मध्ये जाऊन व्हाट्सएप बिजनेस डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल त्यानंतर आपल्याला सेटप रिझल्ट मधून सर्व माहिती विचारली जाईल तुमचा क्रमांक किंवा नंबर व्हेरिफाय केला जाईल त्यावेळेस तेही विचारेल तुमचा हा क्रमांक व्हाट्सअप ला कनेक्टेड आहे तो डिस्कनेक्ट करून व्हॉट्सऍप बिजनेस ला जोडायचा का त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचे आहे जर तुमचा नंबर नवीन असेल व्हाट्सअप ला जोडलेले नसेल तर हा...

इंक फ्रूट .कॉम

इमेज
इंक फ्रूट सहज इंटरनेट वर फिरता फिरता ही इंक फ्रूट .कॉम सापडली .. खास करून तरुणाई साठी असलेल्या या संस्थळावर अनेक प्रकारचे टी शर्ट्स , trousers, casual wares आणि इतरही गोष्टी आहेत , ज्या आकर्षक आहेतच पण विविध रंगात व प्रकारात आहेत . एखाद्या खास व्यक्तीला खास भेट द्यायची असेल किंवा तुम्ही खासम खास  गोष्टी विकत घेणाऱ्या शौकीन असाल तर  ही वेबसाईट तुमच्यासाठी  आहेच पण तुम्हाला काही  वेगळे ट्राय  करायचं असेल तर नक्की भेट द्या.

बळीराजा.कॉम - पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

इमेज
शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं.. पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न ! शेतकर्‍याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते.  अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. 

वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे

इमेज
वंडरलिस्ट : तुमची कामे करा आता पद्धतशीरपणे कामांची गडबड व धावपळ ही प्रत्येकालाच असते. कमीत कमी वेळात तुम्हाला अनेक कामांचा वेध घेत सगळे मोर्चे सांभाळायचे असतात.  ऑफिस, घर, वैयक्तिक अशी अनेक कामांची यादी आपल्याकडे सदैव तयार असते. जर तुम्ही तुमच्या कामांचे नियोजन नीट केले नाही तर तुमची कामे रहातात व मागे पडतात. अशा वेळेस तुम्हाला लागतो एक व्यवस्थापक, नियोजक ! जे लोक कॉम्प्युटर व मोबाईल मध्ये उपलब्ध असलेले नियोजक वापरतात , उदा. मोबाईल मधील दिनदर्शिका किंवा कॉम्प्युटर वरील outlook , thunderbird , sunbird अशी साधने वापरतात त्यांना प्रत्येक साधनातील काही उणीवा व फायदे माहीत असतात  व त्याने ते त्रस्त असतात. काही गुण हे खर्चिक असल्या कारणाने ते समाधानी नसतात. कधी कधी ते साधन फुकट असून ही उपयोगी ठरत नाही. तर कधी उपयोगी असते पण वापरा योग्य त्याचा interface नसतो. कधी कधी हे सर्व खूप क्लिष्ट असते. यावर उपाय म्हणून काही जण इंटरनेटवरील साधने जसे todoist , todo.ly , remember the milk , google calender वापरतात व आपल्या कामांचे नियोजन करतात. वरील सर्व साधने वापरायला सोपी व सरळ आहेत. पण ज्...

consumermate.com तुमच्या पसंतीचा मोबाइल निवडा सहज !

आज दोघातिघा मित्रांनी फेसबुक वर विचारलं होतं की मोबाइल घ्यायचा आहे. कोणतं मॊडेल सुचवशील ? .. काल माझ्या मामेभावाचा दुकानातून फोन... अरे कोणता कॅमेरा तु सजेस्ट केला होतास मागे .. आता इथे तर इतकी  मॉडेल्स आहेत कोणता घ्यावा ते कळत नाहीय... यासगळ्याना मी एक वेबसाईट सांगितली तीच इथे पण सांगत आहे ..

इमेलवरच मागवा आवडत्या ब्लॉग्सचे लेख....

इमेज
काहीतरी नवीन   हा ब्लॉग नुकताच वाचनात आलाय. नवीन नावाच्या लेखकाचा आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारे लेख आहेत. सोप्या भाषेत आणि सुटसुटीत. सहाजिकच त्याच्या लेखांना लोकप्रियता आहेच. खुपदा त्याचे लेख इमेल्स मधे फिरत असतात. मला इमेल मधूनच हा ब्लॉग कळला  हे सांगायला नको . पण त्या नंतर मी त्याच्या RSS वाहिनीला जोडून घेतलंय त्यामुळे मला त्याचे सर्वच लेख वाचता येतात. आज त्याने त्याच्या लेखांबद्दलच पोस्त लिहिलिय ..  त्यावरून मी त्याला काही उपाय अभिप्रायात लिहित होतो .. आणि म्हणल या विषयावरच का इथे बोलु नये ?

my hangout - नाव इंग्लिश, पुस्तके मराठी !

इमेज
परवाच्या रविवारी माझ्या कराडच्या काकांकडे गेलो होतो. त्यांनी काही पुस्तकं इंटरनेटवरून मागविली होती. दुपारी  त्याचं कुरिअर आलं होतं ते घेतलं तेव्हा काकांना विचारलं मी : " बघा सगळी सहिसलामत आहेत ना ?? " काका : "हो, सांगितल्याप्रमाणे व सहि सलामत...  " मी :  " कुठून मागविलीत? लोकल आहे का ? " काका : "नाही पुण्याचं आहे .. " मी :  " मग मला सांगायचं ना .. मी आणली असती .. " काका : "ते खरं रे पण तुला यायचं म्हणजे खर्च आहे आणि शिवाय तुला सवलत थोडिच मिळेल पुस्तकाच्या दुकानात ?" मी : "म्हणजे ?" काका: " अरे मी इंटरनेटवरून इ पेमेंट करुन मागविली होती ! " इतकं सांगून ही मला तरी काही अशी उत्सुकता वाटत नव्हती. इंटरनेट्वरून मिळतात त्या सगळ्या गोष्टी स्वस्त पडतात अस नाही किंवा   पडल्याच  त्या धड घरी येतात असही नाही. दोनच पुस्तकं मागवून इतकी व्यवस्थित येणं हि कमाल होती पण तरी ही पुणेरी मनाने "असेल एखाद्या प्रकाशनाच वेबदुकान अस म्हणून सोडून देणार होतो .. " पण मग काकांनीच ही वेबसाइट दाखवली . इथल्या एक एक सोयी ...

bing.com आणत आहे सर्च [शोध]च नवीन रूप ..

इमेज
google search च्या शर्यतीला आता तगडे आव्हान उभे रहाणार अस दिसतंय .. हे आव्हान आहे microsoft चं ! आता पर्यंत गूगल ने सर्च इंजिन मधे खूप बदल केले व ते स्वागतार्ह होते आहेत ही. पण bing.com [BUT ITS NOT GOOGLE = BING ]जे मायक्रोसॉफ्ट चे शोधक आहे त्याने आता कात टाकायची तयारी सुरु केली आहे. HTML 5 या नवीन तंत्राच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या ब्राऊझर मधे आता अगदी नवा व जिवंत शोधाचा अनुभव मिळू शकेल. खालील व्हिडो मधे प्रकाशनपूर्व बिंग च्या नवीन रूपाचे दर्शन होऊ शकेल ..

गेटपिनकोड.कॉम - पिनकोड मिळवा सहज..

इमेज
 आजकाल पत्र लिहिली जात नसल्याने आपल्या पोस्टाच्या पत्यामधला पिन कोड काय आहे हे बहुदा अनेक लोकांना माहित नसतं, पोस्ट्ल पत्ता हा जवळ्पास कालबाह्यच झाला आहे. कार्यालयीन लेखी व्यवहारच फक्त होत असतात. आपल्याला साधारणत:  स्वत:च्या कार्यालयाच्या जागेचा, किंवा घराच्या पत्याचाच केवळ लक्षात राहतो. कधी कधी नवीन ठिकाणी पत्र पाठवायचे असते आणि पत्राचा पत्ता माहित असतो .. पण पिन कोड नक्की माहित नसतो . अशावेळेस या सेवेचा तुम्हाला वापर करता येईल..

you tube - च नवं रूप ..

इमेज
गूगलने बहुदा सर्वच सेवांमधे बदल घडवायचे ठरवले आहे. जीमेल मधल्या नवीन बदलानंतर आता त्यांच्या यूट्यूब सेवेने ही कात टाकली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअर व मोठ्या थंबनेल्स हे या ले आऊटच वैशिष्ट्य असणार आहे. सध्या हि सेवा परिक्षणात आहे पण लवकरच हा लुक सगळ्यांना उपलब्ध होईल.  याच सध्याच नाव आहे कॉमिक पांडा .. आणि एखाद्या पांड्याप्रमाणेच या नविन अवतारात यूट्यूब दोन काळ्या पांढर्‍या छटांमधे उपलब्ध होइल .

फेसबुक - व्हिडीओ चॅट

इमेज
गूगल प्लस च्या व्हिडीओ चॅटच्या येण्यानं असलेले ग्राहक टिकवता टिकवता फेसबुकच्या तोंडाला फेस येऊ शकतो हे जेव्हा फेसबुक चालकांच्या लक्षात आलं, तेव्हाच त्यांनी ही सेवा लवकरात लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याच त्यांनी ठरवलं व तसं  मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या निर्मात्याने नुकतच जाहीरही केल . त्याच्या म्हणण्यानुसार या आठवड्यातच स्काईप या व्हिडीओ चॅटिंग साठी प्रसिद्ध असलेल्या सेवेला सोबत घेऊन फेसबुकने ही सेवा सुरु केलेली आहे.

google - take out

इमेज
सध्या गूगल ने इतक्या नवनवीन सोयी आणल्या आहेत की त्याशिवाय इतर लिहिणंच चूक ठरणार आहे. गूगल टेक आऊट ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची पूर्वीचा गूगलच्या सर्व्हरवर साठवलेली छायाचित्रे, संपर्क, बझ् पोस्ट्स, गूगल प्रोफाइलवरील सर्व माहिती तुमच्या संगणकावर बॅकअप म्हणून उतरवून घेऊ शकता. हे करण्यासाठी कसलेही मूल्य आकारण्यात येत नाही. पुढील काही कृतींमधून तुम्ही हे सहज साध्य करू शकाल.

Google - art museum

इमेज
.. न कोणती फी .. ना त्या देशात जाण्याचा खर्च. हवं ते संगीत लावा आणि कलेचा आनंद घ्या.. इतर लोकांची गर्दी नाही आणि ना वेळेच बंधन. निवांत पणे चित्र शिल्प पहा .. गूगल ने आतापर्यंत अनेक सोयी व वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या आहेत आणि खूपदा त्या यशस्वीही झाल्या आहेत. गूगल म्युझिक असो किंवा गूगल बूक्स .. याच प्रकारे गूगलने चित्रकलेला ही महत्वाचा भाग बनवले आहे. गूगल स्वत:च्या लोगो मधे सदोदित काही सन्देश देणारी चित्रे घालून संदेश देतच असते. चित्रकलाच नव्हे तर एकूणच दृश्यकलेचा खजिना लोकांसमोर सहज उपलब्ध करण्यासाठीच गूगलने हे " आर्ट प्रोजेक्ट " सुरु केले आहे. यामध्ये तुम्ही जगातिल नामांकित संग्रहालयाच्या काही खास दालनांना भेट देऊ शकताच पण कलाकृतिंचा आनंद अगदी जवळून म्हणजे काही इंचावरून घेऊ शकता.  गूगल मॅप्स प्रमाणेच याही संस्थळाचे निर्माण केले गेले आहे. वापरायला सोपे आणि सहज. वरील चित्रात जे दिसत आहे ते आहे गूगल आर्ट प्रोजेक्टच पहिल पान. इथे तुम्हाला संग्रहालयांची यादी मिळते. त्यातून तुम्ही संग्रहालय किंवा कडेच्या चित्रावर टिचकी जरी मारलीत तरी तुम्हाला संग्रहालयात प्रवेश मिळतो

Google - music

इमेज
online music ऐकणार्‍यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत raaga.com किंवा dhingana.com  वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com , saavan.com  saregama.com   अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...

गूगल्ताय !! जरा जपून ..

सेवा का फुकट आहेत कधी विचार केलाय का ? कोणतेही वस्तू आज पर्यंत फुकट कुणालाही मिळाली नाहीय. मग गुगल इतक फुकट का देतं ? तुम्हाला वाटेल की जाहिराती आहेत. त्यांची वेब सेवा वापरताना लोक जास्त हिट्स करत असतील. आणि इतर काही अंदाज ही असतील तुमचे. मला ही काही असेच प्रश्न पडले होते म्हणून सहज शोध घेतला गुगल वरच . आणि हे सापडलंय ! जरा वाचून तर पहा ..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
 नेटविद्यार्थी ब्लॉगच्या वाचकांना व शुभचिंतकांना हे हिंदू - भारतीय नव सौरवर्ष भरभराटीचे आनंदाचे आणि सुखाचे जावो. विशेषत: ब्लॉगर्स साठी भरपूर वाचकांनी भरलेले व नव्या मैत्रीच्या संधी घेऊन येणारे ठरो ही मनोकामना.

टेम्प्लेटसाठी दाहीदिशा ... पण आता नाही ...

blogger.com ने टेम्प्लेटसाठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल . हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत, तसेच अतिशय इंग्रजी मराठीचे मिश्रण केले आहे त्याबद्दल दिलगिर आहे .

आय पी एल online

आयपीएल ची सुरुवात तर दणक्यात झालीय ..  कोलकाता नाईट रायडर्स ने डेक्कन चार्जर्स वर बाजी मारलीय .. पण काही लोकांना Sony max किंवा केबल उपलद्ध नसल्याने किंवा इतर कारणाने जर ते पाहता येत नसेल तर त्यानी नाराज व्हायचं कारण नाही. तुमची youtube व आय पी एल ने सोय केलेली आहे.  जर तुमच broad band  इंटरनेट जोडणी असेल तर तुम्ही आयपीएल च्या सर्व सामन्याची मजा online लुटू शकता .. अगदी फुल्ल्स्क्रीन !

ई - पेपर गॅलरी

इमेज
 ई - पेपर गॅलरी इंटरनेटवर फिरताफिरता मला हे संस्थळ सापडलं, खरतर हे अनिवासी भारतीयांकारता एकदम पर्वणी आहे.  कारण इथे तुम्हाला भारतात जसे छापले  जाते तसेच्या तसे वर्तमान पत्र वाचायला मिळते पाहायला मिळते.  पण तुमच्या आमच्यासारख्यांना ही  चांगली सोय आहे ही ! हे आहे एक वर्तमानपत्र वाचनालय जस चौकाचौकात असत तसच .. विविध वर्तमान पत्रे जशी छापली जातात तशी इथे पाहायला मिळतील. त्याची  नेट आवृती असेल तर ती ही दिली जाते सोबत पण छापील आवृत्तीची नक्कल इथे असते हेच याच वैशिष्ट्य ..